कोरोना काळात मुलांचा मोबाइल फोनसोबत घालवला जाणारा वेळ वाढला आहे. मग तो ऑनलाइन शिक्षणासाठी असो की गेम खेळण्यासाठी. मोबाइलचे अनेक फायदे असले तरी डिजिटल उपकरणांच्या अत्याधिक वापरामुळे डोळ्यांवर दुष्परिणाम होतो हे निश्चित. पण डिजिटल लर्निंग आता न्यू नॉर्मल आहे आणि आता ही स्थिती दीर्घ काळापर्यंत राहणार आहे. मोबाइल फोनच्या अत्यधिक वापरामुळे डोळ्यांवर रेडिओ फ्रिक्वेन्सी इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डचा परिणाम सर्वाधिक होतो. लहान मुलांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता जास्त असते, कारण त्यांची नर्व्हस सिस्टीम पूर्णपणे विकसित झालेली नसते. डोळ्यांची ही समस्या कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम किंवा डिजिटल आय स्ट्रेन या नावाने ओळखली जाते. फोन किंवा डिजिटल उपकरणांच्या अत्याधिक वापरामुळे झालेल्या आहेत अशा सर्व समस्या यातही येतात. त्यामुळे थोडी काळजी घेतली तर तुम्ही तुमचे स्वत:चे आणि तुमच्या मुलांचे डोळे सुरक्षित ठेवू शकता. कोणती काळजी घेता येऊ शकते हे येथे जाणून घेऊया.
गॅजेटचा जास्त वापर करत असाल तर खालीलप्रमाणे काळजी घ्या
- डेस्कवर काम करताना कॉम्प्युटर स्क्रीन डोळ्यांच्य पातळीपेक्षा थोडा खाली २० इंच अंतरावर किंवा आपल्या हाताच्या लांबी एवढ्या अंतरावर ठेवा.
- जर मुलाला पूर्वीपासूनच कमजोर दृष्टीमुळे चष्मा लागला असेल, तर कॉम्प्युटर किंवा मोबाइल वापरताना चष्मा अवश्य लावायला सांगा.
- स्क्रीन पाहताना आपण पापणी लवणे विसरतो. त्याची आठवण ठेवा, त्यामुळे डोळ्यांचा कोरडेपणा आणि धूसर दिसणे या समस्यांपासून तुमचा बचाव होईल.
- स्क्रीन सतत पाहणे टाळावे. प्रत्येक २० मिनिटे स्क्रीन पाहिल्यानंतर डोळे २० सेकंद अवधीसाठी २० फूट दूर पाहून ब्रेक द्या.
- आपल्या गॅजेटचे स्क्रीन नेहमी स्वच्छ ठेवा. कोरड्या फडक्याने ते पुसत राहा. त्यावर बोटांचे ठसे उमटू देऊ नका.
- स्क्रीनजवळ आणि जवळपास पुरेसा प्रकाश असेल याची काळजी घ्या. गॅजेटचे ब्राइटनेसही मेंटेन करा. म्हणजे ब्राइटनेस खूप कमी किंवा खूप जास्त नसावा.
- थकल्यानंतर डोळे चोळणे टाळावे. कारण यामुळे डोळ्यांत संसर्ग होण्याची शक्यता वाढू शकते.
- मोबाइलवर वाचताना अत्यधिक तणाव टाळण्यासाठी फाँटचा आकार बदलून तो मोठा करावा.
- मुलांना पुरेशी झोप आणि भरपूर पाणी पिण्यास सांगावे, कारण पाणी कमी प्यायल्याने डोळ्यांतील कोरडेपणाची लक्षणे वाढू शकतात.
जगभरातील संशोधनांत या पद्धतीही सांगितल्या आहेत..
- स्मार्टफोन, कॉम्प्युटर वा टॅब्लेटच्या स्क्रीनवर मॅट स्क्रीन फिल्टर लावा. चमक कमी होईल.
- डिव्हाइसच्या सेटिंगमध्ये नाइट मोड आणि ब्लू लाइट फिल्टरचा वापर करा.
- डार्क थीमचा पर्याय असल्यास तो निवडा. डोळ्यांवरील ताण कमी होईल. व्हॉट्सअॅपसारख्या अॅप्ससाठी हा पर्याय उपलब्ध आहे.
- मोठ्या स्क्रीनवर रिझोल्युशन वाढते. म्हणून कॉम्प्युटर वा लॅपटॉपची स्क्रीन २० इंचांपेक्षा कमी नसेल, याची काळजी घ्या.
Eye Care Tips : कम्प्युटर, लॅपटॉपच्या अति वापरामुळे डोळ्यांचे नुकसान होऊ शकते. भविष्यातील गंभीर समस्या टाळण्यासाठी वेळीच योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.
तंत्रज्ञानानं आपलं आयुष्य अगदी सुखकर बनवलं आहे. गेल्या काही महिन्यांपासून स्क्रीनटाइम आणि स्मार्टफोन वापरकर्त्यांच्या आकड्यात कित्येक पटींनी वाढ झाली आहे. लॉकडाउन काळात लोकांचं मनोरंजन तर झालंच. पण, आता त्याचे दुष्परिणाम पाहायला मिळत आहेत. डोळ्यांसमोर सतत मोबाइल, लॅपटॉप आणि अन्य गॅजेट्स आल्यानं लोकांना अनेक शारीरिक आणि मानसिक आजार जडण्याचा धोका निर्माण झाला आहे. विशेषतः किशोरवयीन मुलांवर याचा जास्त परिणाम झालेला दिसतोय.
व्हर्च्युअल क्लासेसमुळे आणि स्क्रीनसमोर बसण्याच्या कालावधीत कमालीची वाढ झाल्यामुळे मुलांच्या डोळ्यांवर ताण येणं, त्यांना थकवा जाणवणं आणि नेत्रविकाराच्या समस्या, चिडचिड होणं अशी तक्रार पालक करत आहेत. नेत्रतज्ज्ञ सांगतात की, माझी मुलगी सातवीत शिकत आहे. शाळेतर्फे घेण्यात येणारे ऑनलाइन वर्ग सुरू झाल्यापासून तिला डोकेदुखी, डोळ्यांची जळजळ यांसारख्या समस्या सतावत आहेत. तिच्यासोबतच वर्गातील इतर मुलांनाही डोळ्यांच्या समस्यांना सामोरं जावं लागत आहे’.
डोळ्यांना जपा
तज्ज्ञांच्या मते, ऑनलाइन वर्गांमुळे मुलांच्या डोळ्यांवरील ताणात आणखीन भर पडली आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टीनं आणि अभ्यासावर परिणाम होऊ नये यासाठी घेतलेला निर्णय योग्यच आहे. पण, यामुळे मुलांना अनेक शारीरिक समस्यांना तोंड द्यावं लागतंय हेही तितकंच खरंय! ‘डोळ्यांच्या बाबतीत अगदी लहानात लहान गोष्ट दुर्लक्षित करणं गंभीर परिणामांना आमंत्रण देऊ शकतं’, असं नेत्ररोगतज्ज्ञ आणि सर्जन डॉ. भुजंग शेट्टी नमूद करतात.
वाढत्या वयातील मुलांसाठी
अतिरिक्त स्क्रीनटाइम डोळ्यांना हानिकारक ठरू शकतो. गरजेपेक्षा जास्त टीव्ही पाहणं, डेस्कटॉप समोर बसणं, स्मार्टफोन वापरणं या सवयींमुळे डोळ्यांना इजा पोहोचू शकते. ‘ज्या मुलांना लहान वयातच चष्मा वापरावा लागतो त्यांना भविष्यात आणखी त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही’, असं तज्ज्ञ सांगतात. तज्ज्ञ मंडळी लॉकडाउन सुरू होण्या आधीपासूनच मुलांचा स्क्रीनटाइम कमी ठेवण्याचा सल्ला देत होते. वाढत्या वयात असणाऱ्या मुलांचे डोळे आणि डोळ्यांचा पडदा अत्यंत नाजूक अवस्थेत असतो.
मैदानी खेळ गरजेचे
‘वयानुसार डोळ्यांचा देखील विकास होत असतो. विशेषतः भविष्यातील संभाव्य नेत्रविकार टाळण्यासाठी पालकांनी स्क्रीनटाइमवर बंधनं घालणं गरजेचं आहे’, असं बालरोगतज्ज्ञ मयुरी येवले म्हणतात. ‘सूर्यप्रकाशात किंवा कोवळ्या उन्हात वेळ घालवणं त्यांच्या शारीरिक विकासासाठी फायदेशीर ठरू शकतं. तासनतास स्क्रीनसमोर बसण्यापेक्षा मैदानी खेळांना प्राधान्य मिळायला हवं’, असं डॉ. भुजंग सांगतात. ‘विद्यार्थ्यांना अभ्यासासोबतच मैदानी खेळांची सवय लागावी यासाठी शाळेनं प्रयत्न करायला पाहिजे. मैदानी खेळ डोळ्यांच्या आरोग्यासाठी देखील उपयुक्त ठरतात’, असं तज्ज्ञ नमूद करतात.
स्क्रीनटाइमवर आणा बंधनं
सूर्यप्रकाशात वेळ घालवल्यानं मुलांचं आरोग्य जपलं जातं. सद्यस्थितीत हे शक्य नाही, त्यामुळे त्यांचा स्क्रीनटाइमवर नियंत्रण ठेवलं पाहिजे. अमेरिकन अकादमी ऑफ पीडियाट्रिक्सनं १८ ते २४ महिने वयाच्या लहान मुलांच्या मोबाइल वापराबाबत (व्हिडीओ चॅटिंग वगळता) निराशा व्यक्त केली आहे. त्यांच्या मते, दोन ते पाच वर्षांमधील मुलांना मोबाइल आणि स्क्रीनपासून शक्य तितकं लांब ठेवायला हवं. पालकांनी दिवसभरात एक तासाहून अधिक काळ त्यांना स्क्रीनसमोर बसू देऊ नये.
डोळ्यांची काळजी घेण्यासाठी
लहान मुलांच्या डोळ्यांवर येणारा ताण कमी करण्यासाठी पालकांनी स्मार्टफोन आणि इतर गॅजेटसच्या विनाकारण वापरावर बंधनं घालायला हवीत. मुलांचे ऑनलाइन वर्ग सलग न घेता त्याची लहान-लहान सत्रांमध्ये विभागणी होणं आवश्यक आहे. विद्यार्थी कमीत कमी वेळ स्क्रीनसमोर बसतील या हिशोबानं शिक्षकांनी गृहपाठ आणि अन्य प्रकल्प अभ्यास विद्यार्थ्यांवर सोपवावा.
लॅपटॉपचा ब्राइटनेस असावा कमी
डेक्सटॉप अथवा लॅपटॉपसमोर बसताना मुलांचा कणा सरळ राहील अशी आसनव्यवस्था असावी. शिवाय स्क्रीन आणि डोळ्यांमध्ये सुरक्षित अंतर असायला हवं; जेणेकरून डोळ्यांच्या समस्या डोकं वर काढणार नाहीत. स्क्रीन आणि डोळ्यांमध्ये किमान दोन फुटांचं अंतर असणं आवश्यक आहे. मुलांना लॅपटॉप देताना स्क्रीनचा ब्राइटनेस कमी असू द्या.
डोळ्यांची तपासणी
सहा महिन्यांतून एकदा मुलांच्या डोळ्यांची तपासणी करून घ्या. गरज नसताना गॅजेट्स वापरायला देऊ नका. टीव्ही बघणं, मोबाइलवर गेम्स खेळण्यापेक्षा घराबाहेर खेळण्याची मुलांना सवय लावा, यामुळे त्यांची शारीरिक हालचाल होईल. २०-२०-२० या सूत्राची सवय लावा. म्हणजे मोबाइल अथवा डेक्सटॉपचा वापर केल्यानंतर दर वीस मिनिटांनी वीस फूट अंतरावरील वस्तूकडे वीस सेकंद पाहत राहणं.