लवकर आणि सहज गर्भधारणेसाठी काय कराल?

या गोष्टी लक्षात ठेवा गर्भवती होण्यासाठी लवकरच गर्भधारणा होणे होईल सोपे

0

लग्नानंतर प्रत्येक मुलगी नक्कीच आई होण्यासाठी उसुक असते . बर्‍याच मुली सहज गर्भधारणा करतात. काही महिलांना आई होण्यात बर्याच अडचणी येतात. 

बाळ होऊ नये म्हणून आतापर्यंत तुम्हीसुरक्षित शारीरिक संबंध ठेवून बरीच वर्षे घालवली आहेतआतातुम्हाला गर्भधारणा हवी आहे आणि तुम्हाला लवकरात लवकर आई व्हायचे आहेह्या लेखामध्ये गर्भधारणा होण्यासाठी सर्वोत्तम काळ आणि बाळ व्हावे म्हणून कुठल्या पद्धती उपयोगी होतील ह्याविषयी चर्चा केली आहेतसेच नैसर्गिकरित्या निरोगी बाळ व्हावे म्हणून त्यासंबंधी टिप्स आणि सूचना सुद्धा इथे दिल्या आहेत.

आपण आई बनण्याचे स्वप्न पाहत असल्यास आणि गर्भधारणा करू इच्छित असल्यास पुढील गोष्टी लक्षात ठेवा. या गोष्टींचे अनुसरण केल्यास आपण सहजपणे गरोदर व्हाल.

लवकरात लवकर गर्भवती कसे व्हाल?तुमच्या दोघांचे वय ३५ पेक्षा कमी असेल आणि तुम्ही असुरक्षित संभोग करीत असाल तर तुम्हाला गर्भधारणा होण्यास ६ महिने लागतीलतथापिजर वर्षभर प्रयत्न करून सुद्धा तुम्हाला गर्भधारणा झाली नाही तर वैद्यकीय मदत घेतली पाहिजे.

त्याचबरोबर हे सुद्धा लक्षात घेतले पाहिजे की गर्भधारणेसाठी वेळ लागू शकतो३० वर्षे वयाच्या स्त्रीची गर्भवती राहण्याची शक्यता २० असतेत्यामुळे तुम्ही गर्भधारणा होण्याचा ताण न घेतानियमितपणे लैंगिक आयुष्याचा आनंद घेत राहिले पाहिजे.

गर्भधारणा होण्यासाठी खाली काही गोष्टी दिल्या आहेत ज्या तुम्ही पाळल्या पाहिजेत.

नियमितपणे लैंगिक संबंध ठेवत आहात ना ह्याची खात्री करा.

प्रजनन तज्ञांच्या मते तुम्ही दररोज नव्हे पण नियमितपणे शारीरिक संबंध ठेवले पाहिजेत कारण शुक्रजंतू ७ दिवसापर्यंत जिवंत राहू शकतातशुक्रजंतू तयार होण्यासाठी मध्ये थोडा काळ जाऊ द्यावातसेच महिन्यातील फक्त ६ दिवस असे असतात जेव्हा तुम्हाला गर्भधारणा राहू शकतेआणि हे दिवस म्हणजे ओव्यूलेशन च्या आधीचे ५ दिवस आणि ओव्यूलेशन चा दिवस होय.

गर्भनिरोधक साधनांचा वापर करणे बंद करा

काही संप्रेरकांवर आधारित गर्भनिरोधक साधनांमुळेजरी त्यांचा वापर थांबवला तरी प्रजनन क्षमतेवर परिणाम होतोगर्भनिरोधक गोळ्या जर वापरत असाल तर त्यांचा संप्रेरकांवर होणारा परिणाम दीर्घकाळ नसला पाहिजेआणि तुमची पाळी नियमित राहिली पाहिजेजर तुम्ही इन्ट्रायुटेराइन डिव्हाईस (IUD) वापरत असाल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांकडून ते काढून घेतले आहे ना ह्याची खात्री करा. Depo-provera चा परिणाम दीर्घकाळ राहतो त्यामुळे गर्भधारणेसाठी प्रयत्न करण्याआधी १ वर्ष आधी ते घेणे थांबवात्यामुळे गर्भधारणेची शक्यता वाढेलतसेच तुम्हाला निरोगी बाळ हवे असेल तर धूम्रपान आणि मद्यपानाच्या सवयी सोडल्या पाहिजेतनियमित फॉलिक ऍसिडच्या गोळ्या घेतल्यास गर्भधारणेच्या कमीत कमी एक महिना आधीजन्मतः बाळामध्ये व्यंग असण्याची शक्यता कमी होतेवजन नियंत्रित ठेवल्याने आणि कॉफीचे प्रमाण १६ औंस इतके मर्यादित ठेवल्याने गर्भधारणेस मदत होते.

गर्भधारणेसाठी सर्वोत्तम काळ कुठला?

गर्भधारणेसाठी सर्वात उत्तम काळ म्हणजे ओव्यूलेशनचा काळह्या काळात फलित स्त्रीबीज अंडाशयातून बाहेर पडतेसंभोगानंतर शुक्राणू ४८७२ तास जिवंत राहते तर फलित अंडे फक्त १२ ते २४ तास जिवंत राहतेह्याचाच अर्थ स्त्रीबीज अंडाशयातून सोडल्यापासून फक्त १२२४ तासांमध्ये फलित होऊ शकतेत्यामुळे स्त्रीबीज सोडल्यानंतर त्यास फलनासाठी स्त्रीबीजवाहिनीमध्ये शुक्रजंतूचा पुरवठा आवश्यक आहे.

त्यामुळे गर्भधारणा होण्यासाठी ओव्यूलेशन केव्हा होणार आहे ह्याचा अंदाज असणे जरुरी आहे.

साधारणपणे स्त्रीचे मासिक पाळी चक्र हे २८ दिवसांचे असतेओव्यूलेशन फक्त एकदा होते आणि ते पाळीच्या १४ व्या दिवसाच्या आसपास होतेपरंतु २८ दिवसांचे मासिक पाळी चक्र क्वचितच आढळतेकारण बऱ्याच स्त्रियांचे मासिक पाळी चक्र २४३५ इतक्या दिवसांचे असतेओव्यूलेशन पाळी सुरु होण्याच्या आधी १४ व्या दिवशी होतेत्यामुळे २४ दिवसांचे मासिक पाळी चक्र असलेल्या स्त्रीला १० व्या दिवशी आणि ३५ दिवसांचे मासिक पाळी चक्र असलेल्या स्त्रीला २१ व्या दिवशी ओव्यूलेशन होते.

ज्या स्त्रियांचे मासिक पाळी चक्र नियमित आहे अशा स्त्रिया ओव्यूलेशन केव्हा होणार आहे हे जाणून घेण्यासाठी ओव्यूलेशन प्रेडिक्टर किट वापरू शकताततसेच ज्या ओव्यूलेशन किट्स द्वारे तुमच्या संप्रेरकांची पातळी मोजली जाते अशा किट मुळे ओव्यूलेशन केव्हा होणार आहे हे समजते.

ज्या स्त्रियांची मासिक पाळी नियमित नसतेअशा स्त्रियांच्या बाबतीत ओव्यूलेशनचा अंदाज लावणे कठीण असतेजर तुमची मासिक पाळी नियमित नसेल तर तुम्ही खालील लक्षणांद्वारे ओव्यूलेशन केव्हा होणार आहे ह्याचा अंदाज लावू शकता.

शरीराच्या मूलभूत तापमानात झालेल्या वाढीची नोंद ठेवा

शरीर आरामात असताना शरीराचे जे तापमान असते त्यास शरीराचे मूलभूत तापमान असे म्हणतातओव्यूलेशन प्रक्रियेदरम्यान ह्या तापमानात वाढ होते.प्रत्येक दिवशी सकाळी बेडवरुन उठल्यावर तुमच्या शरीराच्या तापमानाची नोंद ठेवात्यामुळे तुम्हाला तुमच्या शरीराच्या तापमानाचा नमुना मिळेलतापमानात वाढ होण्याआधी २३ दिवस प्रजननक्षमता खूप जास्त असते.

योनीमार्गातील स्रावामध्ये काही बदल आढळल्यास त्याची नोंद ठेवा

ओव्यूलेशनच्या आधी स्त्राव ओलसर आणि चिकट होते आणि ओव्यूलेशननंतर योनीमार्गातील स्त्राव कमी आणि घट्टसर होतो.

ओव्यूलेशनच्या आधी शारीरिक संबंध ठेवा

तुम्हाला ओव्यूलेशन केव्हा होते ह्याचा अंदाज आल्यावर तुम्ही त्याआधी २३ दिवस आणि ओव्यूलेशनच्या दिवशी शारीरिक संबंध ठेवा त्यामुळे स्त्रीबीज अंडाशयामधून सोडले जाण्याआधी निरोगी शुक्राणू बीजवाहिनीमध्ये असतील.

जर तुम्हाला प्रजननाचा सर्वोत्तम काळ माहिती नसेल तर तुमच्या मासिक पाळीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात नियमितपणे शारीरिक संबंध ठेवात्यामुळे स्त्रीबीज सोडले जाण्याआधी बीजवाहिनी मध्ये पुरेसे निरोगी आणि सक्रिय शुक्रजंतू असतील.

शारीरिक संबंध ठेवण्याविषयी आणखी महत्वाची टीप म्हणजे प्रजनन काळात संभोग करण्या आधी खूप काळ शारीरिक संबंध आलेच नाहीत असे करू नकावीर्यामध्ये मृत शुक्राणू असू नयेत म्हणून दिवसातून एकदातरी वीर्यपतन केले पाहिजे.

गर्भधारणेची शक्यता वाढवण्याचे उत्तम मार्ग

बाळासाठी प्रयत्न करण्याआधी तुमच्या दोघांचीही तब्येत चांगली असली पाहिजेतब्येतीच्या काही तक्रारी तर नाहीत ना किंवा जनुकीय समस्या तर नाहीत ना हे जाणून घेण्यासाठी बरेच डॉक्टर्स स्त्रीरोगतज्ञांना भेटण्याचा सल्ला देताततसेच डॉक्टर्स जीवन शैली बदलण्याचा सुद्धा सल्ला देतात त्यामुळे गर्भधारणेची शक्यता वाढते.

खालील गोष्टींचा वापर थांबवा

योनीमार्गासाठी वंगणाचा वापर – संशोधनाद्वारे असे सिद्ध झाले आहे की योनिमार्गाच्या वंगणाचा वापर केल्यास शुक्रजंतूंना हानी पोहचू शकते आणि स्त्रीबीज फलनासाठी ते गर्भाशयापर्यंत पोहचू शकत नाहीतकारण pH जास्त असल्याने शुक्रजंतू मरून जातातह्या हानिकारक गोष्टी वापरण्याऐवजीसंभोगा आधीच्या कामक्रीडे दरम्यान स्पर्शचुंबनमिठी अशा क्रिया १५२० मिनिटे कराजर ह्याचा उपयोग झाला नाही तर तुम्ही कोमट पाण्याचा वापर करू शकता कारण शुक्राणूंकरिता पाणी हानिकारक नाही.

खूप कॅफेन घेणे टाळा – कॉफीचे सेवन आणि गर्भधारणा न होणे ह्यांचा संबंध संशोधनाद्वारे सिद्ध झाला आहे२००३०० मिग्रॅ कॉफी (म्हणजेच २ कपघेणे ठीक आहे परंतु दिवसाला ५०० ग्रॅम (५ कप कॉफीघेणे टाळा कारण त्यामुळे दीर्घकाळ गर्भधारणा होत नाही.

मद्यसेवन – जरी मद्यसेवनाच्या सुरक्षित पातळीविषयी अद्याप संशोधन झालेले नसले तर गर्भधारणेस इच्छुक असलेल्या स्त्रीने मद्यसेवन टाळले पाहिजेतसेच मासिक पाळी चक्राच्या दुसऱ्या भागात ओव्यूलेशन होते तेव्हा मद्यपान न करण्याची शिफारस केली जाते.

धूम्रपान – शास्त्रीय अभ्यासाद्वारे असे लक्षात आले आहे की जी जोडपी धूम्रपान करतात त्यांना गर्भधारणा होण्यास बराच काळ लागतोजर बाळ हवे असेल तर धूम्रपान संपूर्णपणे टाळले पाहिजेधूम्रपानाचा फक्त तुमच्याच नव्हे तर भविष्यात तुमच्या बाळाच्या सुद्धा प्रजननक्षमतेवर परिणाम होऊ शकतोतसेच धुम्रपानामुळे स्त्रियांच्या अंडाशयावर तसेच पुरुषांच्या शुक्राणूंच्या संख्येवर परिणाम होतोबीजांचे नुकसान होते तर स्त्रियांमध्ये रजोनिवृत्ती सुद्धा लवकर येते.

तसेच धुम्रपानामुळे गर्भपात तसेच अकाली प्रसूतीकमी वजनाची बाळे इत्यादी समस्या आढळतात.

ताण – ताण वाढल्यास पुरुषांच्या प्रजननक्षमतेवर आणि स्त्रियांमध्ये ओव्यूलेशन वर परिणाम होतोताणामुळे ओव्यूलेशन चक्रामध्ये उशीर होतो आणि ओव्यूलेशनचा काळ चुकू शकतोकिंवा मासिक पाळीचा काळ सुद्धा वाढतोकरिअरघर बदलणे इत्यादी गोष्टींचा ताण जोडप्याना येऊ शकतो आणि त्यामुळे गर्भधारणेच्या प्रयत्नांना उशीर होऊ शकतो.

ताण कमी करणारे व्यायाम जसे की योग किंवा मनशरीर विश्रांती कार्यक्रम तुम्हाला आराम मिळण्यास आणि गर्भधारणेची शक्यता वाढण्यास मदत करू शकतात.

गर्भधारणा होण्यासाठी कोणता विशेष आहार घेतला जावा ह्याविषयी कुठलाही शास्त्रीय पुरावा नाहीपरंतु पोषक आणि संतुलित आहार घेतल्यास गर्भधारणेची शक्यता वाढतेह्यासाठी मासेसमुद्री खाद्य जसे की कोळंबीसुरमईकॅटफिश इत्यादी कमी पारा असलेले मासे तुम्ही खाल्ले पाहिजेततसेच शार्ककिंग मॅकेरेल असे पारा असलेले मासे खाणे टाळले पाहिजेहे मासे खाल्यास गर्भधारणेची शक्यता कमी होते.

लवकर आणि नैसर्गिकरित्या गर्भधारणा होण्यासाठी काही उपयोगी टिप्स

जोडप्यांसाठी इथे काही टिप्स आणि सूचना दिल्या आहेत ज्या तुम्ही नैसर्गिक आणि जलद गर्भधारणेसाठी वापरू शकता:

  • लैंगिक स्थितीपुरुष वरती असणे ही सर्वोत्तम स्थिती आहेसंभोगानंतर लगेच बेड वरून खाली उतरणे टाळातसेच तुमच्या कुल्ल्यांखाली उशी ठेऊन संभोगानंतर २० मिनिटे पाय वर करून ठेवल्याने शुक्राणू स्त्रीबीजापर्यंत पोहोचण्याची शक्यता वाढते.
  • मजबूत आणि निरोगी शुक्राणूशुक्राणू मजबूत आणि निरोगी असल्यास स्त्रीबीज फलनाची शक्यता वाढतेपुरुषांनी जीवनशैली मध्ये खालीलप्रमाणे बदल केल्यास शुक्राणूंची गुणवत्ता वाढते:
  • तंबाखूमारिजुआना किंवा कुठलेही ड्रुग्स घेणे टाळा.
  • मद्यपान मर्यादित घ्या.
  • वजन नियंत्रित ठेवा.
  • संपूर्णधान्यमासे आणि भाज्या असलेला पोषक आहार घेतल्यास पुरुषांची प्रजननक्षमता वाढतेव्हिटॅमिन सी समृध्द असलेले अन्न शुक्राणूंची गतिशीलता (किंवा हालचालवाढवू शकताततर ऑयस्टरगोमांस आणि भाजेलेले बीन्स वांझपणा टाळण्यासाठी आवश्यक असलेले जस्त पुरवतातयाव्यतिरिक्तव्हिटॅमिन बी ची निम्न पातळी शुक्राणूंच्या आरोग्यावर परिणाम करू शकतेम्हणून पुरुषांनी दररोज निरोगी नाश्तापालेभाज्या आणि संत्र्यांचा ज्यूस घेतलाच पाहिजे.
  • गरम बाथटब किंवा सौनाचा वापर टाळाकारण उच्च तापमान शुक्राणूंचा नाश करू शकतोसुमारे ९४९६ डिग्री फॅरेनहाइटवर गरम पाण्याने अंघोळ करण्याची शिफारस केली जातेजी आपल्या शरीराच्या सामान्य तापमानापेक्षा किंचित कमी असते.
  • तज्ञांच्या मते पुरुषांनी घट्ट अंत:वस्त्रे घालण्याऐवजी सैल बॉक्सर किंवा चड्डी घालावीज्यामुळे अंडकोष थंड राहू शकतील आणि शुक्राणूंच्या उत्पादनास चालना मिळू शकेलतसेच पुरुषांनी त्यांच्या मांडीवर लॅपटॉप सारख्या इलेक्ट्रॉनिक उपकरणे ठेवणे टाळावेकारण त्यामुळे अंडकोषांचे तापमान वाढते आणि शुक्राणूंच्या उत्पादनास हानी पोहोचण्याची शक्यता असते.

भावनोत्कटता प्राप्त केल्याने लैंगिक संभोग केल्याचा अनुभव चांगला सुधारू शकतोपरंतु यामुळे कोणत्याही प्रकारे गर्भधारणेवर परिणाम होत नाही.

वंध्यत्व ही एक समस्या आहे जी पुरुष आणि स्त्रिया दोघांवरही परिणाम करू शकतेअशावेळी वैद्यकीय सल्ला आणि तज्ञ डॉक्टरांची लवकरात लवकर मदत घेणे आवश्यक आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.