fbpx
2.8 C
London
Monday, February 6, 2023

रसायनयुक्त प्रॉडक्ट्सना विसरा, केसांना फक्त ‘घरगुती आयुर्वेदिक हेअर पावडर’ वापरा

केस गळत आहेत, केस रुक्ष झाले आहेत, केसांमध्ये आधी सारखी चमक अजिबातच उरली नाही, केस पांढरे होत आहेत इ. प्रश्न तुम्हालाही नक्कीच पडत असतील, हो ना !

आईचे, आजीचे मऊ, जाड, लांब आणि चमकदार केसांसोबत आधीचे फोटो बघितल्यावर तुम्ही नक्कीच त्यांना हा प्रश्न विचारत असणार की, तुम्ही केसांना काय लावायचा? तर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो, आधीचे लोक केस धुण्यासाठीची माती, शिकेकाईची पावडरच आणि शिकेकाईच्या शेंगा इ. साधनांनी नैसर्गिकरित्या केस धूत होते. एकही रसायनयुक्त पदार्थ केसांवर वापरत नव्हते. पण आता का धूत नाही? तर आधी या सगळ्या वस्तू विकायला यायच्या आताच्या बिझी लाईफ मध्ये या वस्तू विकायला येणं आणि संपूर्ण धीर ठेऊन यांचा वापर करणे जवळ जवळ अशक्यच आहे.

पण तुम्हाला माहिती आहे का? अजूनही गावातील काही दुकाने तुमच्यासाठी या सर्व गोष्टी उपलब्ध करून देतात. मानलं की तुम्हाला केसांच्या पोषणासाठी सर्व गोष्टींचे मिश्रण करुण वापरणे शक्य नाही. म्हणून ‘सिलकेशाईन आयुर्वेदिक शिकेकाईयुक्त पावडर’ वापरून तुम्ही या सर्व गोष्टींचा केसांसाठी लाभ घेऊ शकता. हे पावडर केसांवर वापरण्यासाठी तुम्हाला थोडा अवधी तर नक्कीच द्यावा लागेल.

सहसा हे पावडर गावातील किराणा दुकानात किंवा शहरातील आयुर्वेदिक दुकानांमध्ये उपलब्ध असते. तुम्हाला जर तुमचे केस काळेभोर, सुंदर ,मुलायम , चमकदार हवे असतील तर तुम्ही या पावडरचा नक्की वापर करावा. पावडरचा वापर केल्याने स्काल्पला आणि केसांना पूर्णपणे पोषण मिळते, या सोबतच केसांच्या वेगवेगळ्या समस्यांचे पण निराकरण होते.

कृती :

या पावडरचा केस धुण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने वापर करता येतो.
1. केसांना ओले करा, केसांच्या लांबीप्रमाणे काही चमचे पावडर एका वाटीमध्ये घेऊन त्यात थोडे थोडे पाणी टाकून एक पेस्ट तयार करा. केसांवर लाऊन 3 मिनिटे मालिश करून केस धुवून घ्या. हीच प्रक्रिया पुन्हा एकदा करा आणि बघा पावडरमध्ये असलेल्या पोषक जडी-बुटिंचा चमत्कार. आवश्यकतेनुसार वापर करा.

2. जर फक्त पाण्यासोबत पेस्ट बनवणे तुम्हाला आवडत नाही आहे. तर कोरफड घ्या आणि त्याच्या आतील गर काढा त्यात पावडर घालून पेस्ट तयार करा. यामध्ये तुम्ही गुलाबजल देखील टाकू शकता. ही पेस्ट केसांवर लावून मालिश करा आणि केस धुवून घ्या. मुलायम सुंदर केस तुम्हाला अनुभवायला मिळतील.

3. जर तुम्ही खूप घाईत आहात आणि वरील कृती करणे तुम्हाला शक्य नाही. तरी काही काळजी करण्याचे कारण नाही. तुम्ही केस धुवूताना तुमच्या हर्बल शाम्पू आणि कंडिशनर मध्ये हे पावडर मिक्स करून त्या मिश्रणाचा वापर करून शकता. या कृतीने देखील तुमच्या केसांना पोषण मिळण्यास नक्की मदत होईल.

सिल्केशाईन आयुर्वेदिक पावडरमधील पोषक तत्त्वे….

शिकेकाई

शिकेकाई ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. याच्या शेंगा कुटुन डोक्याला लावतात. या वनस्पतीचे शास्त्रीय नाव ‘अ‍ॅकेशिया रुगेटा’ हे आहे.ह्या वनस्पतींच्या अ‍ॅकेशिया ह्या प्रजातीतील एकूण ७०० जातींपैकी भारतात फक्त २५ जाती आढळतात. या झाडाला फुले गोलसर झुपक्यात येतात, ती लहान व पिवळी असून मार्च ते मे महिन्यांमध्ये येतात.

Shikekai

शिकेकाईचे इतरही फायदे आहेत.

शिकेकाईची पूड पाण्यात उकळून स्नानाकरिता वापरतात, केसातील लिखा व उवा यांचा त्यामुळे नाश होतो आणि केसांची वाढ चांगली होते, त्वचा कोरडी पडत नाही, रेशमी व गरम कपडे आणि डाग पडलेली चांदीची भांडी व उपकरणे धुण्यास ती पूड चांगली असते, शिकेकाईची पूड घालून केलेले मलम त्वचारोगांवर लावतात. इ.

रिठा

रिठा हा पानझडी वृक्ष ‘सॅपिंडेसी’ कुळातील असून त्याचे शास्त्रीय नाव ‘सॅपिंडस ट्रायफोलिएटस’ आहे. रिठाचे मूळ भारतातील असून त्याची लागवड पश्‍चिम बंगाल, बिहार, मध्य प्रदेश व उत्तर प्रदेश या राज्यात केली जाते. याखेरीज सह्याद्री परिसरात त्याची सॅ. लॉरिफोलियस ही जाती आढळते.

reetha

रिठ्याच्या फळांचा उपयोग मुख्यत : शरीरावरचा मळ काढण्यासाठी होतो. रिठ्याची फळे पाण्यात घुसळल्यास त्यांतील सॅपोनिने फेस तयार होतो. म्हणून त्यांचा उपयोग साबणासारखा केला जातो. लोकरीचे , रेशमाचे आणि नाजूक व तलम सुती कपड धुण्यासाठी रिठे वापरतात. हल्ली त्यांचा उपयोग वॉशिंग पावडरमध्ये सुद्धा करतात. सोन्याचे दागिने स्वच्छ व चकचकीत करण्यासाठी आणि साबण, शाम्पू व टूथपेस्ट बनविण्यासाठी तसेच कीटकनाशकांमध्ये रिठ्याची फळे वापरली जातात. मूळ व फळे आयुर्वेदिक आणि युनानी उपचार पद्धतींत औषधे म्हणून उपयोगात आणली जातात.

संत्र्याची साल आणि लिंबूची साल

संतरा आणि लिंबू यांमध्ये व्हिटॅमिन सी असते. जे केसांसाठी पोषक आणि आवश्यक आहे. तसेच या फळांच्या सालीमध्ये देखील अनेक पोषक तत्व असतात. साल वाळवून आणि त्याची पावडर करून वापर करता येतो. घरगुती हेअर मास्क आणि फेस पॅकमध्ये या सालीच्या पावडरचा वापर होतो.

Orange peel

आवळा

आवळा हे चवीने तुरट व आंबट , हिवाळ्यात येणारे, हिरव्या रंगाचे औषधी फळ आहे. आवळ्याला आयुर्वेदामध्ये फार महत्त्व आहे. ते एक उत्तम रसायन आहे. आवळा हा केसांच्या समस्यांवर गुणकारी आहे. त्यामुळे आवळ्याचा अर्क अन्य तेलात मिसळून केसाला लावायचे ‘आवळा तेल’ बनवतात.

हिरडा

हिरडा स्वास्थ्यसंवर्धक आणि रोगनाशक आहे. औषधात व आरोग्य वाढविणार्‍या द्रव्यात याचे स्थान महत्त्वाचे आहे. लोककथेनुसार एकदा इंद्र अमृत पीत असतांना त्यातील काही थेंब पृथ्वीवर सांडले. ते थेंब जेथे सांडले तेथे (त्या थेंबातून) हिरड्याची उत्पत्ती झाली. हिरड्यात गोड, आंबट, कडू, तिखट, तुरट हे पाच रस आहेत. फक्त खारट रस नाही. यातील गोड, तिखट आणि तुरट रसांमुळे पित्त दोषाचा नाश होतो. कडू, तिखट आणि तुरट रसांमुळे कफ दोष दूर होतो. तर गोड आणि आंबट या रसांमुळे वात दोष दूर होतो.

Hirda

बेहडा

बेहडा हा पानझडी वृक्ष काँब्रेटेसी कुळातील असून त्याचे शास्त्रीय नाव ‘टर्मिनॅलिया बेलिरिका’ आहे. बेहडा आणि हिरडा या फळांची साल आणि आवळकाठी (म्हणजे वाळलेल्या आवळ्याचे तुकडे) यांपासून ‘त्रिफळा चूर्ण’ हे आयुर्वेदिक रेचक तयार केले जाते. या चूर्णाचे अनेक औषधी उपयोग असून पोटाच्या तक्रारींवर तसेच कफ आणि पित्त या विकारांवर ते गुणकारी असते.

मुलतानी माती

मुलतानी मातीचा सर्वात मोठा गुण म्हणजे यामध्ये तेल, पाणी आणि रंग शोषून घेण्याची क्षमता असते. याशिवाय यामध्ये जास्त प्रमाणात मिनरल्स असतात.सौंदर्याच्या बाबत जर मुलतानी मातीच्या फायद्याबाबत सांगायचं झालं तर ही माती त्वचा आणि केसांसाठी अतिशय फायदेशीर आहे.

मुलतानी मातीचा उपयोग हा नैसर्गिक स्क्रब (Natural Scrub) म्हणून करण्यात येऊ शकतो, मुलतानी माती त्वचेवरील व्हाईट आणि ब्लॅक हेड्स (White and Black heads) काढून टाकण्यासाठी फायदेशीर आहे, मुलतानी माती डेड सेल्स (remove dead cells) काढून टाकून त्वचा क्लिन करते आणि त्वचेवरील घाण साफ करून उत्कृष्ट क्लिन्झर म्हणून काम करते. मुलतानी माती एक अँटीएजिंग एजंटसुद्धा मानली जाते.

जटामांसी

बाजारात मिळणारी औषधी मुळी जटामांसीचे भूमिगत खोड आहे. ते सर्व बाजूंनी तंतूंनी वेढलेले असते. त्यांतून बाष्पनशील तेल मिळते. या तेलाला ‘स्पाईकनार्ड तेल’ म्हणतात. प्राचीन काळापासून जगभरातील वेगवेगळ्या संस्कृतींत हे तेल सुगंधी द्रव्य तसेच जखमा भरून येण्यासाठी वापरातात. केसांच्या वाढीला आणि केस काळे होण्यास उपयुक्त ठरत असल्यामुळे या वनस्पतीला जटामांसी म्हणतात.

Jatamansi

जास्वंद फूल

जास्वंदाची मुळे तिखट, थोडीशी खारट व कडवट असतात. त्यांचा उपयोग खोकला, ताप व त्वचेवरील खाज कमी करण्यासाठी होतो. पाने वेदनाशामक व सौम्य रेचक समजली जातात. फुलांच्या पाकळ्यांचा रस, ऑलिव्ह तेलाबरोबर त्यातील पाणी निघून जाईपर्यंत मंद गॅसवर उकळून तयार झालेले तेल केसांच्या वाढीसाठी व केस रंगविण्यासाठी उपयुक्त असते.

ब्राम्ही

त्वचेच्या विकारांवर आणि कुष्ठरोगावर ब्राह्मी गुणकारी असते. चेतासंस्थेच्या विकारांवर ती प्रभावी समजली जाते. स्मरणशक्ती वाढविण्यासाठी जी औषधे बाजारांत उपलब्ध असतात, त्यांमध्ये ब्राह्मीचा वापर करतात. काही ‍ठिकाणी कढी, आमटी इत्यादींमध्ये पानांचा वापर करतात.

Bramhi

मेहंंदी

मेहंंदी ही सौंदर्यप्रसाधनांसाठी प्राचीन काळापासून वापरात असलेली एक वनस्पती आहे. मेहंंदीच्या पानांपासून नारिंगी रंग मिळतो. तो रंग तळहात, तळपाय, केस, दाढी, नखे रंगविण्यासाठी वापरतात. निळीबरोबर हा रंग काळा होतो. बाजारात जी काळी मेहंंदी मिळते ती बहुधा मेहंंदी व नीळ यांच्या मिश्रणातून तयार करतात. मेहंंदीच्या मुळांमध्ये लाल रंग असतो. मेहंंदीच्या खोडाची साल कावीळ, त्वचा रोग इत्यादींवर उपयुक्त असते. पानांचा लेप गळवे, जखमा, खरचटणे, भाजणे इत्यादींवर बाहेरून लावतात.

कडुलिंब

कडुलिंबाचे वृक्ष सगळ्या दृष्टीने औषधी आहे.याची पाने, काड्या वाटून, त्याचा रस उन्हाळात प्राशन केल्याने उन्हाचा त्रास होत नाही. काही लोक हा पेलाभर रस रोज पितात. त्यामुळे लठ्ठपणा कमी होतो. कडुलिंबाच्या काडीने दात घासल्याने दाताला किड लागत नाही. दाताना बळकटी येते. तसेच मुळव्याध व पोटातील कृमींवर उपयोगी आहे. कडुलिंबाची वाळलेली पाने धान्यात घातल्याने धान्याला कीड किंवा अळी लागत नाही. साबण, सौंदर्य प्रसाधने यात तसेच दंतमंजन, पेस्ट यामध्ये पण कडुलिंबाचा वापर करतात.

कापूर

कपूरचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. शरीरावर खाज आल्याने कापूर खोब-याच्या तेलात मिक्स करून शरीरावर लावल्यास आराम मिळतो, कापूर ऑईली स्किनसाठी खूप फायद्याचे ठरते. कापूर आणि ग्लिसरीन मिक्स करून लावल्यास पिंपल्स निघून जातात आणि चेहरा ताजातवाणा दिसतो. कापूराचा उपयोग सर्दी खोकला कमी करण्यासाठीही केला जाऊ शकतो. खोब-याच्या तेलात कापूर टाकून केसांना लावल्यास केस गळणे कमी होते.

Latest news
Related news

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here