fbpx
8.5 C
London
Sunday, February 5, 2023

क्रेडिट कार्डचा स्मार्ट उपयोग कसा करावा ? (How to Use Credit Card Smartly?)

मराठी माणूस जेंव्हा पारंपरिक पद्धतीने विचार करतो तेव्हा साहजिकच त्याचा विचार असतो कि कर्ज न काढताच जेवढी उलाढाल करता येईल तेवढी करावी हेच योग्य राहील पण क्रेडिट कार्डाचा स्मार्ट उपयोग कसा करून घेता येईल हे आपण आजच्या या भागात बघुयात.

१) पैसे भरण्यासाठी मिळणार कालावधी : क्रेडिट कार्डचा उपयोग आपण आपले व्यवहारात येणारे नेहमीचे खर्च जसे कि इलेक्ट्रिसिटी, टेलेफोन, मोबाईल वगैरेचे येणारे बिल्स (Utility Bills) भरण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने करू शकतो. तसेच आजकाल बऱ्याच Online Shopping च्या वेबसाईट्स उपलब्ध आहेत ज्यात आपण महिन्याचा किराणाही घेऊ शकतो. वेळोवेळी आपल्या स्टेटमेंटचे बिल भरत राहिले तरी ३० ते ५५ दिवस केलेल्या खरेदीची अथवा भरलेल्या बिलाची रक्कम बिनव्याजी आपण वापरू शकतो. म्हणजेच ३० ते ५५ दिवसांसाठी बिनव्याजी कर्ज असेही म्हणता येईल.

२) EMI ची सुविधा : मोठी खरेदी जसे कि टीव्ही, फ्रिज इत्यादी खरेदी करण्यासाठी याचा उपयोग आपण हफ्त्यांमध्ये म्हणजेच EMI मध्ये पैसे भरण्यासाठी सुद्धा करू शकतो. अर्थात यासाठी काही प्रमाणात व्याज द्यावे लागते.

३) रिवॉर्ड पॉईंट्स आणि डिसस्कॉउंट : हे क्रेडिट कार्ड वापरून केलेल्या खरेदीवर आपण रिवॉर्ड पॉईंट्स मिळवू शकतो ज्याचा वापर पुन्हा आपण आपल्या उपयोगाची खरेदी करण्यात सूट (Disscount) मिळवण्यासाठी करू शकतो.येथे उपयोगाची खरेदी यावर भर दिला आहे कारण या डिस्काउंटचा उपयोग गरज नसलेली खरेदी करण्यासाठी होणार नाही याची काळजी आपल्यालाच घावी लागते.

४) कॅशबॅक मिळवण्यासाठी : बऱ्याच बँक तसेच शॉपिंग किंवा युटिलिटी बिल (Utility Bill) भरण्याच्या वेबसाईट चांगल्या प्रमाणात कॅशबॅक ऑफर नेहमीच देत असतात त्याचाही स्मार्ट उपयोग करून घेता येईल.

Credit_card

५) क्रेडिट स्कोअर वाढवण्यासाठी : क्रेडिट कार्डचा चांगल्या प्रकारे उपयोग करत नियमितपणे बिल भरत गेल्यास क्रेडिट स्कोअरहि उत्तम होऊ शकतो जेणेकरून भविष्यात गृहकर्ज अथवा बिसिनेसलोन घेण्यासाठी मार्ग सोपा होऊ शकतो.

क्रेडिट कार्डाचा असा स्मार्ट उपयोग केला तर महिन्याच्या बजेटमध्ये आपण २० ते २५ टक्क्यांपर्यंतची बचत आपण नक्कीच करू शकतो. येथे आपली माहिती भरून आपण ICICI बँकेच्या क्रेडिट कार्डासाठी अर्ज करू शकता तसेच पैसाबाजारचा हा अर्ज भरून इतरही बऱ्याच बँकांचे पर्याय आपण बघू शकता जेणेकरून त्या त्या बँकेचे प्रतिनिधी आपली भेट घेऊन आपल्या गरजेनुसार क्रेडिट कार्ड सुचवू शकतात.

वाचकांना काही शंका असल्यास लेखाखाली अभिप्राय स्वागतार्ह आहेत. तसेच मनाचेTalks च्या फेसबुक पेजवर सुद्धा आपले शंकासमाधान केले जाईल.

Latest news
Related news

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here