आंबेहळदीचे ‘हे’ जबरदस्त फायदे नक्कीच वाचा !

अगोदरच्या काळी आंबेहळदीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात असे पायाला मुक्कामार लागला किंवा पायाला सूज आली तर आंबेहळद लावली जात होती.

0

अगोदरच्या काळी आंबेहळदीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात असे पायाला मुक्कामार लागला किंवा पायाला सूज आली तर आंबेहळद लावली जात होती. आंबेहळद आपल्या आरोग्यासाठी अत्यंत चांगली मानली जाते. आता सध्या आयुर्वेदिक दुकानात आंबेहळद मिळते. आंबेहळदीचे अनेक गुणकारी फायदे आहेत. चला तर मग जाणून घेऊयात आंबेहळदीचे नेमके कोणते फायदे आहेत. (Raw turmeric is good for the health)

– कोणत्याही कारणाने दुखापत होऊन रक्त साकळले असल्यास, आंबेहळद उगाळून लावावी.

– सूज कमी होऊन वेदना शांत होण्यासाठी.

– शरीरावर गाठ आल्यास, आंबेहळदीच्या लेपाने ती बसते.

– अंगावर खरका उठल्यास आंबेहळद, कडूजिरे, गोमूत्रात वाटून लावतात.

– लचकणे, मुरगळणे, सूजणे यावर आंबेहळदीचा लेप लावल्यास, वेदना कमी होतात.

– आंबेहळद आणि साय चेहऱ्यावर एकत्र लावल्यास त्वचेचा रंग उजळतो. आंबेहळदीचे चूर्ण घेतल्यामुळे अग्निमांध विकारात सत्वर फायदा होतो. भूक चांगली लागते आणि लहान व मोठय़ा आतडय़ातील वायू मोकळा होतो. पित्त प्रकृतीच्या व्यक्तींना पचनाकरिता आंबेहळदीचा विशेष उपयोग होतो. आंबेहळदीला हळदीप्रमाणेच लवकर कीड लागू शकते. त्यामुळे कीड न लागलेल्या आंबेहळदीचाच वापर लेप लावण्याकरिता आणि पोटात घेण्याकरिता प्रशस्त आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.