सोपा उपाय ! संत्र्यापेक्षा चारपटीने पेरू इम्युनिटी वाढवण्यात करू शकतो मदत

0

देशात कोरोनाच्या झालेल्या संक्रमणानंतर प्रत्येकजण इम्युनिटी वाढवण्याचे प्रयत्न करू लागला. अनेकांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काही औषधं सुरु केली तर काहींनी आयुर्वेदिक काढे पिण्यास सुरवात केली. काहीही करून प्रत्येकजण आपली शारीरिक रोगप्रतिकार शक्ती वाढवत असल्याचं पाहिला मिळत आहे. मात्र हीच रोगप्रतिकार शक्ती आपल्याला अगदी सोप्या पद्धतीने देखील वाढवता येऊ शकते. त्याला कडू औषधं किंवा महागड्या गोळ्या घेण्याचीही आवश्यकता नाही.

तसे पाहिला गेले तर आपल्या शरीराला आवश्यक असणारे पोषक घटक हे रोजच्या सात्विक जेवणातूनही मिळू शकतात. मात्र या पेक्षा जास्त रोगप्रतिकार शक्ती वाढवायची असेल तर निसर्गाची देणगी म्हणून लाभलेली फळे आपण खाली पाहिजेत. ज्यामुळे शरीरात रोग प्रतिकार शक्ती वाढतेच शिवाय कमी वेळात शरीराच्या उर्जेची झालेली कमतरता देखील फलाहाराने भरून निघते. यासाठी अनेकदा डॉक्टर्स देखील आपल्याला फळे खाण्याचा सल्ला देतात. मात्र हाचं सल्ला आपण कानामागे टाकून पैसे घालवून औषध खाण्यास पसंती देतो.

कोरोनाच्या दिवसात शरीरात रोग प्रतिकार शक्ती चांगली हवी, असे वारंवार सांगण्यात येत आहे. ज्यांची रोग प्रतिकार शक्ती चांगली त्यांना कोरोनाचा धोका नसल्याचं अनेक संशोधनातून पुढे आले आहे. त्यामुळे कोरोनाच्या काळात हीच रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी फळांची मदत घेणे फायदेशीर ठरेल.

रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी पेरू हे फळ तुम्हाला नक्कीच मदत करेल. व्हिटॅमिन सी आजारांशी लढण्याची शरीराची क्षमता मजबूत करते, परंतु आपल्याला कदाचित हे माहित नसेल की, पेरूमध्ये संत्रापेक्षा चारपट जास्त व्हिटॅमिन सी असते. पेरू चवदार असण्याबरोबर वजन कमी करण्यास उपयुक्त आहे. हे कॅलरीमध्ये खूप कमी आहे आणि फायबर आणि कोलेस्ट्रॉलचे प्रमाण समान आहे. हे त्वरीत पोट भरते, जेणेकरून आपल्याला लवकरच भूक लागणार नाही. साखरेचे प्रमाण कमी असल्याने मधुमेहाच्या रुग्णांना ते खूप फायदेशीर ठरते. याशिवाय हे फळ अनेक समस्या दूर ठेवण्यात फायदेशीर ठरते.

  • प्रतिकार शक्ती वाढते

व्हिटॅमिन सी रोगांशी  झुंज देण्याची शरीराची क्षमता मजबूत करते. संत्र्यापेक्षा पेरूमध्ये चारपट जास्त व्हिटॅमिन सी आहे. यामुळे खोकला, सर्दीसारख्या किरकोळ संसर्गापासून बचाव होतो. पेरूमध्ये असलेले फायबर आणि पोटॅशियम रक्तातील कोलेस्टेरॉल नियंत्रित करण्यास उपयुक्त ठरतात. पेरू खाल्ल्याने हृदयाचे  ठोके आणि रक्तदाब नियमित होतो. कोरोनाची लक्षणे सुरवातील सर्दी – ताप – कफ अशीच आहेत. त्यामुळे जर पहिल्यापासूनचं तुम्ही पेरू आणि संत्री खात असालं तर तुम्हाल कोरोना होण्याचा धोका कमी आहे. पेरूचे अन्य देखील फायदे आहेत.

  • अँटी-एजिंग गुणधर्मांमध्ये समृद्ध

अ‍ॅन्टी एजिंग गुणधर्म असलेल्या पेरू त्वचेच्या खराब झालेल्या पेशी निरोगी ठेवतात आणि तंदुरुस्त ठेवतात जेणेकरून त्वचेवरील सुरकुत्या आणि फ्रीकल्स लवकर येऊ नयेत. त्याची पाने बारीक करून पेस्ट बनवा, नंतर डोळ्याखाली लावा, यामुळे डोळ्यातील सूज आणि गडद वर्तुळे बरे होतील.

  • मधुमेहावर जालीम इलाज

पेरूमध्ये असलेले फायबर मधुमेह नियंत्रित करण्यास देखील उपयुक्त ठरते जे शरीरात साखरेचे प्रमाण संतुलितरित्या शोषून घेण्याचे कार्य करते. यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण लवकर बदलत नाही.

  • कर्करोग प्रतिबंध

पेरूमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडेंट लाइकोपीन असते. जे कर्करोगाच्या पेशी शरीरात वाढण्यास अटकाव घालते.

  • पोटाचा त्रास

जर आपण काळ्या मीठाने पेरूचे सेवन केले तर ते पाचन समस्या दूर करते. जर पोटात किडे असतील तर पेरूचे सेवन केल्यास फायदा होतो. पेरू बद्धकोष्ठता आणि पित्त यांचा त्रास देखील दूर करते.

  • दात मजबूत करा

दात आणि हिरड्यांसाठी देखील पेरू खूप फायदेशीर आहे. तोंडाचे फोड काढून टाकण्यासाठी पेरूची पाने चवल्यास आराम मिळतो. पेरूचा रस जखमा त्वरीत बऱ्या करण्यास मदत करते.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.