हवामान खात्याने (आयएमडी) आपले नवीन मोबाइल अॅप बाजारात आणले आहे. या अॅपचे नाव ‘मौसम’ आहे . या अॅपद्वारे लोकांना देशभरातील 450 शहरांमधील रीअल-टाइम मध्ये हवामानाचे सर्व रिपोर्ट पाहिला मिळतील. हवामानाबाबत माहिती देणारे हे पहिले सरकारी अॅप आहे.
पूर्वीचे हवामान-आधारित अॅप्स जुन्या डेटा आणि पावसाच्या निरीक्षणाविषयी माहिती देत असत. मात्र या हवामान अॅपचे लक्ष्य शहरी लोकसंख्या आहे. हवामानाचा अंदाज सांगण्याव्यतिरिक्त, हे अॅप रडार आणि उपग्रहाद्वारे प्राप्त केलेली छायाचित्रे देखील दर्शवेल, जी आधी केवळ आयएमडीच्या वेबसाइटवर पाहता येत होते.
वरिष्ठ अधिकाऱ्यांंनी सांगितले की, हे अॅप हायपरलोकल नकाशे आणि प्रादेशिक भाषांच्या पर्यायांसह पुढील वर्षी विस्तारित केले जाईल. पुढील वर्षापर्यंत अॅपद्वारे शेतकऱ्यांच्या सुविधांमध्ये वाढ केली जाईल. त्यांना जीपीएसवर दर तीन तासांनी हवामानाचे अपडेट्स प्राप्त होतील.
या अधिकारयाने सांगितले की, आम्हाला या अॅपच्या कार्यक्षेत्रात शहरे आणायची होती, कारण ग्रामीण भागाचा नकाशा बनवणे अधिक क्लिष्ट आहे. गेल्या वर्षीपासून या स्वदेशी अॅपवर काम सुरू होते. परंतु कोरोनामुळे लॉकडाउनमुळे हे लॉन्च होण्यास विलंब झाला.
पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या 14 व्या स्थापना दिनानिमित्त बोलताना केंद्रीय मंत्री हर्षवर्धन यांनी हवामान अंदाजाप्रमाणे पृथ्वी सिस्टम मॉडेलचा उपयोग करून मागील दोन वर्षात सरकारकडून रेन गेजिंग आणि क्लाउड सीडिंग यावर संशोधन झाल्याची माहिती दिली. या प्रयोगांमुळे आयएमडीला पावसाळ्याच्या हंगामाचे अधिक चांगले मूल्यांकन करण्यास आणि संभाव्य पाऊस असलेल्या भागात कृत्रिम पावसाची ओळख करुन कोरड्या भागात पाऊस पडण्यास मदत होईल.