अगदी सोप्या पद्धतीने बनवा मुळ्याचे पराठे, खायला चविष्ट आणि आरोग्यासाठी पौष्टिक…
हिवाळ्यात, मुळा सलाडमध्ये वापरला जातो, परंतु मुळ्याच्या गरम गरम पराठबद्दल काय सांगावे. आ हा…तोंडाला पाणी आले. जर नाश्त्यामध्ये हे पराठे लोणी, लोणचे किंवा चटणीबरोबर गरम खाल्ले तर पोट तर भरतेच पण त्यासोबत मन ही प्रसन्न होते. तर मग तुम्हीसुद्धा हे पराठे बनवून आपल्या कुटूंबाला खाऊ घाला. त्यानंतर तर घरचे तुमची स्तुती करता करता थकणार नाहीत याची खात्री आहे.
सामग्री:
2 मुळे, 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, एक वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, किसलेले आले, चमचाभर चाट मसाला, एक चमचा जिरे पूड, चवीनुसार मीठ, 3 कप पीठ, अर्धा चमचा ओवा, तूप किंवा लोणी.
कृती:
स्टेप 1 : सगळ्यात आधी एक भांड्यात ओवा आणि मीठ घालून कणिक मळून घ्या. कणिक अति मऊ झालेली नको.
स्टेप 2 : मुळे धुवून सोलून घ्या त्यांनतर किसून घ्या. मुळ्याचा किस थोडं थोडं आपल्या हातात घेऊन पिळा व त्यातील पाणी काढून घ्या.
स्टेप 3 : मुळ्याच्या किसामध्ये हिरवी मिरची, चिरलेली कोथिंबीर , चाट मसाला, जिरेपूड आणि मीठ घाला आणि हे सर्व नीट मिक्स करून घ्या.
स्टेप 4 : आता पराठे बनवायला सुरुवात करा. छोटी पोळी बनवून त्यात तयार केलेले मुळ्याचे सारण भरा आणि सर्व बाजुने पॅक करून घ्या. आता लाटायला सुरुवात करा. पराठा तयार झाल्यावर तव्यावर ठेऊन तूप किंवा लोणीने बेक करा.
स्टेप 5 : मुळ्याच्या पराठ्यांना लोणचे किंवा आवडीच्या चटणीबरोबर सर्व्ह करा. पराठ्यांना तुम्ही कोथिंबीरने किंवा चटणी किंवा बटरने गर्निश करू शकता.
हे पण वाचा
आज्जीचा बटवा : पानपुड्याची शोभा वाढवणारा ‘ओवा’ आहे आरोग्यदायी, जाणून घ्या फायदे…
छोट्या व्यावसायिकांना दिलासा म्हणून आयकर विभागाने आणली टॅक्स स्कीम, माहिती नसेल तर त्वरित जाणून घ्या
काय सांगताय, न्यूझीलँडमध्ये तब्बल 4 लाखात रोपटे विकले? जाणून घ्या कारण….