…म्हणून किडनीच्या रुग्णांंसाठी द्राक्षे ठरतायत वरदान, ‘हे’ आहेत थक्क करणारे फायदे

0

किडनी ऑर्गनायझेशनच्या मते जगातील जवळपास 10 टक्के लोक सध्या किडनीच्या आजाराने ग्रस्त आहेत. दरवर्षी उपचाराअभावी लोक मरत आहेत. किडनी हा अवयव आपल्या शरीराचा एक महत्वाचा भाग आहे. त्याचा आकार बीन सारखा असतो. किडनी शरीरातील अनेक महत्त्वपूर्ण कार्ये करते. किडनी वेस्ट प्रॉडक्ट फिल्टर करते, हार्मोन्स रिलीज करते आणि रक्तदाब नियंत्रित करते. याशिवाय शरीरातील द्रवपदार्थाचे संतुलन साधणे, यूरिन प्रोड्युस करणे हेसुद्धा किडनीचे कार्य आहे.

मधुमेह आणि उच्च रक्तदाब किडनी डॅमेजची मुख्य कारणे आहेत. या व्यतिरिक्त लठ्ठपणा, धूम्रपान, अनुवंशिक इतिहास आणि वृद्धत्व देखील किडनी डॅमेज होण्यास कारणीभूत असतात. जर किडनी योग्यप्रकारे कार्य करत नसेल तर वेस्ट मटेरियल रक्तामध्ये जमा होऊ लागतात.

किडनीची काळजी कशी घ्यावी?

जर तुम्हाला किडनीची काळजी घ्यायची असेल तर काही गोष्टींकडे लक्ष द्यावे लागेल. ज्यात आहारही असतो. असे काही पदार्थ आहेत, जे किडनीच्या आरोग्यासाठी सर्वोत्तम मानले जातात. जर आपण डेली रुटीनमध्ये या आहाराचा समावेश केला तर किडनीचे आजार होण्याची शक्यता खूप कमी असते. याव्यतिरिक्त, किडनीचे रूग्ण आहारात या पदार्थांचा समावेश करून किडनीचे आरोग्य सुधारू शकतात. यातील एक पदार्थ म्हणजे द्राक्षे.

किडनी आहारामध्ये द्राक्षांचा समावेश करणे ‘यांसाठी’ महत्वाचे आहे.

– मूठभर द्राक्षे किडनी अनुकूल आहाराचा एक महत्त्वाचा भाग बनू शकतात. ते चवदार आणि खाण्यास सोपे आहेत. त्यात बरेच पौष्टिक पदार्थ आढळतात.

-यामध्ये फायटोकेमिकल्स आहेत. फायटोकेमिकल प्लांट कॉम्पोनंट्स आहेत जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. ते रक्तवाहिन्यांना आराम देतात, जळजळ कमी करण्याचे कार्य करतात.

-याबरोरच द्राक्षे फ्री रॅडिकल्सचे ऑक्सिडेशन म्हणून देखील कार्य करतात.

-किडनीच्या आजाराने ग्रस्त असलेल्या कोणालाही हे फायदेशीर ठरू शकते, कारण हृदयातील आजार आणि जळजळ होण्याचा धोका किडनीच्या रुग्णांमध्ये सामान्य लोकांपेक्षा जास्त असतो.

-मधुमेह नेफ्रोपॅथी हे किडनीच्या आजाराचे एक प्रमुख कारण आहे. बर्‍याच अभ्यासामध्ये असा दावा केला गेला आहे की, द्राक्षातील बिया आणि द्राक्षात सापडलेला घटक रेस्वेट्रॉल किडनीचे आजार रोखण्यासाठी असरदार असतात.

-नॅशनल किडनी फाउंडेशनच्या म्हणण्यानुसार आपण 15 द्राक्षांचे रस पिऊन किडनीचे आरोग्य सुधारू शकता.

-जास्त चरबीयुक्त आहारामध्ये द्राक्षे किडनीचे नुकसान कमी करू शकतात. लठ्ठ लोकांना किडनी निकामी होण्याचा जास्त धोका असतो कारण यामुळे किडनीमध्ये कॉपरची कमतरता उद्भवू शकते. द्राक्षांची साल आणि बियामध्ये असे अँटीऑक्सिडंट्स आढळतात जे या समस्येवर निवारणासाठी मदतगार असतात.

-एंथोसायनिन हे पॉलिफेनॉल अँटीऑक्सिडेंट आहे जे द्राक्षे, द्राक्षाचा रस आणि रेड वाइनला लाल-बैंगनी रंग देतात. लाल द्राक्षांमध्ये व्हिटॅमिन सी आणि फ्लेव्होनॉइड्स नावाचे अँटीऑक्सिडेंट असतात.

(टीप : ही माहिती आवडली असेल तर शेअर करा आणि आणखी माहिती मिळवण्यासाठी आमच्या IMP Marathi या फेसबुक पेजला लाईक करा)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.