…म्हणून पिंपळाच्या झाडाला देतात एवढे महत्व, झाड एक पण फायदे अनेक

0

अध्यात्म आणि आयुर्वेदामध्ये आपण नैसर्गिक औषधांबद्दल माहिती घेत असतो. निसर्ग हा आपल्या जीवनाचा एक महत्वाचा भाग आहे. पृथ्वीवर अशी काही झाडे आहेत ज्याचा उपयोग शरीर निरोगी ठेवण्यासाठी केला जाऊ शकतो. आज आम्ही आपल्या जीवनासाठी प्रसिद्ध असलेल्या पिंपळाच्या पवित्र झाडाबद्दल माहिती सांगणार आहोत.

भारतात पिंपळाची पूजा करतात. पिंपळाच्या झाडाचे जितके धार्मिक महत्त्व आहे तितकेच त्याचे आरोग्यदायी फायदे देखील आहेत. आयुर्वेदातील सुश्रुत संहिता आणि चरक संहिता पिंपळाच्या औषधी गुणधर्मांचे वर्णन करतात. पाने, साल यासारख्या पिंपळाच्या वेगवेगळ्या भागाच्या वापरामुळे ताप, दमा, खोकला आणि त्वचेशी संबंधित अनेक समस्यांपासून मुक्तता मिळते.

औषधी गुणधर्मांनी युक्त अशा या पिंपळाच्या झाडांचे महत्त्व जाणून घेऊया…

हे आहेत पिंपळाचे फायदे

  •  पिंपळामुळे ताण कमी होतो.
  •  पिंपळामुळे डोळ्याच्या सर्व समस्या दूर होतात.
  • पिंपळाची पाने सावलीत वाळवून काढा बनवून पिल्यास थंडीच्या दिवसात सर्दी पासून बचाव होतो.
  • भूक वाढवण्यासाठी पिंपळाचा वापर होतो.
  • पिंपळ शारीरिक दुर्बलता दूर करते.
  • पिंपळ सर्दी आणि खोकल्यासाठी फायदेशीर आहे. पिंपळाच्या झाडाची साल घेऊन तिचा आतील भाग वाळवा. या वाळलेल्या भागाची भुकटी खाल्ल्यास श्वासोच्छवासाशी संबंधित सर्व समस्या दूर होतात.
  • पिंपळाची पाने बद्धकोष्ठता किंवा गॅसच्या समस्येसाठी औषध म्हणून वापरली जातात. तसेच पिंपळ हे पित्त नष्ट करणारा देखील मानला जातो, म्हणून त्याचा वापर पोटातील समस्यांसाठी फायदेशीर ठरतो.
  • पिंपळाची कवळी पाने खाल्ल्यास किंवा त्याचा काढा बनवून पिल्यास खाज सुटणे या त्वचेच्या समस्येमध्ये फायदेशीर ठरते.
  • फोड येणे आणि मुरुमांच्या बाबतीत झाडाची साल चोळल्यास फायदा होतो.
  • त्वचेचा रंग वाढविण्यासाठी, पिंपळाची साल किंवा त्याच्या पानांचा पेस्ट वापरला जातो. तसेच असे केल्याने त्वचेवरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते.

औषधी गुणधर्मांनी युक्त अशा या पिंपळाच्या झाडांचे आरोग्यदायी फायदे

पोटदुखी : पिंपळाच्या २-५ पानांची पेस्ट बनवून त्यात ५० ग्रॅम गुळ घालून मिश्रण बनवा आणि या मिश्रणाच्या लहान लहान गोळ्या बनवून दिवसातून ३-४ वेळा खा. पोटदुखीवर आराम मिळेल.

अस्थमा : पिंपळाच्या झाडाची साल आणि पिकलेल्या फळांची वेगवेगळी पावडर बनवून ती सम प्रमाणात एकत्र करा. आणि हे मिश्रण दिवसातून ३-४ वेळा खा. अस्थमा दूर होण्यास नक्कीच मदत होईल.

साप चावल्यावर : विषारी साप चावल्यावर पिंपळाच्या कोवळ्या पानांचा रस दोन थेंब घ्या आणि त्याची पाने चावून खा. त्यामुळे विषाचा असर कमी होण्यास मदत होईल.

त्वचारोग: पिंपळाची कोवळी पाने खाणे त्वचेच्या रोगांवर उपचारात्मक ठरते.

पावलांना भेगा पडणे :पिंपळाच्या पानांचा रस भेगा पडलेल्या पावलांवर लावणे, लाभदायी ठरते.

रक्ताची शुद्धता : १-२ ग्रॅम पिंपळ बीज पावडरमध्ये मध मिसळून रोज दोन वेळा घेतल्याने रक्त शुद्ध होते.

हे पण वाचा

आज्जीचा बटवा:  विड्याच्या पानांचे ‘हे’ औषधी गुणधर्म तुम्हाला माहित आहेत का ?

आज्जीचा बटवा : मुखशुद्धीसाठी असलेली विलायची आहे अधिक गुणकारी, जाणून घ्या फायदे….

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.