इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्याची ५ कारणे…

0

‘इलेक्ट्रिक’ वाहन हे वाहन क्षेत्राचे भविष्य आहे. अर्थात याचे अनेक फायदे आहेत. शिवाय ही वाहने पर्यावरणपूरकही आहेत. त्यामुळे या वाहनांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

पर्यावरणाचा असमतोल ही संकटाकडे ही गंभीर समस्या आहे. अनेक देश तसेच काही तज्ज्ञ व्यक्ती याविषयी जनजागृती करत आहेत. वैयक्तिक पातळीवर कार्बन फुटप्रिंट कमी करणे,प्लास्टिकचा वापर बंद करणे, यासाठी सर्वसामान्य जनताही प्रयत्न करत आहे. शास्त्रज्ञ यासाठी नवीन मार्गाच्या शोधात आहेत. विविध मार्गाने पर्यावरणाचे झालेले अतोनात नुकसान भरून काढण्याचा प्रयत्न चालू आहे. स्वच्छ उर्जेवर चालणाऱ्या वाहनांचा वापर हे त्याच दिशेने टाकलेले एक पाऊल आहे. काही वाहन निर्मात्या कंपन्यांनीही आता इलेक्ट्रिक वाहन निर्मितीवर भर देण्यास सुरुवात केली आहे. एमजी मोटरने (मॉरिस गॅरेज) देखील जानेवारी महिन्यात ‘झेडएस ईव्ही लॉन्च’ या गाडीसोबत या क्षेत्रात पाऊल ठेवले असून, याला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. वाहन खरेदी करताना, इलेक्ट्रिक वाहन का खरेदी करावे याबद्दल जाणून घेऊयात.

इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्याची ५ कारणे

१. वाहनांचे भविष्य – इलेक्ट्रिक वाहने:

  • वाहन क्षेत्राने तंत्रज्ञानामध्ये चांगलीच प्रगती केली आहे.या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी म्हणजे इलेक्ट्रिक वाहने.
  • वाढत्या प्रदूषणावरील हा एक उत्तम आणि  तर्कशुद्ध उपाय आहे.
  • इलेक्ट्रिक वाहनांच्या वाढत्या पसंतीमुळे जीवाश्म इंधनावर चालणाऱ्या वाहनांच्या विक्रीवर परिणाम होत आहे. यातच याचे भवितव्य दिसून येतंय.
  • तांत्रिक प्रगतीमुळे अपारंपरिक व शाश्वत ऊर्जा स्रोत हे अधिक व्यवहार्य असून आणि किंमतीनुसार विचार केल्यास अधिक परवडण्यासारखे आहेत,
  • वाहन उद्योग नावीन्यपूर्ण वीज निर्मिती पर्याय स्वीकारत आहे. परिणामी, इलेक्ट्रिक आधारीत वाहने ही सर्वसामान्य गोष्ट  बनत चालली आहे. पर्यायाने ‘इंटर्नल कम्बस्शचन इंजिन्स (ICE)’ हे या चक्रात मागे पडत आहेत.

२. IoT तंत्रज्ञानाचा वापर – स्टे कनेक्टेड:

  • IOT तंत्रज्ञानाच्या उदयामुळे ‘कनेक्टेड सोसायटीज’ या संकल्पनेला पसंती मिळत आहे. भविष्याचा विचार करता इलेक्ट्रिक वाहनांमध्ये विविध प्रकारच्या अत्याधुनिक वाहन वैशिष्ट्यांचा तसेच ऑपरेशन्सचा समावेश असणार आहे.
  • इलेक्ट्रिक वाहनांमध्ये आपण अनेक गंभीर गोष्टींवर नियंत्रण ठेवू शकतो.
  • उदा. आपले वाहन जिओफेन्सिंग करणे, त्याचे लोकेशन तपासणे, जवळपासचे चार्जिंग स्टेशन शोधण्यासाठी चार्जिंगची स्थिती पाहणे, इथपासून दूरूनच कार प्री कूल किंवा प्री हीट करण्यासाठी एसी सिस्टिम स्मार्टफोनद्वारे ॲक्टिव्हेट करता येते.
  • जगातील अग्रगण्य उत्पादकांनी तयार केलेल्या या इलेक्ट्रिक वाहनांमध्ये ‘इन-बिल्ट ओटीए क्षमता’ असतात. म्हणजेच ही कार नेहमीच अप-टू-डेट माहितीनुसार काम करते.

३. उत्तम लेगरूम व स्टोरेज:

  • दुचाकी असो वा चार चाकी सर्व इलेक्ट्रिक वाहने गिअरलेस आहेत. याचा अर्थ असा की, या वाहनांमध्ये प्रशस्त आणि आरमदायक केबिन, लेगरुम आणि स्टोरेजसाठीभरपूर जागा असते.
  • गिअर लिव्हर नसल्याचा आणखी एक फासदा म्हणजे केबिनच्या मागील भागात एक सपाट जागा असते, त्यामुळे मध्यभागी बसलेल्या प्रवाशालादेखील उत्तम प्रवासाचा आनंद मिळतो.
  • पारंपरिक इंजिन नसल्यामुळे समोरील हुडखाली मोठी जागा असून, मिळालेली अधिकची जागा स्टोरेजसाठी वापरता येते.

४. प्रवासाचा आनंद:

  • कोणतेही यांत्रिक इंजिन नाही म्हणजे गोंगाट नाही. इलेक्ट्रिक मोटर कोणताही आवाज न करता काम करते. त्यामुळे प्रवासी आणि चालकाला आवाज विरहित प्रवासाचा अनुभव घेता येतो.
  • यामध्ये तुम्ही कोणत्याही अडथळ्याशिवाय निवांतपणे वर्तमानपत्र किंवा कादंबरी वाचू शकता, तसेच आपल्या आवडत्या  संगीताचा आनंद घेऊ शकता.

५. सुपर स्मूथ ड्रायव्हिंग:

  • इलेक्ट्रिक मोटर ही केवळ आवाजविरहित असते. त्यामुळे सर्वोत्कृष्ट व विनाअडथळा वाहन चालवता येते.
  • हा अनुभव  इतर पारंपरिक वाहनांमध्ये सहसा घेता येत नाही.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.