fbpx
2.8 C
London
Monday, February 6, 2023

Hondaच्या आतापर्यंतचे सर्वात जास्त विकले गेलेल्या ब्रँड न्यू सिविक कारचे जाणून घ्या स्पेसिफिकेशन !

कोरोनाच्या संक्रमणामुळे ऑटोमोबाईल क्षेत्राला मोठा फटका बसला असला तरी ऑटो कंपन्यांनी माघार न घेता आपल्या ग्राहकांसाठी बाजारात नवीन मॉडेल लाँच करण्याचा धडका लावला आहे. याच पार्श्वभूमीवर होंडा कार्स इंडिया लि. (HCIL) ने बाजारत आता नवीन होंडा सिविक आणली आहे. ही ब्रँड न्यू सिविक BS 6 जनरेशन मधील असून सध्या बाजारत याचे डीझेल व्हेरीएंंट आले आहे.

न्यू सिविक ही सर्वाधिक काळ टिकणारी कार मॉडेल असून हे होंडाचे सर्वाधिक विक्री होणारे मॉडेलही आहे. हे मॉडेल एक आकर्षक स्पोर्टी डिझाइन, प्रीमियम इंटिरियर, मजबूत ड्रायव्हिंग परफॉरमन्समध्ये असून कंपनीने यात सुरक्षेच्या दृष्टीकोनातून विशेष बदल केले आहेत. यासह, मुख्य तंत्रज्ञानामध्येही अपेक्षित बदल केले असल्याने ग्राहकांना उत्कृष्ट ड्रायव्हिंग अनुभव येईल असा दावा कंपनीने केला आहे.

सिव्हिकचा बीएस -6 डिझेल व्हेरिएंट ही ड्रीम टेक्नॉलॉजी मालिकेच्या 1.6 लीटर आय-डीटीईसी डिझेल टर्बो इंजिनसह सुसज्ज आहे. ही कार 23.9 किमी / प्रती लीटर मायलेज देते. त्यामुळे कमी इंधनात गाडी जास्त अंतर पार करेल तसेच ग्राहकाचे इंधनावर खर्च होणारे पैसे वाचवण्यास नक्कीच मदत होईल, असेही कंपनीकडून सांगण्यात येत आहे. यासह इंजिनमध्ये 6-स्पीड मॅन्युअल ट्रांसमिशन आहे.

नवीन सिविक बीएस -6 चे डिझेल रूपे व्हीएक्स आणि झेडएक्स ग्रेडमध्ये उपलब्ध आहे. Honda Civic Diesel (BS-6) VX MT ची किंमत 20,74,900 रुपये आहे तर ZX MTची किंमत 22,34,900 रुपये आहे.

या कारच्या लॉन्चिंगच्या वेळी होंडा कार्स इंडिया लिमिटेडचे ​​अधिकारी राजेश गोयल म्हणाले की, होंडा आपली नवीनतम आणि प्रगत कार पर्यावरण अनुकूल तंत्रज्ञान भारतीय बाजारपेठेत आणण्यासाठी वचनबद्ध आहे. डिझेल सिविक मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये उपलब्ध आहे आणि उत्कृष्ट ड्रायव्हिंगचा अनुभव शोधत असलेल्या ग्राहकांना ते आकर्षित करेल.

लेटेस्ट अपडेट : होंडा सिविक जुलै महिन्यात 1.50 लाखांपर्यंत सवलतीत खरेदी करता येणार आहे.

होंडा सिविक रिविव्ह

होंडा सिविक पुन्हा भारतात परतली आहे. ही कार मार्च 2019 मध्ये लाँच केले होती. आता या कारचे दहावे जनरेशन बाजारात दाखल झाले आहे. नवीन सिविक जुन्या सिविक पेक्षा बरेच लांब आणि विस्तृत आहे, त्याची रचना देखील पूर्वीपेक्षा अधिक वेगळी आहे. कूप सारखी डिझाइन देण्यासाठी त्याची उंची कमी केली आहे. नवीन सिविकमध्ये डिझाइनसह इतरही अनेक महत्त्वपूर्ण बदल केले गेले आहेत.

होंडा सिव्हिक इंजिन, परफॉरमन्स आणि मायलेजः 2020 सिव्हिक सेडान बीएस6 नॉर्मसह पेट्रोल आणि डिझेल इंजिन या दोन्ही पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. होंडा सिव्हिक पेट्रोलमध्ये 1.8 लीटर इंजिन आहे जे 141 पीएस शक्ती आणि 174 एनएम टॉर्क जनरेट करते. यात फक्त पेट्रोल इंजिनसह सीव्हीटी गीअरबॉक्स आहे. त्याचे मायलेज 16.5 किमी / प्रती लीटर असल्याचा दावा केला जात आहे. सिविक डिझेलमध्ये 1.6 लीटर इंजिन आहे. जे 120 पीएस पॉवर आणि 300 एनएम टॉर्क जनरेट करते. डिझेल इंजिनसह केवळ 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स येतो. त्याचे मायलेज 23.9 किलोमीटर प्रतिलिटर असल्याचा दावा केला जात आहे.

दरम्यान येत्या काही दिवसात होंडा सिटीचे नवीन मॉडेल देखील लॉन्च होणार असल्याची चर्चा होती. हे नेक्स्ट जनरेशन मॉडेल बुधवारी म्हणजे ( 15 जुलै ) लॉन्च झाले. हे मॉडेल अत्याधुनिक तंत्रज्ञानाने भरलेले असले तरी ग्राहकांच्या पसंतीची जुनी होंडा सिटी बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे.

Latest news
Related news

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here