fbpx
-1.2 C
London
Thursday, December 8, 2022

जबराट ! महिंद्राची बाजारात येणार पहिली SUV ई-कार, 100% चार्जिंगमध्ये देणार ‘एवढे’ अॅॅव्हरेज

बदलत्या काळानुसार मानवाने नेहमीच आपल्या जीवन शैलीत बदल केले आहेत. याच अनुषंगाने मानव आता ई कारच्या वापराकडे वळला आहे. प्रत्येक वाहन निर्मित कंपनी आता प्रभावी आणि शक्तीशाली ई-कार बनवण्याच्या प्रयत्न करत आहे. असाच प्रयत्न महिंद्र अँड महिंद्रा कंपनीने केला असून लवकरच भारतात ही कंपनी e-KUV100 ही इलेक्ट्रिक SUV रोल आउट करणार आहे.

प्रदूषण आणि इंधनांच्या वाढत्या किंमतींमुळे सर्वसामन्य नागरिक आता इलेक्ट्रिक गाडीला प्राधान्य देत आहेत. अजूनही भारतात तरी पूर्णपणे ई – कारची मागणी होत नसली तरी काही स्तरावर ई कारचे महत्व लोकांना पटू लागले आहे. हीच भविष्यातील गरज ओळखून महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने ही नवीन इलेक्ट्रिक SUV कार आणली आहे.

e-KUV100 (1)

#SUV e-KUV100 मध्ये काय आहे विशेष ?

महिंद्रा कंपनीने याआधी देखील इलेक्ट्रिक कार आणली होती. या कारला अनेकांनी पसंतीही दर्शवली. मात्र आता SUVमध्ये प्रथमच इलेक्ट्रिक कार असल्याने यामध्ये विशेष फीचर्स नक्कीच असणार आहेत.

महिंद्रा e-KUV100 ही कंपनीची इन-हाउस इलेक्ट्रिक कार आहे. ही कर लिक्विड-कूल्ड बॅटरी पॅकसह सुसज्ज आहे. ज्यामुळे वेगाने गाडी चार्ज होण्यास मदत होते. केवळ 55 मिनिटांत 80% चार्ज होऊ शकते.

महिंद्रा ई-केयूव्ही 100 मध्ये सिंगल इलेक्ट्रिक मोटर आहे जी 54.35 PS पॉवर आणि 120 NM टॉर्क जनरेट करते. कंपनीने दावा केल्यानुसार 15.9 किलोवॅट क्षमतेच्या बॅटरीसह ई-केयूव्ही 100% चार्जिंग केल्यानंतर 147 किमीपर्यंत पळू शकते.

ई-केयूव्ही 100 मध्ये रिमोट डोर लॉक आणि अनलॉक, केबिन प्रीकुलिंग, लोकेशन ट्रॅकिंग, रिमोट डायग्नोस्टिक, ड्रायव्हिंग पॅटर्न मॉनिटर, 7 इंचाचा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, स्टीयरिंग माऊंट ऑडिओ कंट्रोल आणि स्टँडर्ड ड्युअल एअरबॅग सारख्या फीचर्सचा समावेश आहे.

e-KUV100 (2)

ई – कार काळाची गरज ?

प्रत्येक जण आज ई कारही काळाची गरज आहे असे सांगत आहे. इंधनाचे असणारे मर्यादित साठे, दिवसेंदिवस वाढता वापर, आणि त्यातून निर्माण होणारे प्रदूषण ही कारणंं ई कार का वापरावी हे सांगण्यास परिपूर्ण आहेत. ते खरे देखील आहे.

प्रत्येक देश आज लाखो – करोडो लिटर इंधन दररोज वापरत आहे. त्यात वाहन क्षेत्र सर्वात जास्त इंधन पीत आहे. त्यामुळे कधीना कधी या वाढत्या वापरला आवर घालावा लागणार आहे. हा आवर घालण्यासाठी पर्याय तर हवाच ! यासाठीच आता ई कार हा उत्तम पर्याय शोधण्यात आला आहे.

भारता सारख्या देशाला हा पर्याय परिपूर्ण आहे का चर्चेचा विषय ठरू शकतो. मात्र आता अनेक देशांनी ई कारला प्राधान्य दिले आहे. जपान सारख्या देशात हा पर्याय 20 वर्षापूर्वीच अमलात आणला असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे ई कार ही इंधन आणि पर्यावरणाचे संवर्धनासाठी येत्या काळाची गरज असणार आहे.

Latest news
Related news

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here