YAMAHAचे FZ 25 आणि FZS 25 ची बीएस 6 मॉडल लॉन्च, असे आहेत नवीन फीचर्स

0

यामाहाने (YAMAHA) FZ 25 आणि FZS 25 ची BS 6 मॉडल लॉन्च केली आहेत. BS 6 यामाहा एफझेड 25 ची किंमत 1.52 लाख रुपये आहे, जी BS4 मॉडेलपेक्षा सुमारे 15 हजार रुपये जास्त आहे. त्याचबरोबर BS6 यामाहा एफझेडएस 25 ची किंमत 1.57 लाख रुपये आहे, जी bS 4 मॉडेलपेक्षा सुमारे 5 हजार रुपये जास्त आहे. दोन्ही अपडेटेड मोटारसायकली 10 हजार रुपयांमध्ये बुक करता येणार आहेत.

BS 6 एफझेड 25 आणि एफझेडएस 25 चे अनावरण यावर्षी फेब्रुवारीमध्ये करण्यात आले होते. त्यांची विक्री एप्रिलमध्ये सुरू होणार होती, परंतु कोविड 19 आजारामुळे लाँचला उशीर झाला आहे. यामाहा एफझेड 25 बाइक मेटलिक ब्लॅक आणि रेसिंग ब्लू कलरमध्ये आली आहे. तसेच, एफझेडएस 25 तीन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे, ज्यात पॅटिना ग्रीन, व्हाइट-वर्मीयन आणि डार्क मॅट ब्लूचा समावेश आहे.

या दोन्ही यामाहा बाईक्समध्ये बीएस 6 कम्पिलियंट 249 सीसी एअर कूल्ड, एसओएचसी, 4-स्ट्रोक, फ्यूल-इंजेक्शन तंत्रज्ञानासह सिंगल सिलिंडर इंजिन आहे. हे इंजिन 8,000 आरपीएम वर 20.8ps उर्जा आणि 6,000 आरपी वर 20.1 एनएम टॉर्क जनरेट करते. या दोन्ही यामाहा बाईक्स ड्युअल चॅनल एबीएस सज्ज आहेत. एफझेड 25 चे वजन 153 किलो आणि एफझेडएस 25 चे वजन 154 किलो आहे.

फीचर्स

फीचर्सविषयी बोलायचे झाल्यास, अपडेटेड गाड्यांमध्ये मल्टी-फंक्शन निगेटिव एलसीडी इंस्ट्रूमेंट क्लस्टर, LED DRL, क्लास D बाइ-फंक्शनल LED हेडलैम्प, अंडर काउलिंग आणि इंजन कट-ऑफ स्विच मिळणार आहे. एफझेडएस -25 ला लांब व्हिझर, हँडल ग्रिप्स आणि ब्रश गोल्डन अ‍ॅलोय व्हील्सवर ब्रश गार्ड मिळतात.

सर्वात स्वस्त 250 सीसी बाईक

या दोन्ही यामाहा मोटारसायकली अजून देशातील सर्वात स्वस्त 250 सीसी बाईक आहेत. त्यांच्या स्पर्धेत येणार्‍या बजाज डोमिनर 250 ची किंमत 1.60 लाख रुपये आहे. त्याच वेळी, सुझुकी जिक्सर 250 आणि सुझुकी जिक्सर एसएफ 250 ची किंमत अनुक्रमे 1.65 लाख आणि 1.76 लाख आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.