BS6 Mahindra Mojo 300 ABSची प्री-बुकिंग सुरु, फक्त 5 हजारात करा बाईक बुक

0

महिंद्रा टू व्हिलर्सने BS 6 महिंद्रा मोजो 300 एबीएसची प्री बुकिंग सुरू केली आहे. कंपनीच्या डिलरशिपमधून बाईक 5 हजार रुपयांत बुक करता येणार आहे. ही नवीन महिंद्रा मोजो लवकरच बाजारात लॉंच होणार आहे. महिंद्रा टू-व्हील्सने नुकताच टीझर रिलीज केला असून त्याबद्दल माहिती दिली आहे. बीएस 6 मोजो 300 बाजारात बजाज ऑटोच्या डोमिनार 250 सह थेट स्पर्धा करणार आहे.

Mahindra Mojo 300

नवीन महिंद्रा मोजोला बीएस 4 मॉडेलसह 295 सीसी, सिंगल-सिलिंडर, फ्यूल-इंजेक्टेड, ऑईल-कूल्ड इंजिन मिळेल, जे आता बीएस 6 अनुरूप असेल. अपग्रेड केलेल्या इंजिनची आउटपुट माहिती अद्याप मिळालेली नाही. बीएस 4 व्हर्जनमध्ये हे इंजिन 7,500 आरपीएम वर 26 बीएचपीची शक्ती आणि 5,500 आरपीएमवर 28 एनएम टॉर्क जनरेट करते. अशी अपेक्षा आहे की बीएस 6 आवृत्तीमधील इंजिनचे उत्पादन बीएस 4 च्या समान असेल. हे इंजिन 6-स्पीड गिअरबॉक्ससह मिळणार आहे.

नवीन रंगांचे पर्याय

महिंद्राने दुचाकी लाँच करण्यापूर्वी बीएस 6 मोजोची छायाचित्रे प्रसिद्ध केली असून यामध्ये बाईक अनेक रंगांच्या पर्यायांमध्ये येणार असल्याचे समोर आले आहे. यामध्ये गार्नेट ब्लॅक, रुबी रेड, ब्लॅक पर्ल आणि रेड ऐगट रंग आहे. रुबी रेड आणि रेड ऐगट ड्युअल-टोन आहेत, तर इतर दोन्ही एकल टोन रंग आहेत. गार्नेट ब्लॅक आणि रुबी रेड कलर ऑप्शन्समध्ये दुचाकीच्या चाकांवर लाल पिनस्ट्रिप मिळेल, तर इतर दोन्ही रंगांची ब्लॅक व्हील आहेत.

Mahindra Mojo 300 (1)

डिझाइन आणि स्टाईल

अद्यावत केलेली मोझो बाईक ड्युअल-पॉड क्लस्टरसह सिग्नेचर हेडलॅम्प काऊल, साइड पॅनलवर 300 एबीएस स्टिकर, विस्तीर्ण हँडलबार आणि लांब सिंगल-पीस सीटसह येईल. बाईकच्या वाढीव टाकीच्या आच्छादनावर ‘बीएस 6’ बॅज देण्यात आला आहे.

सस्पेंशन आणि ब्रेकिंग

ही महिंद्रा बाइक टेलेस्कोपिक फ्रंट फोर्क्स और रियर मोनोशॉक अब्जॉर्बर्स सस्पेंशनसह येईल. यास पुढील बाजूस 320 मिमी डिस्क ब्रेक आणि मागील बाजूस 240 मिमी. बाईक ड्युअल चॅनल एबीएस (अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम) सुसज्ज असेल. तेच सस्पेंशन आणि ब्रेकिंग सेटअप मोजोच्या बीएस 4 मॉडेलमध्ये होते.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.