fbpx
2.8 C
London
Monday, February 6, 2023

TVS Zest 110 BS6 स्कूटर ET-Fi टेक्नोलॉजीसह लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

TVS मोटर कंपनीने अपडेटेड BS 6 इंधन उत्सर्जन इंजिनसह Zest 110 स्कूटर लॉन्च केले आहे. चेन्नई मधील 2020 TVS Zest 110 BS 6 एक्स शोरूम मध्ये या स्कुटरची किंमत 58,460 रुपये आहे. Zest 110 BS6 स्कूटर हिमालयन हाय सीरिज आणि मॅट सीरिज अशा दोन प्रकारांमध्ये बाजारात उपलब्ध आहे.

इंजिन

TVS Zest 110 BS6 स्कूटरमध्ये 110 सीसी इंजिन आहे. हे इंजिन 5.75 किलोवॅट (8 पीएस) आणि 8.8 एनएमची टॉर्क जनरेट करते. नवीन झेस्टमधील शक्ती BS 4 मॉडेलच्या तुलनेत किंचित कमी झाली आहे परंतु टॉर्क वाढला आहे. नवीन इंजिन 7.8 बीएचपी उर्जा आणि 8.4 एनएम टॉर्क जनरेट करेल. झेस्ट त्याच्या विभागातील सर्वात शक्तिशाली स्कूटर नाही, परंतु तरीही कमी कर्ब वजनामुळे ती अधिक चांगली कामगिरी करेल असा विश्वास आहे.

नवीन झेस्ट 110 बीएस 6 स्कूटरमध्ये ईटी-फाय (इकोथ्रस्ट इंधन इंजेक्शन) तंत्रज्ञान आहे. ज्याद्वारे नवीन इंधन उत्सर्जन मानके प्राप्त झाली आहेत. टीव्हीएसच्या म्हणण्यानुसार, नवीन झेस्ट 110 बीएस 6 स्कूटर उत्तम ड्राईबिलिटी आणि स्मूदनेससह चांगले मायलेज आणि उत्कृष्ट परफॉर्मेंस देईल.

फीचर्स

अपग्रेड केलेल्या झेस्ट 110 च्या रचनेत कोणताही महत्त्वपूर्ण बदल झाला नाही. टीव्हीएसच्या या स्कूटरमध्ये क्लास 19-लीटर अंडर-सीट स्टोरेज, अंडरसीट USB चार्जर, एलईडी टेललैंप, डेटाइम रनिंग लाइट (डीआरएल), ट्विलाइट लैंप्स अशी फीचर्स आहेत.

सस्पेंशन आणि ब्रेकिंग

टीव्हीएस झेस्ट 110 बीएस 6 स्कूटरमध्ये टेलीस्कोपिक फ्रंट सस्पेंशन आणि हायड्रॉलिक रियर मोनोशॉक सस्पेंशन आहे. कंपनीच्या मते, यातून अधिक उत्तम राइडिंगचा अनुभव आणि हैंडलिंग मिळेल. या स्कूटरच्या पुढील बाजूस 110 मिमी ड्रम ब्रेक आणि मागील बाजूस 130 मिमी ड्रम ब्रेक आहेत. याशिवाय झेस्ट 110 मध्ये ट्यूबलेस टायर्स देण्यात आले आहेत. टीव्हीएसच्या मते, हे टायर निसरड्या जागेवर देखील चांगली पकड देतात. तसेच, या स्कूटरला एक आरामदायक वाइड सीट मिळते.

स्पर्धा

नवीन झेस्ट 110 बीएस 6 हीरो प्लेझर प्लसशी स्पर्धा करते ज्याची किंमत 55,600 रुपये आहे. झेस्ट 110 बीएस 6 स्कूटर 6 कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे. यात लाल, निळा, जांभळा, काळा, पिवळा आणि तुर्कीस निळा हे रंग उपलब्ध आहेत.

Latest news
Related news

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here