साडी हा प्रत्येक भारतीय स्त्रीच्या पोशाखातील अविभाज्य भाग आहे. लग्नासाठी तसेच पार्टीज आणि समारंभांसाठी हा पसंतीचा पोशाख आहे. आजकाल बाजारात साड्या बर्याच नवीन पद्धतीच्या आणि लुकच्या आल्या आहेत. काळ आणि फॅशन ट्रेंड बदलत असतानाही भारतीय महिला आपल्या पारंपरिक पोशाख म्हणजेच साडीबरोबर नवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
भारतीय साड्या वेगवेगळ्या फॅब्रिक आणि वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये उपलब्ध आहेत. भारतीय स्त्रिया आपापल्या प्रांतानुसार वेगवेगळ्या पद्धतीने सारी परिधान करत आलेल्या आहेत. इथे आम्ही तुमच्यासाठी काही पार्टीवेअर डिझाइनर साडी लुक आणले आहेत.
रुफल साडी
रुफल साडी ही कुठल्याही पार्टीला आणि प्रोग्रामला घालून जाता येते. या साडीवर शरीरयष्टी खूप प्रभावी दिसते. रुफल साडी म्हणजे आता ‘हॉटेस्ट ट्रेंड ऑफ द सिझन’ आहे. ही साडी भरपूर फॅब्रिक्समध्ये उपलब्ध आहे. या साडीवर मॅचिंग किंवा कॉन्ट्रास्ट स्लीव्हलेस प्लेन ब्लाऊज घालून लुक केला की ‘सोन्याहून पिवळं’.
धोती स्टाईल साडी
धोती स्टाईल साडीचा आता नवा ट्रेंड मार्केटमध्ये आला आहे. मात्र ही साडी तुम्ही कल्चरल प्रोग्राम्स म्हणजेच लग्न समारंभात घालणे जास्त शोभून दिसेल. धोती स्टाईल साडी कुठल्याही डार्क शेडची नेसावी आणि त्यावर मॅचिंग किंवा कॉन्ट्रास्ट फुल स्लीव्हचे ब्लाऊज घाला. हेवी डिझाइन्स असलेल्या साड्यांनीच धोती स्टाईल केलेली असते. त्यामुळे यावर डिसेंट दागिने घाला आणि त्यासोबतच डिसेंट मेकअप करा. तुमचा कल्चरल प्रोग्राम लुक रेडी आहे.
हाफ अँड हाफ एम्ब्रॉयडरी साडी
कुठल्याही लग्न समारंभात म्हणजे घरातील विवाह सोहळा असो अथवा बाहेरील किंवा कुठली पार्टी असो. कुठल्याही ओकेजनवर तुम्ही अशी साडी परिधान करू शकता. साडीच्या बॉर्डरवर असणारे एम्ब्रॉयडरी वर्क तुमची पर्सनॅलिटी अजूनच रुबाबदार बनवतात. या साडीवर कधीही फुल स्लीवच ‘नेट ब्लॉउज’ परिधान करा. या साडीने फक्त तुमची पर्सनॅलिटीच भारदस्त दिसत नाही तर रॉयल लुक सुद्धा येतो.
नेट साडी
जरी बॉर्डर आणि स्टोनवर्क असलेली नेट साडी तुम्हाला एक फॅसिनेटिंग लुक देते. रात्रीच्या पार्ट्यांमध्ये घालून जाण्यासाठी नेटच्या साड्या परफेक्ट असतात. यासोबत मॅचिंग फुल, हाफ किंवा स्लीव्हलेस ब्लॉउज छान दिसतात. नेटच्या साडीबरोबर तुम्ही पायात जुती घाला आणि त्याबरोबरच नेटची साडी जर प्लेन असेल तर रेखीव दागिने देखील घालू शकता.
फ्लोरल आणि स्ट्रिप्सप्रिंट पार्टीवेअर साडी
होय ! सध्या फ्लोरल प्रिंट साडी ट्रेंडमध्ये आहे. डे पार्टीज साठी किंवा लग्न समारंभात जाण्यासाठी ही साडी परफेक्ट आहे. या साडीमध्ये गर्ली आणि तरुणपणाचा टच मिळतो. या साडीमध्ये तुम्ही छान ट्रेडिशनल नेकलेस सेट घालू शकता. त्यावर मॅचिंग बँगल सेट आणि थोडासा तुम्हाला शोभेल असा मेकअप करा. बस्स..तुम्ही डे पार्टीसाठी रेडी आहात.