नारळ आणि कोरफड तेलाच्या हेअर मास्कने अगदी घरच्या घरी करू शकता केसांवर स्पासारखी ट्ररिटमेंट

0

कोविड 19 (साथीचा रोग) सर्व देशभर पसरल्यामुळे लॉकडाउनच्या काळात सर्वांवर कठीण परिस्थिती आली आहे. प्रत्येकजण स्वच्छता टिकवून ठेवण्यासाठी आणि सामाजिक अंतर कायम ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. पण आता मात्र पावसाळ्यातील आर्द्रतेमुळे केसांवर फार चांगला परिणाम होत नाही. सलून उघडल्यानंतरही, अपॉईंटमेंट घेण्यापूर्वी लोकांना दहा वेळा विचार करणे स्वाभाविक आहे.

एखाद्या छान स्पासारखे उपचार हवे असतील तर मग हे घरी का करू नये. व लहानपणापासून केस कोमल, स्वस्थ ठेवण्यासाठी नारळ तेल बहुतेककरून सर्व वापरतात. परंतु आपल्याला माहित आहे का की, केसांच्या अतिरिक्त वाढीसाठी आणि मजबुतीसाठी नारळ तेल देखील कोरफडमध्ये मिक्स केले जाऊ शकते ?

आपल्या सर्वांना हे माहित आहे की, नारळ तेलाची केसांसाठी किती उपयुक्त आहे. परंतु आपल्याला हे माहित असणे आवश्यक आहे की, कोरफड फक्त त्वचेसाठीच उपयुक्त नाही तर केस वाढीसाठी देखील उपयुक्त आहे.

केसांसाठी कोरफडचे फायदे :

  • कोरफड केस वाढण्यास मदत करतो.
  • कोरफडाचा वापर केल्याने कोंडा कमी होतो.
  • कोरफड केसांमधील ओलावा कायम ठेवतो.
  • तसेच टाळूतील खाज कमी होते.
  • टाळूतील चिकटपणा काढून टाकतो आणि केस अधिक चमकदार बनवतो.

घरच्याघरी चमत्कारी हेअर मास्क

एका छोट्या वाटीमध्ये काही प्रमाणात बाजारात उपलब्ध असलेले कोणतेही एलोवेराने समृद्ध असलेले नारळ तेल कोमट करा. (हे तेल तुम्ही कोरफड आणि साध्या नारळाच्या तेलाने घरीदेखील बनवू शकता). यामध्ये, १ चमचा लिंबाचा रस आणि २ चमचे मध घाला, हे नीट मिसळा. आपल्या केसाचे टोक आणि टाळूच्या लांबीमधून हळूवारपणे मालिश करा. नारळ तेल इतर केसांच्या तेलापेक्षा जास्त खोल आत प्रवेश करते आणि चमत्कारिक कंडिशनिंग घटक असलेला ‘एलोवेरा’ केस स्ट्रॉंग बनवते. पुढे, केस टॉवेलमध्ये २० ते ३० मिनिटे लपेटून स्टीम करा.

सौम्य क्लींजिंग सोल्यूशनसह हा हेअर मास्क धुन घ्या. आपल्या केसांना हवेत कोरडे होऊ द्या किंवा कोल्ड सेटिंगसह हेयर ड्रायर वापरा. त्वरित नरम, चमकदार आणि स्वस्थ केस आपल्यला अनुभवता येतील! एलोवेरा समृद्ध नारळ केस तेल आपल्या केसांना मऊपणा आणि पोषण देईल, जेणेकरून ते अधिक व्यवस्थित होतील. लिंबू आणि मध यांमुळे केसांना चमक येईल. चांगले परिणाम पाहण्यासाठी दर 10 दिवसांनी एकदा हा हेअर मास्क वापरा.

कोरफडातील कंडिशनिंग गुणधर्मांसह नारळाचे पोषण आपल्या केसांना स्वस्थ आणि मऊ बनविण्यासाठी एक परिपूर्ण कॉम्बो आहे. जेणेकरून आपण त्यास स्पर्श करताच आपल्यला आपले केस स्वस्थ, मुलायम आणि सुंदर वाटतील.

हे पण वाचा

https://imp.news/mr/beauty/new-and-beautiful-bridal-hairstyle-for-you-82480/

https://imp.news/mr/beauty/definitely-try-it-with-the-help-of-a-toothpick-you-can-make-even-simple-and-beautiful-nail-art-82471/

Leave A Reply

Your email address will not be published.