चेहरऱ्यावरील सौंदर्य वाढवण्यासाठी घरेलू उपाय करणेचं योग्य आहे. बाहेरचे रसायन युक्त स्किनकेअर प्रॉडक्टच्या वापराने नेहमी चेहऱ्यावर डाग दिसतात. रसायन युक्त क्रीमच्या वापराने नेहमी स्किनवर रेडनेस येतो. अशात त्वचेची काळजी घेण्यासाठी घरगुती उपचार करणेचं योग्य ठरते. घरगुती उपचारांनी चेहऱ्यावरील ग्लो अधिक काळ टिकून राहतो.
आज पर्यंत आपण जेवणाच्या पदार्थात स्वाद आणण्यासाठी आणि फोडणीसाठी कढीपत्त्याचा वापर करत आलो आहोत. कढीपत्त्याची फोडणी असलेले वरण तर खायला अधिक रुचकर आणि स्वादिष्ट लागते. मात्र कढीपत्त्याचे कार्य फोडणीत तडतडण्या पुरते मर्यादित नसून त्यामध्ये काही औषधी गुणधर्म देखील आहेत. विशेष म्हणजे कढीपत्त्यात असेलेले औषधी गुणधर्म हे खास सौंदर्य वाढवण्यास मदत करणारे आहेत.
त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही कढीपत्त्याचा वापर करू शकता. सुंदर आणि चमकदार त्वचेसाठी कढीपत्ता अधिक लाभकारी आहे. कढीपत्याला गोडनिंब असे देखील म्हटले जाते. कढीपत्तामध्ये अँटी ऑक्सिडंट आणि अँटी मायक्रोबिअल गुणधर्म आहेत. जे त्वचेकरीता अधिक लाभकारी असतात. चला तर जाणून घेऊयात कढीपत्त्याचा फेस पॅकबद्दल…
हळद आणि कढीपत्ता फेस पॅक
हळद आणि कढीपत्ता मध्ये अँटी- बॅक्टरीअल गुण असतात. हा फेस पॅक लावल्यामुळे चेहऱ्यावरील मुरूम नाहीसे होतात.
हा फेस पॅक बनवण्यासाठी ६ ते ७ कढीपत्त्याची पाने घ्या आणि त्यासोबत ४-५ कच्ची हळद घ्या. थोडं पाणी घालून हे दोन्ही साहित्य नीट मिसळून घ्या. नंतर यात लिंबाचा रस घाला. या मिश्रणाला चेहऱ्यावर लावा आणि २० मिनटे राहू द्या. त्यांनतर चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.
कढीपपत्ता आणि लिंबाचा रस
लिंबामध्ये व्हिटॅमिन सी असतो. यात अँटीऑक्सिडेन्ट गुण आहेत. हा फेस पॅक लावल्याने चेरहऱ्यावरील ग्लो कायम राहतो.
हा फेस पॅक बनवण्यासाठी १० ते १५ कढीपत्ताची पाने बारीक करून घ्या. त्यांनतर या पेस्ट मध्ये एक चमचा मध मिसळा. त्यांनतर यामध्ये लिंबाचा रस घाला. मिश्रण तयार करा. ते चेहऱ्यावर लावा आणि १० ते १५ मिनट वाट बघा. त्यांनतर चेहरा स्वच्छ धुवून घ्या. तुमची मुरुमांची समस्यादेखील यामुळे दूर होईल.
कढीपत्त्याचा वापर केसांसाठी
कढीपत्त्याचा वापर केस काळे करण्यासाठी पण करतात. कढी पत्ता वाळवून घ्यावा. वाळल्यानंतर पानांची पावडर तयार करून घ्या. आता २०० मिमी खोबरेल तेलात किंवा ऑलिव्ह ऑईलमध्ये जवळपास ४ ते ५ चमचे कढीपत्त्याची पावडर मिक्स करून उकळून घ्या. चांगल्या उकळीनंतर ते थंड होऊ द्या. मग तेल गाळून एका हवाबंद बॉटलमध्ये टाका. झोपण्यापूर्वी दररोज हे तेल लावा. जर तेल थोडं कोमट करून लावलं तर अधिक फायदेशीर ठरतं. दुसऱ्या दिवशी नैसर्गित शॅम्पूनं केस धुवावेत.
त्याचप्रमाणे कढीपत्ता पाण्यात उकळून घ्या. यात लिंबू पिळा आणि साखर घाला. असा चहा बनवून एक आठवडा प्यावा. हा चहा आपल्या केसांना लांब, घनदाट बनवेल. सोबतच केस पांढरे होण्यापासून वाचवेल आणि आपली डायडेस्टिव सिस्टमही स्वस्थ ठेवेल.