ज्या मुलींना गर्लि राहायला आवडते. त्या मुलींना नेलपेंटचे महत्त्व माहिती आहे. आपल्या नखांना आकर्षक लुक देण्यासाठी नेलपेंटचा मुली वापर करतात. ड्रेस सोबत मॅचिंग नेलपेंट लावणे तर मुलींचा छंद आहे. मुली आपल्या प्रत्येक ड्रेसनुसार नेलपेंटचं कलेक्शन करतात. पण तुम्हाला माहिती आहे का? नेलपेंट फक्त नखांसाठीच नाही तर इतर कामांसाठी देखील उपयुक्त आहे. चला तर जाणून घेऊयात नेलपेंटचे इतर फायदे…
-दागिने सुरक्षित राहतील.
दागिने जर काळे पडत असतील तर ते घातल्यावर त्वचेला एलर्जी होऊ शकते. त्याआधीच त्वचेच्या संपर्कात येणाऱ्या दागिन्याच्या भागावर ट्रान्सपरंट नेलपेंट लावा. यामुळे दागिने काळे पडणार नाही आणि एलर्जी होण्याचा धोका पण राहणार नाही.
– तयार करा मॅचिंग ज्वेलरी
जर तुम्ही बाहेर जात आहात किंवा ऑफिसला जात आहात आणि तुमच्या कडे ड्रेससोबत मॅचिंग ज्वेलरी नाही. तर काय? घ्या मॅचिंग नेलपेंट आणि आपली ज्वेलरी पेंट करा. बघा तुमच्या ड्रेस सोबत मॅचिंग ज्वेलरी तयार आहे.
– हँगर नवे करा
जर तुमचे कपडे लटकवण्याचे हँगर खराब झाले आहेत आणि त्यामुळे तुमचे छान कपडे खराब आहेत. तर काही काळजी करण्याचे कारण नाही. हँगरला नेलपेंटने पेंट करा. यामुळे ते नवे पण होतील आणि कपडे पण नीट राहतील.
– बटण तुटण्यापासून बचाव करतो.
जर शर्टचे बटण बाहेर असताना तुटले. तर यामुळे आपल्याला खूप विचित्र वाटते. बटण सतत तुटण्यापासून वाचण्यासाठी त्यावर ट्रान्सपरंट नेलपेंटचे एक कोट करा. यामुळे बटण तुटणार नाही. घरातून निघताना नेहमी शर्टच्या बटण वर नेलपेंटचे एक कोट लावूनंच घराबाहेर पडा.
हे पण वाचा
https://imp.news/mr/auto/find-out-the-specifications-of-hondas-best-selling-brand-new-civic-car-82525/
https://imp.news/mr/health/while-the-body-is-nutritious-and-not-functioning-the-brain-is-also-brilliant-82516/