Monsoon Skincare : मान्सूनमध्ये त्वचा सुंदर आणि चमकदार ठेवण्यासाठी, पेपरमिंट फेसपॅक ठरेल उपयुक्त

0

पेपरमिंट ही एक औषधी वनस्पती म्हणून ओळखली जाते. या औषधी गुणधर्मामुळेच याचा वापर विविध कॉस्मॅॅटीक्स प्रॉडक्ट्समध्ये केला जातो.  उदाहरणार्थ पुष्कळसे क्लीन्झर्स, शाम्पूज, टोनर इत्यादींमध्ये पेपरमिंटचे घटक आहेत, कारण पेपरमिंट बरेच लाभकारी आहे. पेपरमिंटमध्ये एँटीसेप्टिक, अँटी-मायक्रोबियल आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आहेत आणि म्हणूनच मुरुमंं आणि इतर त्वचेच्या समस्यांचा उपचार करण्यासाठी याचा वापर बऱ्याचदा केला जातो. हे लावल्यावर त्वचेला थंड वाटते. पेपरमिंट ‘व्हिटॅमिन ए’ ने देखील समृद्ध आहे. हे त्वचेच्या बर्‍याच समस्यांवर उपयुक्त आहे म्हणून आता फेसपॅकमध्येही याचा वापर जास्त केला जातो.

Paper Mint

  • कोरड्या आणि खाज सुटणाऱ्या स्किनसाठी पेपरमिंट फेस पॅक

पेपरमिंटमध्ये मेंथॉल हा त्वचेला उपयुक्त असणारा घटक आहे. यामुळे पेपरमिंट पासून बनवलेले हे फेस पॅक त्वचेचा कोरडेपणा आणि खाज सुटण्याच्या समस्येचे निराकरण करतात. त्यासाठी काही सोपे इलाज आहेत. जे आपल्या समस्येवर काही दिवसातचं परिणाम घडवून आणतात

  • कसा बनवाल घरच्या घरी पेपरमिंटचा फेसपॅक ?

अर्ध्या लिटर पाण्यात पेपरमिंटची पाने 20 मिनिटे उकळा, नंतर हे पाणी थंड होऊ द्या. यामध्ये सूती कापड भिजवून ओले करा आणि आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर ठेवा. हे कापड आपल्या चेहऱ्यावर सुमारे 2 ते 3 मिनिटे ठेवा. मग कापड पिळून घ्या आणि पुन्हा त्या पाण्यात भिजवा. अशा प्रकारे, आपण ही प्रक्रिया 3-4 वेळा पुन्हा करा. चांगले परिणाम मिळविण्यासाठी, हा उपाय दररोज 1-2 वेळा करावा.

  • पेपरमिंट आणि गुलाबजल फेसपॅक

स्किनकेअर प्रॉडक्टमध्ये गुलाबजल हे महत्त्वाचे आहे. गुलाबजल त्वचेच्या रोम छिद्रांची काळजी घेतो आणि त्वचेला हायड्रेट ठेवतो. त्याबरोबरच पेपरमिंट सोबत गुलाबजल वापरले तर मुरुमां सारख्या समस्येवर त्वरित इलाज होतो.

साहित्य : एक चमचे गुलाबजल, दोन चमचे मध, 10-15 ताजे पेपरमिंटची पाने.

हे फेस पॅक करण्यासाठी फक्त 20 मिनिटे लागतात. जाड फेस पॅक मिळविण्यासाठी, या सर्व घटकांना मिसळा आणि ब्लेंडरच्या मदतीने पेस्ट बनवा. हे मिश्रण आपल्या चेहऱ्यावर नीट पसरवून लावा. 20 मिनिटांनंतर आपण आपला चेहरा थंड पाण्याने धुन घ्या. 1 ते 2 आठवडे हा फेस पॅक वापरणे आपल्यासाठी योग्य आहे.

  • ड्राय स्किनसाठी पेपरमिंट आणि दह्याचे फेस पॅक

दही आपली त्वचा हायड्रेट करते तर मुलतानी मातीमुळे हे मिश्रण जाड होते. तसेच, मुलतानी माती मध्ये त्वचेचे पोषण करण्यासाठीचे गुणधर्म असल्याने हा फेस पॅक तुमची त्वचा मऊ आणि हायड्रेट ठेवण्यास मदत करतो.

साहित्य : 2 चमचे दही, एक चमचे मुलतानी माती, 10-12 पेपरमिंटची पाने, हा फेस पॅक तयार करण्यास केवळ पाच मिनिटे लागतात.

पेपरमिंटची पाने बारीक करून पेस्ट बनवा आणि नंतर वरील साहित्य चांगले मिसळा. मग आपण इतर फेस पॅक सारखेच हे मिश्रण देखील चेहऱ्यावर लावा. चेहऱ्यावर फेसपॅक लावल्यानंतर सुमारे 20 मिनिटांनंतर चेहरा थंड पाण्याने धून टाका.

Paper Mint (1)

असे घरगुती उपाय केल्यानंतरही आपल्या चेहऱ्याची त्वचा मुलायम आणि चमकदार राहू शकते. अनेकवेळा केमिकल्सने भरलेल्या क्रीम्सचा वापर आपण चेहऱ्यावर करतो, त्यामुळे तात्पुरता इलाज होतो. मात्र समस्येचे कायम स्वरूपी निराकरण होत नाही. अशावेळी असे घरगुती उपाय नेहमीच फायदेशीर ठरतात.

हे पण वाचा

https://imp.news/mr/beauty/hair-mask-with-coconut-and-aloe-vera-oil-can-do-spa-like-treatment-on-hair-even-at-home-82489/

https://imp.news/mr/beauty/new-and-beautiful-bridal-hairstyle-for-you-82480/

Leave A Reply

Your email address will not be published.