‘या’ आहेत जबरदस्त आकर्षक ब्राईडल हेअरस्टाईल ज्या तुमचे सौंदर्य वाढवण्यात करतील मदत
रेश्मा झलके : आपल्या लग्नासाठी आणि रिसेप्शनसाठी लुक करायचं असेल तर तर आपल्याला माहित आहे की, आपल्या संपूर्ण लुकचे वाह फॅक्टर हे आपल्या हेअरस्टाईलमध्ये असते. आपण हाफ-अपडेटस, सैल केस, नॉट, बन्स आणि बऱ्याच हेअरस्टाईलचा विचार करता, तेव्हा गोंधळ होणे स्वाभाविक आहे. वधूची केशरचना छान असायलाच हवी. आपण असंख्य ब्राइडल हेअरस्टाईल पैकी निवड करण्यास गोंधळत असाल तर आम्ही काही जबरदस्त आकर्षक केशरचना आपल्यासाठी घेऊन आलो आहोत.
१. एमिली रॉसमची बीडेड हेडबँड हेअरस्टाईल
आपल्या चेहर्याच्या आकारास काय अनुकूल आहे यावर अवलंबून आपले केस मध्यभागी किंवा बाजूला करा. आपल्या केसांना कंगवा लावा आणि आपले केस वेणीने बांधून घ्या किंवा मोकळे ठेवा किंवा सैल बन करा. आपल्या मणी आणि स्टोनने भरपूर असलेल्या सुंदर टियाराने हेअरस्टाईला सुंदर लुक द्या.
२. केसांच्या दागिन्यांसह मेसी बन हेअरस्टाईल
लग्नासाठी आपले केस स्टाईल करण्याचा एक चांगला मार्ग म्हणजे आंबाडा बांधणे होय. जर आंबाडा मेसी असेल तर आपला लुक अधिक मजेदार बनवते. हा लुक मिळविण्यासाठी प्रथम आपल्या केसांना कर्ल करा. आपले केस डाव्या, उजव्या आणि मध्य भागामध्ये विभागून घ्या. प्रत्येक विभाग रोल करा आणि त्यास केसांच्या मध्यभागाजवळ बॉबी पिनसह पिनअप करा. आपल्या आवडीच्या कोणत्याही दागिन्यांनी हेअरस्टाईलची सजावट करा.
३. ट्विस्ट बन हेअरस्टाईल
आपली बीच वेडींग असेल आणि अशी हेअरस्टाईल हवी जी लांब काळापर्यंत जागेवर राहील. तर समोरच्या केसांना वेणी बांधून एक ट्विस्ट बन तयार करणे, उत्तम ठरेल. आपल्या केसांना पुढच्या भागावर वेणी घाला आणि नंतर मागील बाजूस असलेल्या केसांना कर्ल करा आणि बॉबी पिन वापरून मध्यभागी पिनअप करा. हेअरस्टाईल लूक जसाचा तसा ठेवण्यासाठी हेअरस्प्रे वापरा.
४. लुझ कर्ल्स
केसांचा पुढचा भाग ट्विस्ट करून पिनप करून घ्या. उर्वरित केस , मोकळे ठेवायचेत म्हणून त्या केसांना कर्ल करा. या हेअरस्टाईल सोबत केशदागिन्यांची जोड करा. तुमची ब्रायडल हेअर स्टाईल तयार आहे.