fbpx
5.1 C
London
Tuesday, December 6, 2022

महिला विशेष : चेहरा शेविंग करण्याचा विचार करीत आहात? तर ‘या’ आहेत खास टिप्स

या दिवसात विशेषतः लॉकडाउननंतर फेस शेविंग ही एक लोकप्रिय पद्धत बनली आहे. महिलांनी वेगवेगळ्या मार्गांचा शोध लावला ज्याद्वारे ते घरात वैयक्तिकच सर्व पार्लरच्या गोष्टी करू शकतात. आत्तापर्यंत, महिला सौंदर्य संवर्धनासाठी ब्युटी पार्लर आणि सलूनवर अवलंबून असत. चेहऱ्यावरील केस काढून टाकण्यासाठी शेव करणे त्यापैकी एक आहे. आपण चेहरा शेव करून पाहाण्याचा विचार करत असाल तर आपण हे महत्त्वाचे मुद्दे नक्कीच लक्षात घेतले पाहिजेत.

चेहरा आणि शरीराच्या इतर भागांसाठी स्वतंत्र रेझर ठेवा

आपण आपल्या हात आणि पायांवर एक रेझर वापरू शकता, परंतु आपल्या चेहऱ्यावर कधीही तो वापरु नका. आपल्या सर्वांना माहित आहे की, आपली चेहऱ्यावरील त्वचा नाजूक असते. शेव केल्याने केवळ केस निघत नाही तर त्वचेच्या मृत पेशींचा थरही निघतो. पाय आणि चेहऱ्यावर एक रेझर वापरल्याने कट, जळजळ आणि त्वचेच्या संसर्गाचा धोका दुप्पट होतो.

पुरुषांच्या रेझरने शेव करा.

पुरुषांचे रेझर तीक्ष्ण असतात असा विचार करणार्‍यांना हे मूर्खपणाचे वाटू शकते. परंतु ते खास चेहरा शेव करण्यासाठी असतात या वस्तुस्थितीकडे आपण दुर्लक्ष केले आहे. चेहऱ्यावरील केस जाड आणि उग्र असल्यास मेन्स रेझर वापरणे योग्य राहील. तुम्ही नारळ तेल लावून याचा वापर करू शकता.

शेविंग स्टेप्स नीट फॉलो करा

शेविंग केल्याने त्वचेला एक स्मूथ फील येतो. पण त्या सोबत इनग्रोन हेअर असण्याची शक्यता असते. म्हणून शेविंगचे योग्य स्टेप्स फॉलो करण्याची गरज आहे. केस येतात त्या दिशेने रेझर फिरवा, यामुळे इनग्रोन हेअर्सची समस्या कमी होईल. इनग्रोन हेअर्स जास्त असल्यास तुम्ही यासाठी मार्केटमध्ये मिळणारे प्रॉडक्ट्स वापरू शकता.

तुमच्या चेहऱ्यावरील केस दाट होणार नाहीत

ही एक सामान्य समज आहे की, दाढी केल्याने केस जाड आणि डार्क होतात. शेव केल्याने त्वचेच्या पातळीवरून केस कपतात, त्यामुळे केसांचा रंग किंवा केसांची पुन्हा वाढ होण्यावर शेव केल्याचा काहीच परिणाम होत नाही. ते नैसर्गिकरित्या वाढतात.

या काळात आपण पार्लरमध्ये जाऊन स्वतःला धोक्यात घालू इच्छित नसाल आणि घरीच शेविंग करण्याचे विचार करत असाल तर वरील टिप्स तुमच्या नक्की उपयोगात येतील.

Latest news
Related news

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here