नथीचा नखरा ! एकट्या महाराष्ट्रातचं आहेत एवढ्या नथींचे प्रकार, तुम्हीही घ्या जाणून

0

नथ ही पारंपारिक नाकाची अंगठी आहे. मोत्यांनी भरलेली, बहुतेककरून ही पांढर्‍या आणि मध्यभागी गुलाबी रंगाची असते. विवाह सोहळा, धार्मिक समारंभ किंवा पवित्र कौटुंबिक कार्यात नथ घालणे हे सामान्य दृश्य आहे. नथ सहसा 22 कॅरेट सोन्याने बनविली जाते आणि त्यामध्ये मोती अंतर्भूत असतात. नथ ही महाराष्ट्रीय पारंपरिक दागिन्यांमध्ये मुख्य आहे.

चला तर बघुयात नथींचे प्रकार…

कोल्हापुरी नथ

मराठी शैलीतील हा नथीचा एक प्रकार आहे. कालानुरूप महाराष्ट्रातील वैविध्यपूर्ण परंपरा व प्रांतानुसार नथीचे प्रकार पडत गेले. त्यातलाच भरदारी प्रकार म्हणजे ‘कोल्हापुरी नथ’ होय. या नथीत फक्त एक किंवा दोन रत्ने व अर्धगोल मोत्यांनी बनविलेला असतो. अशा मोठ्या आकाराची नथ ही नथडा म्हणून देखील ओळखली जाते.

kolhapuri nath

वऱ्हाडी नथ

ही नथ आकाराने गोल असते आणि यात सर्वाधिक वापर हा मोत्यांचा केला जातो. एखाद दुसरे रत्नही वापरतात. प्रामुख्याने ही नथ चांदीत किंवा लाखेत घडवली जाऊन त्यावर सोन्याचे पाणी दिले जाते. विदर्भ व मराठवाडा येथील सधन व बहुजन समाजात, अशी पारंपरिक आकाराची नथ बहूअंशी वापरात आहे. नथीचा वापर महाराष्ट्रात सुरु झाल्यावर सुरुवातीस ती आकाराने गोल होती आणि तोच आकार या नथीचा आहे.

काशीबाई नथ

पारंपरिक सरजानथीच्या रचनेपासून प्रेरणा घेऊन ही नथ तयार करण्यात आलेली आहे. या नथीत सरजाच्या नथीतील बाहेरील भागास मोत्यांचे कोंदण करून त्याच्या आत माणिक व हिरा बसविण्यात आला आहे. या नथीची रचना दिसायला भरदार तरीदेखील सुबक, अशी कऱण्यात आली आहे. खास बाजीराव- मस्तानी या चित्रपटासाठी ही नथ काशीबाई या चित्रपटासाठी तयार करण्यात आली होती.

kashibai kokni nath

कोकणी नथ

ही नथ प्रचलित नथिंपेक्षा आकाराने वेगळी असून, यात नथीच्या वरील बाजूस पाच मोती आणि खालील बाजूस दोन मोती वर पोवळे वापरले जातात. यामध्ये रवाकाम अधिक असून, वरील बाजूने भरीव असते. या नथीत सोन्याचा सर्वाधिक वापर असतो. नथीचा वापर हा महाराष्ट्रात सुरु झाल्यावर ती आकाराने गोल होती. बहुजन समाजात देखील अशीच गोल आकाराची नथ वापरण्याची प्रथा आहे.

मोरणी नथ

ही नथ नथनीचा प्रकार असून ती सोन्याने घडविली असते. या नथीत एखाद दुसरे रत्न बसविले असते. नाकपुडीवर मोराच्या पिसाऱ्यासारखी उभी दिसणारी रचना तिला इतर नथिंपेक्षा रचनेबाबत उजवी ठरविते. कानातल्या मुरकीप्रमाणे ही नथ एका जागेवर उभी राहू शकते.

Ramabai Nath

रमाबाई नथ

नथ हा प्रकार गेली अडीचशे तीनशे वर्षांपासून वेगवेगळे आकार व रचनेनुसार घडविला जात आहे. नेहमीच्या नथिंपेक्षा आकाराने लहान असलेली आहे. या नथीचे वैशिष्ट्य म्हणजे यात एकही मोती वापरलेला नाही. ही संपूर्ण नथ सोन्यात घडविली असून, यात हिरे व माणिक ही रत्ने वापरली आहेत. सध्या सुरु असलेल्या स्वामींनी मालिकेत रमा या पात्राने ती वापरली आहे.

चमकी नथ

नाकात घालण्याच्या काडीसारखा तारेचा छोटासा दागिना म्हणजे चमकी . तारेच्या एका टोकावर सोन्याचे फुल, गोल मणी तसेच, रत्न मोती असतात तर तारेचे दुसरे टोक नाकात घालतात. नाकात सोन्याची वा हिऱ्याची चमकी घालण्याची प्रथा आहे. मुरकी अर्थात मोरणी हा देखील चमकीप्रमाणे नाकात घालण्याचा अलंकार आहे.

chamki Nath

ब्राम्हणी नथ

पेशवाई काळात सधन उच्च्वर्गातील जनतेला आपली साधी नथ हिरे माणिक आदी रत्ने व भरपूर मोती लावून अधिक देखणी व वैभव संपन्न करावी असे वाटू लागले, यातूनच पुढे नथीचे रूपकार बदलले. ब्राम्हणी नथ बसरा, हिऱ्याबरोबर माणिक पाचू ही मौल्यवान रत्ने वापरली जाऊ लागली.

नथनी नथ

हा नथीचा लहान व नाजूक रचनेचा प्रकार आहे. आकाराने लहान आणि वापराने सोपे असल्याने नथनी पहिल्यापासूनच सगळ्यांच्या पसंतीची आहे. यात मोती खडे रत्ने वापरली जातात. यात काही रचनांमध्ये रवाकामही असते. याप्रकारच्या नथींना तरुण स्त्रियांकडून जास्त मागणी आहे.

bramhni nath

येसूबाई नथ

ही नथीची नवी रचना असून, संपूर्ण सोन्यात ही नथ घडवलेली आहे. या नथीत सहा मोती एक पाचू व माणिक वापरण्यात आला आहे. तसेच दोन रत्ने वापरण्यात आली आहेत. खास संभाजी मालिकेसाठी महाराणी येसूबाई यांच्या पात्रासाठी ही नथ बनविण्यात आली.

सरजाची नथ

या नथीचा उगम ब्राम्हणी, मराठा नथीच्या आधी म्हणजे १५ किंवा १६व्या शतकाच्या सुरुवातीस झाला असलायचा अंदाज आहे. ही नथ पूर्ण सोन्यात किंवा चांदीमध्ये घडवून त्यावर सोन्याचे पाणी चढविले जाते. यामध्ये खड्ड्यांऐवजी कुंदन काम दिसून येते.

Sarjachi nath

मराठा नथ

महाराष्ट्रात मराठे व सधन जातीत नव्या रूपाची देखणी व वजनाला तितकीच भारी अशी नथ वापरण्याची प्रथा पडली. तत्कालीन नथी वजन असल्याने नाक ओघळण्याची भीती निर्माण झाली. तेव्हा तत्कालीन जाणकारांनी तिच्या आकार व रचनेत बदल करून तिच्या गोल कड्याची लांबी कमी केली.त्या कड्यालाच वेगळे बाक देऊन ती नाकपुडिब्रून खाली लोंबण्याऐवजी नाकपुडीसरशी उभीच राहू लागली. या बदलामुळे स्त्रियांचा चेहरा अधिक देखणा दिसू लागला. यात सुद्धा हिरे, माणिक, मोती लावतात. पुढे हीच नथ मराठा शैलीची नथ म्हणून प्रसिद्ध झाली.

Leave A Reply

Your email address will not be published.