BSNL ची मोठी ऑफर, या ग्राहकांना मिळणार 300GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग

0

बीएसएनएल ग्राहकांसाठी एक चांगली बातमी आहे. कंपनीने आपल्या 600 रुपयांच्या लोकप्रिय ब्रॉडबँड योजनेची उपलब्धता 27 ऑक्टोबरपर्यंत वाढविली आहे. ‘Bharat Fiber 300 GB CUL CS346’ म्हणून येत असलेल्या या योजनेत कंपनी 300 जीबी डेटा देते. यापूर्वी ही योजना 27 जुलै रोजी बंद केली जाणार होती, परंतु ग्राहकांची मागणी लक्षात घेता कंपनीने ती 27 ऑक्टोबरपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

फास्ट इंटरनेट स्पीड आणि अनलिमिटेड कॉलिंग

टेलिकॉम टॉकने दिलेल्या वृत्तानुसार, कंपनीने आपल्या वेबसाइटवर 600 रुपये फार्ट फायबर योजनेचे विस्तार अपडेट्स केले आहेत. आता या योजनेचे ग्राहक अमर्यादित लोकल आणि एसटीडी व्हॉईस कॉलिंगचा 27 ऑक्टोबर पर्यंत आनंद घेतील. तसेच त्यांना 40 एमबीपीएस स्पीडचे इंटरनेट मिळणार आहे.

Realmeने बाजारात आणला स्वस्त आणि मस्त स्मार्टफोन, आजपासून फ्लिपकार्टवर विक्री सुरु

अनलिमिटेड डेटाच्या आणखी दोन योजना

योजनेत एकूण 300 जीबी डेटा देण्यात येत आहे. डेटाची मर्यादा संपल्यानंतर, योजनेत उपलब्ध इंटरनेट वेग 2 एमबीपीएस पर्यंत कमी होईल. कंपनीची ही लोकप्रिय फायबर ब्रॉडबँड योजना ओडिशा सर्कलमध्ये उपलब्ध आहे. 600 रुपयांच्या योजनेव्यतिरिक्त, कंपनी या सर्कलमध्ये अनलिमिटेड डेटा डाउनलोड ब्रॉडबँड प्लॅनची ​​ऑफर देत आहे, ज्याची किंमत 599 आणि 699 रुपये आहे.

तीन वर्षांसाठी करू शकता सब्सक्राइब

बीएसएनएलचे ग्राहक 6 महिन्यांसाठी 3600 आणि एका वर्षासाठी 7200 रुपयांमध्ये या योजनेची सदस्यता घेऊ शकतात. या व्यतिरिक्त 14,400 रुपये देऊन आणि 21,600 रुपये देऊन तीन वर्षांसाठी या योजनेची सदस्यता घेतली जाऊ शकते. कंपनी बर्‍याच दिवसांपासून या योजनेची सदस्यता घेत असलेल्या ग्राहकांना काही अतिरिक्त फायदे देखील देत आहे.

OnePlus Nord ला टक्कर देण्यासाठी गूगल घेऊन येतोय Pixel 4a

Leave A Reply

Your email address will not be published.