fbpx
6.1 C
London
Monday, February 6, 2023

Airtel युजर्सना एका बाजूने दणका तर दुसऱ्या बाजूने दिलासा : दीर्घकालीन रिचार्ज योजना बंद तर फ्री डेटाचे मिळणार कुपन

देशातील आघाडीची टेलिकॉम कंपनी एअरटेलने लॉकडाऊन दरम्यान आपल्या वापरकर्त्यांना अधिक चांगली सेवा देण्यासाठी अनेक नवीन योजना आणल्या आहेत. या व्यतिरिक्त, कंपनीकडून घरून काम करत असलेल्या लोकांना लक्षात घेऊन नवीन योजना बाजारात आणल्या ज्या अधिकाधिक डेटा देत आहेत.

मात्र असे सर्व आलबेल असतानाचं कंपनीने अचानक कोणतीही घोषणा न करता दीर्घ मुदतीची योजना बंद केली आहे. एअरटेलने आपल्या वेबसाइटवरून आपली 2,398 रुपयांची प्रीपेड दीर्घकालीन योजना काढून टाकली आहे आणि हे योजना यापुढे बाजारात उपलब्ध होणार नाही हे स्पष्ट आहे.

काय होता एअरटेलचा 2,398 रुपयांचा पॅॅक ?

एअरटेलची या योजनेची वैधता 365 दिवसांची होती आणि या वैधतेदरम्यान वापरकर्त्याला दररोज 1.5 जीबी डेटा मिळत होता. एवढेच नव्हे तर डेटाव्यतिरिक्त अमर्यादित व्हॉईस कॉलिंग देखील या योजनेत देण्यात आले होते. या व्यतिरिक्त, वापरकर्ते दररोज 100 एसएमएसचा लाभ देखील घेऊ शकत होते.

6GB पर्यंत मोफत डेटा

तर दुसरीकडे एअरटेल आपल्या युजर्सना 6GB पर्यंत मोफत डेटा देत आहे. कंपनीने आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी नवीन ‘फ्री डेटा कूपन्स’ ऑफर आणली आहे. पण या ऑफरसाठी ग्राहकांना एअरटेल थँक्स अ‍ॅपद्वारे रिचार्ज करणं आवश्यक आहे.

एअरटेल थँक्स अ‍ॅपद्वारे 219 किंवा त्यापेक्षा जास्त प्लॅनसाठी रिचार्ज करणाऱ्यांना या 6GB पर्यत अतिरिक्त फ्री डेटा ऑफरचा लाभ घेता येईल. मात्र ही ऑफर काही प्री-सिलेक्टेड युजर्ससाठी उपलब्ध असेल असे कंपनीच्या वेबसाइटवर म्हटले आहे. ऑफरनुसार एअरटेल युजर्सना 6GB पर्यंत इंटरनेट डेटा मोफत मिळेल. डेटा कूपन्सद्वारे हा डेटा युजर्सना 84 दिवसांच्या वैधतेसह मिळेल. युजर्स My Airtel अ‍ॅपमध्ये ‘My Coupons’ सेक्शनवर जाऊन कूपन क्लेम करु शकतात.

एअरटेल युजर्सना 219 , 249, 279, 298, 349 किंवा 398 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनवर 1GB डेटाचे दोन कूपन मिळतील. म्हणजे या पॅकमध्ये 2GB फ्री डेटा मिळेल. याची व्हॅलिडिटी 28 दिवस असेल. तर, 399 रुपये, 449 आणि 558 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनवर युजर्सना 1GB डेटाचे चार कूपन मिळतील.

Latest news
Related news

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here