fbpx
9.9 C
London
Monday, February 6, 2023

#Business : …’या’ चुका टाळा आणि व्यवसायातील तोटा दूर करा

कोणत्याही व्यवसायात उतरल्यानंतर त्यात नफा होणे किंवा तोटा होणे हे तर ठरलेलेचं असते. पावसानंतर ऊन तर पडणारचं हा जसा निसर्गाचा नियम आहे त्याच प्रमाणे कोणत्याही व्यवसायात तोटा किंवा काही काळासाठी अपयश येणे हे तर साहजिक आहे. व्यवसायात तोटा किंवा अपयश आल्यानंतर अनेकजण तणावात येतात, व्यवसाया प्रती नकारात्मक भावना मनामध्ये निर्माण करतात नाहीतर काही तरी चुकीचे निर्णय घेऊन अजून व्यवसाय तोट्यात घालवतात. यासाठीच आज आम्ही कोणत्याही व्यवसायात तोटा का होतो ? आणि झाला तरी त्यातून कसे सावरावे याबाबत काहीशी चर्चा करणार आहतो.

वर म्हंटले तसे व्यवसाय हा नेहमीच अस्थिर असतो त्यातून कधी नफा होतो तर कधी तोटा. मात्र अशा दोन्ही परिस्थितीमध्ये व्यवसायिकाने आपला समतोल ढासळून नाही दिला पाहिजे. दोन्ही परिस्थितींना स्थिर व खंभीरपणे सामोरे गेले पाहिजे. जर व्यवसायात नुकसान किंवा तोटा होत असेल तर त्यामागचे कारण शोधावे. नेमकं काय चुकले. व्यवसायाच्या बाहेरच्या प्रोब्लेम्समुळे व्यवसाय अडचणीत आला का ? की व्यवसायाच्या अंतर्गत अडचणींमुळे व्यवसाय अडचणीत आला ? की आपली लीडरशीप चुकतीये त्यामुळे व्यवसायात तोटा सहन करावा लागतोय ? यावर शांत चित्त ठेवून विचार करावा आणि योग्य तो मार्ग काढावा.

कोणताही व्यवसाय तोट्यात जाण्यासाठी एक्सटर्नल प्रोब्लेम्स, इंटरर्नल प्रोब्लेम्स आणि लीडरशिप हे 3 फॅॅक्टर्स कारणीभूत ठरतात. जर हे तीन प्रोब्लेम्स तुम्ही सहजरित्या सोडवू शकलात तर तुम्ही व्यवसायात होणारा तोटा नक्कीचं रोखू शकता.

एक्सटर्नल प्रोब्लेम्स : व्यवसायात नुकसान होण्याचे हे एक महत्वाचे कारण आहे. अनेकदा सरकारी पॉलिसीज अचानक बदलल्या जातात. तर कधी GSTमध्ये अडचणी निर्माण होतात. काहीवेळेला बाजारातील स्पर्धा इतकी वाढते की त्यामध्ये व्यवसायिक नको त्या चुका करून बसतात. आणि एखाद्या वेळेस नैसर्गिक आपत्ती येते ज्यामुळे चांगला नफ्यात असलेला व्यवसाय अवघ्या काही दिवसात तोट्यात जातो. त्यामुळे या एक्सटर्नल प्रोब्लेम्सला सामोरे जाण्याची व्यवसायिकाची तयारी हवी किंवा अशा काही समस्या भविष्यात उद्भवू शकतात याचा अचूक तर्क लावता आला पाहिजे.

 • सरकारी पॉलिसी : अनेकदा सरकारी पॉलिसी या अचानक बदलतात ज्यासाठी तुमचा व्यवसाय अनुकूल नसतो. मात्र ऐनवेळी झालेल्या बदलांमुळे व्यवसायाला खीळ बसते आणि व धंदा तोट्यात जातो.
 • GST :  GST आल्यानंतर मधल्याकाळात करप्रणाली पूर्णचं बदलून गेली. अशाकाळात अनेक व्यवसायांचे मोठे नुकसान झाले. त्यात आता काही व्यवसायिकांना GSTचा हिशोब व्यवस्थित ठेवता येत नसल्याने फटका सहन करावा लागत आहे.
 • स्पर्धात्मक बाजार : अचानक बाजारात स्पर्धा वाढते. त्यामुळे आपला व्यवसाय हा तोट्यात जात असल्याचं आपल्याला जाणवतंं. बाजारात नवीन तंत्रज्ञान किंवा नवीन पद्धती आल्याने स्पर्धक जास्त ग्राहकांना आकर्षित करतात. मात्र आपला व्यवसाय आहे तिथेचं असतो. त्यामुळे आपल्याला अनेकदा तोटा सहन करावा लागतो.
 • नैसर्गिक आपत्ती : व्यवसायाला तोट्यात ढकलण्यात नैसर्गिक आपत्ती हे महत्वाचे कारण आहे. कोरोनासारखी महामारी आल्याने अनेकांचा व्यवसाय आज डबघाईला आला आहे. अनेकजणांनी आपले दुकान बंद केले आहे. अशावेळी मात्र व्यवसायीकांच्या हातात काहीच नसते. जर अशा आपत्तींचा अंदाज घेऊन वेळीचं काही पैशांची तरतूद केली असेल, तर व्यवसायिक यातून सावरू देखील शकतो.

इंटर्नल प्रोब्लेम्स : व्यवसायात एक्सटर्नल प्रोब्लेम्स प्रमाणे इंटर्नल प्रोब्लेम्स देखील असतात. अनेकदा आपण विकत असलेल्या प्रोडक्टची गुणवत्ता खालवली की व्यवसायात तोटा सहन करवा लागतो. बाजारात अनेकजण आपल्या सारखे प्रोडक्टस घेऊन विकायला आलेले असतात. त्यात आपल्या प्रोडक्टची गुणवत्ता खालवलेली असेल तर नक्कीच ग्राहक ते प्रोडक्ट घेणे टाळतो. अशावेळी मग तोटा सहन करावा लागतो.

 • मशीन प्रोब्लेम : अनेकजण आपल्या व्यवसायात पैसे जातात म्हणून आधुनिकीकरण करण्यास टाळाटाळ करतात. जुन्या मशीन्सवरचं काम करत असतात. त्यामुळे कच्चा मालाचे मोठे नुकसान होते. मशीन कालांतराने दुरुस्तीचे काम काढते. दुरुस्तीमध्ये पैसे घालवण्यास व्यवसायिक तयार असतात. मात्र नवीन मशीन्स घेण्यास तयार नसतात. त्यामुळे विनाकारण आर्थिक फटका सहन करावा लागतो.
 • कामगार समस्या : अनेकदा आपल्या व्यवसायात काम करणारे कामगार नाराज असतात. काम करण्याची त्यांची तयारी नसते. अशावेळी ते कामात टाळाटाळ करतात आमचा फायदा होत नाहीतर व्यवसायमालकाचे हित का जोपासायचे हा विचार करून अनेकदा मुद्दामून चुका करतात. त्यामुळे मालकाला तोटा सहन करावा लागतो आणि कालांतराने कामगारांमध्ये अभावी व्यवसाय बंद करावा लागतो.
 • लीडरशीप : अनेकदा लीडरशीप चुकीच्या पद्धतीने होत असते. त्यामुळेही धंद्यात अपयश येते. विनाकारण कामगार भरती अथवा जास्तीचे सल्लागार भरले जातात त्यामुळेही व्यवसायात फटका सहन करावा. कामगारांना योग्य पद्धतीने हाताळण्याचे कौशल्य जर लीडरमध्ये नसेल तर कामगारांमध्ये काम करण्याची इच्छा निर्माण होत नाही, अनेकदा लीडर हे कामगारांकडून जुन्या पद्धतीने काम करून घेण्याचा हट्ट धरतात. त्यामध्ये कोणतेच नाविन्य आणत नाहीत. अशावेळी व्यवसायात तोटा होतोचं होतो.

आतापर्यंत आपण व्यवसायात तोटा का होतो याबाबतचा आढावा घेतला. आता आपण तोट्यात गेलेला व्यवसाय बाहेरकसा काढता येईल याबाबत जाणून घेऊया.

 • व्यवसायात तोटा झाला असेल तर सर्वप्रथम त्याबाबत चिंता करू नये. आपण जर चिंताग्रस्त झालात तर आपण आपली विचार करण्याची क्षमता गमावून बसतो आणि आणखी तोट्यात जातो. त्यापेक्षा साकारात्मक विचार करा आणि मार्ग शोधा…
 • व्यवसायात पुढे काय होणार आहे, याबाबतचा तर्क तुम्ही जर आधीचं अचूक लावू शकत असाल तर तुम्ही अर्धी  लढाई इथेचं जिंकता. त्यामुळे योग्य तर्क लावा आणि व्यवसायाला तोट्यात जाण्यापासून रोखा.
 • अनेकजण व्यवसायात जास्त कर्ज घेऊन ठेवतात. भविष्यात पैसा येईल असा अंदाज लावून अनेकजण अधिकचे कर्ज घेतात. मात्र येणाऱ्या काळात असे काही होते ज्यामुळे मार्केटमधून म्हणावा इतका पैसे येत नाही. घेतलेले कर्ज हे डोईजड होते आणि परिणामी व्यवसाय बंद करवा लागतो. त्यामुळे शक्यतो अतिरिक्त कर्ज घेणे टाळा
 • व्यवसायात तोटा किती झाला याचा विचार करण्यापेक्षा नफा किती होईल याचा विचार करा. ज्यामुळे सकारात्मकता येईल आणि व्यवसायाला चालना मिळेल. आधुनिकीकरणावर भर द्या.
 • बाजारात आपले स्पर्धक कोण आहे. याचाही अभ्यास असू द्या अन्यथा तुम्ही गाफील रहाल आणि स्पर्धक पुढे निघून जाईल. असंं होऊन देऊ नका. बाजारातील प्रवाहानुसार ग्राहकांची मागणी पूर्ण करा.
 • व्यवसायातील सहकार्यांशी योग्य पद्धतीने सल्लामसलत करा. त्यांना विश्वासात घ्या. भविष्यातील व्यवसाया संबंधीचा आराखडा तयार करा. ज्यामुळे तोट्यात जाणाऱ्या व्यवसायाला बाहेर काढण्यासाठी योग्य मार्ग सापडलीत. अन्यथा तज्ञांचा सल्ला घ्या यामुळे काही अनुभव देखील तुमच्या कमी येतील.

हे पण वाचा

…म्हणून व्यवसायात येते अपयश, मुकेश अंबानींनी याच चुका टाळल्या आणि झाले अल्पावधीत श्रीमंत

Latest news
Related news

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here