अंदाज अर्थव्यवस्थेचा: भारत व जगासाठी आर्थिकदृष्टया कसे असेल सन २०२१?

सन २०२१ - अंदाज अर्थव्यवस्थेचा 

0

एक प्रचंड आव्हानात्मक वर्ष सरत आहे, त्यानिमित्ताने यातील चढ-उतार, सुधारणा आणि २०२१ मधील अर्थव्यवस्थेचा अंदाज व संभाव्य संधींचे मूल्यांकन करणे गरजेचे आहे. कोव्हिड-१९ साथीमुळे औद्योगिक उत्पादन, आयात, इंधनवापर अशा अनेक गोष्टींमध्ये घट झाल्याने जागतिक अर्थव्यवस्थेवर याचा नकारात्मक परिणाम झाला. वर्षातील पहिल्या तिमाहीत शेअर बाजारही कोसळला. त्यानंतर कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे लॉकडाऊनची मालिका सुरु झाली अन् लाखो लोकांचे रोजगार, बचत, अगदी दैनंदिन आयुष्यही संकटात आले.

मे महिन्यापासून अर्थव्यवस्थेत सकारात्मक सुधारणेचे संकेत दिसून येत आहेत. टप्प्या-टप्प्याने अनलॉक करत भारत पूर्णपणे लॉक़ाऊनमधून बाहेर पडला आहे. मार्च महिन्यापासून अर्थव्यवस्थेला झालेले नुकसान भरून काढणे गरजेचे होते. त्यामुळे सरकारने आर्थिक व सामाजिक सुधारणांचे कार्यक्रम हाती घेतले आहेत. दरम्यान येणारे वर्ष भारत व जगासाठी कसे असेल याचा अंदाज घेतला आहे

सन २०२१ – अंदाज अर्थव्यवस्थेचा – आर्थिक घसरणीनंतर केलेल्या उपाययोजना : 

  • कोणत्याही संकटात सर्वकाही पूर्वपदावर आणण्याकरिता विशेष आर्थिक उपाययोजना कराव्या लागतात.
  • बाजारपेठेतील उत्पादकता पूर्वस्थितीत आणण्याकरिता जगभरातील सरकारांनी आर्थिक प्रोत्साहन पॅकेजेस जाहीर केले.
  • उदा. अमेरिकी सरकारने मार्च महिन्यात २.७ ट्रिलियन डॉलरची मदत केली. तसेच अमेरिकी फेडरल रिझर्व्हने त्यानंतर ४ ट्रिलियन डॉलर्सची मदत दिली. यामुळे बाजाराला उभारी मिळाली, तसेच सर्वच क्षेत्रातील विस्कटलेली घडी सावरण्यास मदत झाली.
  • याचप्रमाणे, भारत सरकारने ‘आत्मनिर्भर भारत’ मोहीम सुरु केली. याअंतर्गत अर्थमंत्र्यांनी अनुदान, थेट लाभ हस्तांतरण आणि आर्थिक प्रोत्साहन यासह काही चलनिषयक योजनाही जाहीर केल्या.
  • भारताची लोकसंख्या जास्त असल्यामुळे येथे रुग्णांची संख्याही लाखोंच्या घरात नोंदवली गेली. सुदैवाने आता रुग्णसंख्येत घट होत आहे.
  • आत्मनिर्भर भारत मोहीमेच्या दोन टप्प्याद्वारे, विविध योजनांसाठी १४.४९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. तसेच, आर्थिक व्यवहारांना गती देण्यासाठी अतिरिक्त २.६५ लाख कोटी रुपयाची तरतूद तिसऱ्या टप्प्यात करण्यात आली.
  • यासोबतच, आरबीआयने ३१ ऑक्टोबर २०२० पर्यंत १२.७१ लाख कोटी रुपयांच्या स्वतंत्र उपाययोजना जाहीर केल्या.
  • २०२० च्या पहिल्या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्था सुमारे -२३% पर्यंत घसरली असली तरी सध्या ती अपेक्षित अंदाजापेक्षा उत्तम कामगिरी करत आहे.
  • आर्थिक वर्ष २०२१ च्या अखेरीस ५% च्या आसपास सकारात्मक वृद्धी दर नोंदवला जाण्याचा अंदाज आहे.

बाजाराचे अंदाज आणि पुढे जाण्याचा मार्ग: 

  • कोरोना विषाणूविरोधातील लढ्याबाबत सकारात्मक बातमी म्हणजे मॉडर्ना आणि फायजरप्रमाणेच बायोटेक या फार्मा संस्थांच्या कामगिरीने बाजारामध्ये सकारात्मक वातावरण दिसून आले.
  • लसीच्या यशस्वी चाचण्या, असंख्य संशोधन, चाचण्या जवळपास ९०% यशस्वी झाल्या आहेत.
  • आता या कंपन्या संबंधित ड्रग एजन्सीच्या मंजुरीच्या टप्प्यात आहेत. तज्ज्ञांच्या मते, लसीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होऊन जानेवारी अखेरपर्यंत लसीकरणाची मोहीम सुरू होईल. तसेच या आर्थिक वर्षाच्या अखेरीस याची अंमलबजावणी करण्यात येईल.
  • लसीच्या चाचण्यांसंबंधी बातमी, प्रोत्साहनपर पॅकेज आणि वाढीव औद्योगिक कामकाज यामुळे बाजाराला सुगीचे दिवस येऊ शकतील.
  • बाजारातील सध्याच्या सुधारणांनुसारही गुंतवणुकदारांचा दृष्टीकोन सावध असू शकतो, मात्र २०२२ आणि २०२३ या आर्थिक वर्षात जाताना एकूण अंदाज सकारात्मक असेल.
  • सर्वात चांगली कामगिरी करणा-या क्षेत्रांचा विचार करता, आयटी आणि फार्मा कंपन्यांनी यात अग्रस्थानी आहेत. त्यांनी मजबूत नफा कमावला.
  • यानंतर  ऑटोमोबाइल, सिमेंट आणि कंझ्युमर ड्युरेबल सेक्टर्सदेखील अर्थव्यवस्थेतील प्रगतीप्रमाणे चांगली सुधारणा करतील.
  • कोव्हिड-१९ महामारीला सुरवात झाल्यापासून बीएफएसआय क्षेत्रात, फिनटेक्स, एनबीएफसी, ब्रोकरेज फर्म्स यासारख्या बीएफएसआय क्षेत्रात आशादायी गुंतवणुकीच्या संधी निर्माण झाल्या आहे.
  • अमेरिकेमधील निवडणुकीमध्ये राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत ‘जो बिडेन’ यांचा विजय झाल्यामुळे आर्थिक सुधारणेची प्रक्रिया सुरू झाली आणि त्याचबरोबर नव्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
  • भारताबाबत विचार केल्यास, मे महिन्यापासून भारतातील परदेशी संस्थात्मक गुंतवणुकीमध्ये (FII) अखंड वृद्धी दिसून आली.
  • इक्विटी बाजारात २०२१ च्या अखेरीस उच्च परताव्यांची शक्यता आहे. बाजारपेठेने आर्थिक सुधारणानंतर १०-१२ टक्के परतावा देण्यास सुरूवात केली आहे.

एकूणच, २०२१ या वर्षात सुरुवातीला अंदाज केल्यापेक्षाही आशियाई अर्थव्यवस्थेत कित्येक पटींनी जास्त सुधारणा दिसून येणार असल्याने पुढील वर्षाचे चित्र नक्कीच आशादायी असेल.

श्री ज्योती रॉय
इक्विटी स्ट्रॅटजिस्ट
एंजल ब्रोकिंग लिमिटेड

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.