fbpx
4.7 C
London
Sunday, January 29, 2023

कमी बजेटमध्ये घर सजवायचे आहे? काळजी करू नका, बघा हॉल-बेडरूम सजावटीच्या उत्तम आयडीयाज

घर सजावट याबद्दल काय बोलावं? आपले घर सुंदर, आकर्षक, व्यवस्थित राहावे असे कुणाला नाही वाटतं. पण घर सजवणे यासाठी पैसा खर्च करावा लागतो. पण जर तुम्ही थोडं कल्पकतेने घर सजवतो म्हणालं तर तुमचे बजेट गडबडणार नाही आणि घराची सजावट देखील होईल. चला तर मग जाणून घेऊयात घर सजावटीच्या काही खास आयडीयाज…..

सुरुवात करूयात हॉल पासून…

हॉल म्हणजे घरात प्रवेश केल्यावरची पहिली बैठक रूम होय. हॉलचा लुक घरातील व्यक्तींबद्दल खूप काही सांगू शकतो. आणि ते म्हणतात ना, “फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन” म्हणून हॉलची रचना  व्यवस्थित, आकर्षक असणे गरजेचे आहे. जाणून घेऊयात हॉल डेकोरेटिंग आयडियाज…

hall decoration

-प्रकृतीला घरी आणा

एक सुंदर वनस्पती हॉलमध्ये ठेवल्याने प्राकृतिक वातावरण तयार होते. कलाकृतीच्या एका महागड्या वस्तूने देखील असे वातावरण तयार होत नाही. बेडच्या बाजूला हे वनस्पती ठेवा आणि त्याची लांबी बेड इतकी असायला हवी.

hall decoration 1

– पेंटिंग्स आणि फ्रेम्स.

न्यूट्रल शेडच्या भिंतीवर वेगवेगळ्या आकाराचे फ्रेम्स आणि पेंटिंग्स लावा. एक प्रकारचे दोन सोफे त्यामध्ये एक स्टूल ठेऊन टेबल लॅम्प किंवा फ्लॉवर वास ठेवा.

– झुंबर

सुंदर आणि आकर्षक झुंबर लावा. जर तुमचा हॉल मोठा असेल आणि तुमचे घर पीओपी चे असेल तर सिलिंग वर स्टोनचे दोन झुंबर लावा. यामुळे तुमच्या हॉलला एक शाही लुक येईल.

hall decoration 2

– सिग्नीचर स्टाईल.

ट्रेंडला सोडा आणि तुमची एक वेगळी स्टाईल तयार करा. एक प्रॉपर शोकेस बनवण्याऐवजी वापरीत नसलेले एखादे फर्निचर घ्या. त्याला एक क्लासी लुक देऊन तुमच्या आवडीनुसार फुलांनी, फ्रेम्सने, दगडांनी इ. सजवण्याचा प्रयत्न करा. ते देखील आकर्षक दिसेल.

hall decoration 3

– पुस्तके

जर तुम्ही ‘पुस्तकी किडा’ आहात म्हणजे तुम्हाला पुस्तका वाचायला आवडत असेल आणि तुमचा छंद असेल. तर तुम्ही तुमचे हॉल पुस्तकांनी सजवू शकता. शोकेसमध्ये थोडीशी जागा करा आणि त्यामध्ये तुमच्या आवडीची पुस्तके ठेवा. किंवा एखाद्या बुक टेबल शेल्फ मध्ये पुस्तके नीट लावून त्या टेबलवर एक फूलदाणी ठेवा. आपल्या छंदावरून पण तुम्ही हॉल सजवू शकता.

hall decoration 4

– पारंपरिक पासून मॉडर्न

भिंतीमध्ये रकाने असणे हे काही नवीन नाही. भिंतीमध्ये रकाने असणे, हे भरपूर शतकांपासून चालत आलेले आहे. पण आता मात्र याच पारंपरिक बाबीला एक नवा लुक दिला जात आहे. या रकान्यांना तुम्ही फ्रेम करू शकता. यात फ्रेम्स, पेंटिंग्स ठेऊ शकता, विजेचे दिवे, टेबल लॅम्प, आणि लांबीचे फ्लावर वास देखील ठेऊ शकता.

चला वळूयात बेडरूम सजवटीकडे…

-बेडरूम विथ ब्लॅक मॅजिक

फॅशनच्या बाबतीत काळा कदाचित सर्वात चांगला रंग आहे, तो अंतर्गत जागेत आणल्यावर तितकेच आकर्षक असल्याचे सिद्ध होते. बेडरूममध्ये सूक्ष्म, सुखदायक रंग असावेत असे एक गैरसमज आहे. बेडरुम देखील नाट्यमय असू शकतात. आपल्या बेडरूममधील अन्य गोष्टी रंगीबेरंगी ठेऊन एक भिंत काळ्या रंगाची रंगवा आणि उर्वरित तुमच्या आवडीच्या हलक्या रंगाच्या रंगवा. यामुळे तुमची बेडरूम बघा नक्की आकर्षक दिसेल.

bedroom 1

– लाईट कलरच्या भिंती

जर तुमचे घर पीओपीचे असले तर बेडरूममध्ये लाईट कलरच्या भिंती सोबत बॉर्डर्सना सिल्वर किंवा गोल्ड कोट करा ज्यामुळे  रूमला अगदी क्लासी लुक येतो. क्लासी म्हणण्यापेक्षा एकदम शाही लुक.

– झुंबर

हॉल प्रमाणे बेडरूमला देखील शाही लुक आणावयाचे असेल तर फक्त भिंती रंगवणेच नाही तर एक झुंबर  देखील लावणे म्हणजे ‘सोने पे सुहागा’ होय . यामुळे तुमच्या बेडरूमची सजावट अगदी शाही सजावट होणार.

bedroom 1 (1)

– पारंपरिक प्रिंटच्या पेंटिंग्स

बेडरुमध्ये तुम्ही पारंपरिक प्रिंटच्या पेंटिंग्स देखील लावू शकता. यामुळे बेडरुमला एक पारंपरिक लुक येणार. या पेंटिंग्स दिसायला छान आणि आकर्षक असतात.

bedroom 2

– वॉल प्रिंट

बेडरूममध्ये बेडच्या मागील एक भिंत प्रिंटेड करणे खूप छान आणि आकर्षक दिसते. जर तुमचे नवीन नवीन लग्न झालेले आहे, तर बेडरूम एक असे ठिकाण आहे जिथे सगळीकडे रोमान्स असतो. त्यामुळे एक भिंत फ्लोरल किंवा हर्ट शेपचे प्रिंट पेंट करा, आणि त्यावर तुमचा एक रोमँटिक कपल फोटोफ्रेम लावा. तुम्ही पेंटिंग करण्याऐवजी वॉल स्टिकर्स देखील लावू शकता.

bedroom 3

– पडदे

आपल्या बेडरूमच्या भिंतीच्या कलरनुसार त्यांना मॅच होतील असे पडदे निवडा. पडदे देखील तुमच्या रूमला लुक देण्यात खूप महत्त्व ठेवतात. मुलांच्या बेडरुममध्ये तुम्ही कार्टून्सचे पडदे लावू शकता.

Latest news
Related news

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here