Bloomberg Billionaires Index : वॉरन बफे, लॅरी पेज यांना मागे टाकत मुकेश अंबानी कसे आले सहाव्या क्रमाकांवर ?

0

रिलायन्स उद्योग समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी पुन्हा एकदा ब्लूमबर्ग बिलीओनेअर यादीत आपले स्थान बदलून वरच्या क्रमांकावर उडी मारली आहे. नुकतीच ब्लूमबर्ग बिलीओनेअर यांच्याकडून जगातील सर्वाधिक श्रीमंतांची यादी जाहीर करण्यात आली. या क्रमवारीत मुकेश अंबानी यांनी गुगलचे सहसंस्थापक लॅरी पेज यांना मागे टाकत सहावे स्थान पटकावले आहे. त्यामुळे आता मुकेश अंबानी हे आशियातील पहिले श्रीमंत आहेत ज्यांनी या बिलीओनेअर यादीत मनाचे स्थान पटकावले आहे.

काय आहे ब्लूमबर्ग बिलीओनेअर यादी ?

ब्लूमबर्ग बिलीओनेअर यादी ही एक अशी यादी आहे ज्यात जगातील श्रीमंतांची क्रमवारी ठरवली जाते. ही क्रमवारी ठरवताना उद्योजकांच्या दररोजच्या आर्थिक उलाढालीचा आढावा घेतला जातो आणि त्याचे पृथकरण करून क्रमवारीतले स्थान ठरवले जाते. ही स्थान दररोज अमेरिकेचे ट्रेडिंग मार्केट (शेअर मार्केट) बंद झाल्यानंतर निश्चित केले जाते.

सध्या या यादीत पहिल्या स्थानावर अमेझॉनचे मालक जेफ बेझोस हे आपली 184 अब्ज डॉलर्सची संपत्ती घेऊन आहेत. तर दुसऱ्या स्थानी बिल गेट्स (115 अब्ज डॉलर्स संपत्ती) तिसरा क्रमांक बर्नाड अर्नोल्ट यांचा आहे. चौथ्या आणि पाचव्या स्थानी फेसबुकचे मालक मार्क झुकेनबर्ग असून पाचव्या स्थानी स्टेल बार्मर हे आहेत. तर सहाव्या स्थानी मुकेश अंबानी यांनी आता आपले स्थान निश्चित केले आहे.10 जुलै रोजी त्यांची एकूण संपत्ती 70.10 अब्ज डॉलर अर्थात 5.25 लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. अंबानी यांनी बर्कशायर हॅथवेचे वॉरन बफे, गुगलचे लॅरी पेज आणि सर्जी ब्रिन यांना मागे टाकले आहे.

मुकेश अंबानी यांच्या संपत्तीचा आढावा

रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांची सध्याची संपत्ती 74.2 अब्ज डॉलर्स एवढी असून ही संपत्ती एका वर्षात 217 दशलक्ष डॉलर्सने वाढली आहे. कोरोनाच्या संक्रमानात अनेक व्यवसायांना आणि उद्योजकांना आर्थिक फटका सहन करावा लागला असला तरी अंबानी यांच्या जिओ डिजिटल प्लॅटफॉर्मला चांगली कमाई होती. तसेच याच काळात jio डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये फेसबुक सह अनेक विदेशी कंपन्यांनी गुंतवणूक केल्यामुळे काही महिन्यातचं अंबानी यांच्या संपत्तीत 1.18 लाख कोटी रुपयांची भर पडली. त्याचप्रमाणे अंबानी यांचा पेट्रोलियम ते टेलिकॉमपर्यंत विस्तारलेला व्यवसाय हा नेहमीच त्यांच्या उन्नतीचे कारक ठरला आहे.

याशिवाय रिलायन्सने नुकताच आपल्या भागधारकांसाठी राईट्स इश्यू आणला असून, त्याद्वारेही रिलायन्सच्या भांडवलामध्ये वाढ झाली. याचा फायदाही अंबानी यांना आपल्या संपत्तीमध्ये वाढ करताना झाला. रिलायन्स इंडस्ट्रीजने नुकतेच आपले बाजार भांडवलमूल्य 12 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक केले आहे. गेल्या 2 महिन्यांपासून रिलायन्सचे शेअर्स बाजारामध्ये नवनवीन उच्चांक गाठत असल्याने कंपनीची आणि तिचे प्रवर्तक असलेल्या अंबानी यांची मालमत्ता वाढत आहे.

जिओ डिजिटल प्लॅटफॉर्ममधील वाढलेली गुंतवणूक

फेसबुक, सिल्व्हर लेक पार्टनर्स, व्हिस्टा, जनरल अटलांटिक, केकेआर, मुबाडाला, सिल्व्हर लेक, एडीआयए, टीपीजी, एल कॅटरटन, पीआयएफ यांनी जिओमध्ये गुंतवणूक केली आहे. रिलायन्सने जिओ प्लॅटफॉर्मच्या भागभांडवलातून 117,588.45 कोटी रुपये जमा केले आहेत. आतापर्यंत जिओ प्लॅटफॉर्ममधील 25.09 टक्के भागीदारीसाठी गुंतवणूक मिळाली आहे.

  • फेसबुकने रिलायन्स इंडस्ट्रीजच्या ग्रुप कंपनी जियो प्लॅटफॉर्म लिमिटेडमध्ये 10 टक्के हिस्सा खरेदी करण्यासाठी 5.7 अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे.
  • इक्विटी कंपनी सिल्व्हर लेक पार्टनर्सने रिलायन्स इंडस्ट्रीजच्या जिओ प्लॅटफॉर्ममध्ये 1.15% हिस्सा विकत घेतला आहे. जिओ प्लॅटफॉर्मवर सिल्व्हर लेक 5,655.75 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.
  • व्हिस्टा इक्विटी पार्टनर्स (व्हिस्टा) जिओ प्लॅटफॉर्मवर 11,367 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.
  • अमेरिकन प्रायव्हेट इक्विटी कंपनी जनरल अटलांटिकने रिलायन्स जिओमध्ये 6598 कोटींची गुंतवणूक केली आहे.
  • अमेरिकेची खासगी इक्विटी कंपनी केकेआरने 11367 कोटी रुपये जिओमध्ये गुंतवले आहेत.
  • अबू धाबीच्या मुबाडाला इन्व्हेस्टमेंट कंपनीने जिओमधील 1.85 टक्के भागभांडवलाच्या बदल्यात 9,093.6 कोटी रुपये गुंतवले आहेत.
  • अबूधाबी इन्व्हेस्टमेंट अथॉरिटीने (एडीआयए) 5683.05 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.
  • टीजीपी इन्व्हेस्टमेंटने 4546.8 कोटी तर एल कॅटरटनने 1894.5 इतकी गुंतवणूक केली आहे.
  • गुगल जिओ प्लँटफॉर्ममध्ये 33733 कोटींची गुंतवणूक करणार आहे.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.