fbpx
6.5 C
London
Sunday, February 5, 2023

#Business : व्यवसाय कसा निवडावा, सुरुवात कशी करावी जाणून घ्या एका क्लिकवर

व्यावसाय केला की खूप पैसा मिळतो, झटपट श्रीमंत होता येतं. असा विचार घेऊन अनेकजण व्यवसाय क्षेत्रात पाऊल ठेवतात. मात्र अनेकजण व्यवसायासाठी लागणाऱ्या मूलभूत गोष्टींचा विचार करत नाही. त्यामुळे भविष्यात व्यवसायात यश मिळत नाही. मोठा तोटा सहन करावा लागतो. मात्र जर तुम्हीही या क्षेत्रात उतरण्याविषयी विचार करत असला तर आम्ही आज तुम्हाला काही टिप्स देणार आहोत. यात व्यवसाय कसा निवडायचा, त्याची सुरुवात कशी करायची, विस्तार कसा वाढवायचा यांसारख्या प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेणार आहोत.

१. व्यवसाय कसा निवडावा ?

अनेकजण ज्या गोष्टीत जास्त नफा आहे असा व्यवसाय शोधत असतात. परंतु आपल्याला या क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल तर व्यवसाय निवडताना, आपली आवड निवड, व्यवसाय कुठे करायचाय? आपली स्पर्धा कोणाशी असणार आहे? ग्राहकांना या गोष्टींची किती गरज आहे? या आणि यांसारख्या अनेक गोष्टींचा विचार करावा. एखाद्या क्षेत्राची आपल्याला आवड असेल तर त्या क्षेत्रात कशा प्रकारे व्यवसाय निर्माण करू शकतो याचा विचार करावा. तसेच बाजारातील स्पर्धा आणि गरज ओळखून व्यवसाय निवडावा.

२. व्यवसायाची सखोल माहिती घ्या.

आपण एकदा व्यवसाय निवडला की त्याच्याशी संबंधित शक्य असेल त्या माहितीचा विचार करावा. त्यात इतर जे लोक हा व्यवसाय करत आहेत त्यांना भेटून यातील बारकावे शिकून घ्यावेत. त्यानंतर बाजारात व्यवसायाची जी काही स्थिती असेल त्या स्थित अजून काही नवीन करू शकतो का याचा विचार करावा. जो व्यवसाय करणार आहोत त्याला जोडून अजून काही गोष्टी आहेत का की ज्यांची सांगड आपण घालू शकतो या गोष्टीची सखोल माहिती घ्यावी. आणि योग्य नियोजन करावे.

business management

 

 

३. व्यवसायाचे योग्य नियोजन करावे

आतापर्यंत व्यवसाय कसा निवडावा आणि त्याची बाजारातील परिस्थिती ओळखून अधिकची माहिती कशी घ्यायची याविषयी जाणून घेतले. परंतु वरील गोष्टींचा विचार करून आपल्याला व्यवसायाचे नियोजन करणे गरजेचे आहे. कारण हेच नियोजन आपला व्यवसाय मोठा होण्यास मदत करणार आहे. या व्यवसायासाठी पैसे कुठून येणार? कच्चा किंवा पक्का माल कुठून येणार? त्याची किंमत किती असणार? आपल्याला झालेल्या नफ्याचा वापर आपण पुढील कामासाठी कसा करणार या आणि यांसारख्या अनेक प्रश्नांचे योग्य नियोजन करून त्याची अंमलबजावणी करावी.

४. जमा-खर्चावर लक्ष ठेवा

व्यवसाय सुरु झाल्यानंतर पैशाची देवाण घेवाण सुरु होते. बऱ्याच वेळा कामाच्या व्यापामुळे जमा-खर्चाकडे आपले दुर्लक्ष होते. परंतु पैशांसह नियोजन करणे खूप जास्त महत्वाचे आहे. कारण व्यवसाय सुरु करते वेळी आपण सर्वप्रथम आपल्याला नफा किती मिळणार याचा विचार करतो. परंतु योग्य वेळी याची नोंद ठेवली नाही तर आपल्याला नफ्याचा आणि तोट्याचा अंदाज येणार नाही. त्यामुळे आपल्याकडून एखादी चूक झाली असेल तर त्याची भरपाई आपल्याला भविष्यात करावी लागू शकते. त्यामुळे याकडे लक्ष वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे.

money management

 

५. सरकारकडून परवानगी घ्या

कोणताही व्यवसाय करायचा असेल तर त्यासाठी शासन मंजुरी काढावी. असे केल्याने आपल्या व्यवसायाची नोंद संबंधित कार्यालयात होते. त्यामुळे भविष्यात येणाऱ्या आपत्ती पासून आपल्याला त्रास होणार नाही. भविष्यात आपल्याला नैसर्गिक आपत्ती, अतिक्रमण, सरकारच्या नवीन नियमामुळे घेण्यात आलेल्या निर्णयांमुळे आपल्याला होणाऱ्या नुकसानाचा मोबदला मिळावा यासाठी हे गरजेचे आहे.

६. व्यवसायाची जाहिरात करा

जाहिरातीशिवाय व्यवसाय म्हणजे सुंदर मुलीला अंधारात डोळा मारणे होय. जाहिरात न करता जर व्यवसाय करणार असाल तर तुम्ही या क्षेत्रात कधीही यशस्वी होणार नाहीत. आपली वस्तू किंवा सेवा ग्राहकांना कशी गरजेची आहे हे पटवून देण्यासाठी जाहिरातींचा वापर करा. जेणेकरून आपल्याला योग्य त्या ग्राहकांपर्यंत पोहोचणे सोपे जाईल.

७. अडचणीच्या काळात स्वतःवर विश्वास ठेवा

व्यवसाय क्षेत्रात उतरायचे म्हणजे मोठी रिस्क असते. अनेकवेळा आपल्याला यात तोटा सहन करावा लागतो. त्यामुळे अशा अडचणीच्या काळात स्वतःवर विश्वास ठेवणे गरजेचे आहे. यावेळी आपण जर काही चुका झाल्या असतील तर त्या दुरुस्त करण्यासाठी काय उपाययोजना असतील याचा शोध घ्यावा. जेणेकरून भविष्यात या नुकसानापासून आपल्याला तोटा होणार नाही.

Latest news
Related news

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here