…म्हणून व्यवसायात येते अपयश, मुकेश अंबानींनी याच चुका टाळल्या आणि झाले अल्पावधीत श्रीमंत
भारत ही जगासाठी सर्वात मोठी बाजार पेठ आहे. जागतिक बाजारातील प्रत्येक उत्पादक आपले प्रोडक्ट भारतात विकण्यासाठी आणण्याचा प्रयत्न करत असतो. लोकसंख्येने भरलेल्या या देशात अनेक वापरकर्ते असल्याने प्रत्येक परदेशी उत्पादकास भारतीय बाजारपेठ आकर्षित करत असते. त्यामुळेचं आज भारतात फेसबुक, अमेझॉन, यु ट्यूब, अनेक इलेक्ट्रॉनिक कंपन्या, फूड कंपन्या, KFC, यासारखे अनेक व्यवसायिक ठाण मांडून बसले आहेत. नुसतेच बसले नाही तर त्यांनी एकट्या भारताच्या जीवावर कितीतरी अब्ज रुपये देखील कमावले आहेत. हेच पैसे भारतीय व्यावसायिकाला का बरं कमवता येत नाही. नेमकं भारतीय व्यवसायिकाचं चुकतं कुठे? अशा काय चूका होतात ज्यामुळे भरमसाठ भांडवल टाकूनही व्यवसाय काही दिवसांनी डबघाईला येतो ?
आज आम्ही आमच्या लेखातून अशा कोणत्या चुका व्यवसायिकांकडून होतात याबाबत माहिती देणार आहोत. कदाचित या चुका तुम्ही सध्या व्यवसाय करताना नकळतपणे करतही असाल पण तुमच्या लक्षात येत नसतील. तर काहीजणांनी याच चुका करून आपला व्यवसाय बंद देखील केला असेल.
1. स्वतःच्या नफ्यावर अधिक लक्ष
अनेक व्यवसायिक व्यवसाय सुरु करताना मला नफा किती मिळेल याचा विचार करतात. मात्र माझ्या ग्राहकाला यामुळे किती फायदा होईल याचा विचारचं आपण करत नाही. तिथेचं आपण पहिली चूक करून बसतो. मात्र हीच चूक जर आपण सुरवातीलाचं सुधारली तर आपला व्यवसाय निरंतर चालू शकतो.
ग्राहकाची पैसे खर्च करण्याची क्षमता आणि त्याला नेमकं काय हवं आहे? हे जर आपल्या लक्षात आले तर आपण सहजरित्या ग्राहकाला आपल्या नियंत्रणात आणू शकतो. जर ग्राहकाच्या खर्च करण्याच्या क्षमतेत आपण आपले उत्पादन दिले तर ग्राहक नक्कीचं त्याचा स्वीकार करतो. किंवा आपले उत्पादन नेमकं कोणत्या वर्गातील ग्राहकांसाठी आहे हे जरी आपण आधीचं ठरवले तर याचा नक्कीचं आपल्यला फायदा होतो. त्यामुळे आपल्याला नफ्याकडे न पाहता ग्राहकांचे समाधान करण्याला जास्त प्राधान्य दिले तर याचा उपयोग व्यवसाय वाढीस नक्कीचं होतो.
2. आपलं टार्गेट ऑडीअन्स योग्य पद्धतीने निवडा
अनेकदा व्यवसाय सुरु केल्यानंतर आपला ग्राहक नक्की कोणत्या वयोगटातला आहे याचा आपण अभ्यासचं करत नाही. त्यामुळे बरेचदा आपला व्यवसाय भरकटलेला वाटतो. जर तुम्ही तुमचा योग्य ग्राहक अचूकपणे ओळखलात तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल. उदा. जर तुम्ही तरुणांच्या जीवनाशी निगडित एखादे प्रोडक्ट आणत असालं तर त्याचं मार्केटींग किंवा जाहिरातबाजी तरुणांच्या घोळक्यात झाली पाहिजे. मार्क झुकेरबर्ग यांनी जेव्हा फेसबुक आणले तेव्हा ते हावर्ड युनिव्हर्सिटीमध्येचं जास्त प्रसिद्ध झाले. तिथल्या तरूणांनी याला चांगलीच पसंती दिली. तिथेच झुकेरबर्ग यांना त्यांचा ऑडिअन्स मिळाला. त्यानंतर त्यांनी आपले प्रोडकट सर्वांसाठी बाजारात आणले.
3. कॅश फ्लोचा अभाव
बरेचदा व्यवसायिक भांडवल रुपी व्यवसायात बरेच पैसे गुंतवतात. ते पैसे बाजारात आणल्यानंतर लवकरात लवकर मोकळे करण्याचा प्रयत्न व्यवसायिकांनी करावा. सुरवातीला नफा कमी असला तरी बाजारातून व्यवसायात पैशाचा फ्लो असावा (रोलिंग मनी) , असे अनुभवी व्यवसायिक सांगतात. मात्र अनेक व्यवसायिक मार्केटमधून पैसे कमविण्यात अयशस्वी ठरतात. नफा मिळवण्याच्या नादात प्रोडक्ट तसेच रोखून ठेवतात. त्यामुळे पैसे अडकून राहतात आणि कालांतराने तोटा सहन करावा लागतो. त्यामुळे बाजारात पैसा खेळता राहणे फार महत्वाचे आहे. बाजारात पैसा प्रवाहित राहिला तर भांडवलाची कमी जाणवत नाही. जर तुम्ही असे करण्यात यशस्वी झालात तर नक्कीच तुमचा व्यवसाय निरंतर चालू शकतो आणि कालांतराने नफा मिळू शकतो.
4. भरमसाठ योजना आणि सूट
अनेक व्यवसायिक सुरवातीला भरमसाठ योजना आणि सूट देऊन ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात. बाजराची सध्याची परिस्थिती आणि भविष्यात असणारी परिस्थिती याचा अभ्यास न करता जर आपण योजना आणि सूट देत असाल तर याचा फटका नक्कीच सहन करावा लागतो.
अनेकजण सुरवातीला सूट आणि योजना देतात त्यानंतर कोणीतरी फंडिंग करेल याची वाट बघतात. मात्र तो पर्यंत व्यवसायाची परिस्थिती इतकी बिकट झालेली असते की त्याला फंडिंग करणारा देखील आखडता हात घेतो. स्पर्धेच्या जगात ग्राहकांना योजना आणि सूट दिली तरच ते आकर्षित होतात, असा समज चुकीचा आहे. बहुतांशी वेळेला अनेक व्यवसाय हे अनुकरणीय असतात याआधी कोणीतरी व्यवसायाची ही संकल्पना बाजारात आणलेली असते, आपण हीच संकल्पना कॉपी करतो आणि ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी योजना आणि सूट देऊन चूक करतो.
5. व्यवसाय निवडताना घाई
बाजारात नेहमीच व्यवसायाचे प्रवाह असतात. अनेक व्यवसाय येतात आणि अवघ्या काही काळात बाजाराचा ताबा घेतात. आपण अशाच व्यवसायाच्या मागे लागतो आणि त्याच व्यवसायाची निवड करून बाजारात उतरतो. बाजारात आल्यानंतर वर म्हटल्याप्रमाणे योजना आणि सूटचा भडिमार करत स्पर्धा वाढवून व्यवसाय क्लिष्ट करून टाकतो. त्यामुळे सुरवातीलाचं व्यवसाय निवडताना नवी संकल्पना आणण्याचा प्रयत्न करा ज्यामुळे व्यवसायाला चलना मिळवायला आणि अभ्यास करायला पुरेसा वेळ मिळेल. त्यामुळे व्यवसाय निवडताना घाई करू नका.
6. ग्राहकांच्या अभिप्रायाकडे दुर्लक्ष
अनेक व्यवसायिक ग्राहकांच्या अभिप्रायाकडे दुर्लक्ष करून मोठी चूक करतात. ग्राहक जेव्हा तुम्हाला अभिप्राय, एखादी सूचना किंवा तक्रार करत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. ग्राहक जेव्हा तुम्हाला अभिप्राय देत असतो त्यांचाचं अर्थ तो तुमच्याशी निरंतर राहण्याच्या तयारीत आहे. मात्र जर आपण या अभिप्रायाकडे दुर्लक्ष केलं तर ग्राहक दुरावण्याची शक्यता असते. त्यामुळे अभिप्रायाकडे दुर्लक्ष करू नका. जर तस होत असेल तर वेळीच त्याची दखल घेण्यास सुरुवात करा.
या काही बेसिक चुका आहेत ज्या अनेक व्यवसायिकांकडून नकळतपणे होतात आणि त्यानंतर व्यवसाय बंद करण्यास कारणीभूत ठरतात. आपण वरती आता व्यवसायिक करत असलेल्या चुकांचा पाढा वाचला. पण याच चुका न करता मुकेश अंबानी यांनी आपले जिओ नेटवर्क बाजारात कसे आणले हे देखील जाणून घेऊ.
जेव्हा भारतीय टेलिकॉम बाजारात आयडिया एअरटेल, टेलीनॉर, व्होडाफोन सारख्या कंपन्या अधिराज्य गाजवत होत्या तेव्हाचं मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स ग्रुपने ग्राहकांची गरज ओळखून फास्टेस्ट नेटवर्कची संकल्पना आणली. जेव्हा बाजारात 150 रुपयात महिनाभर 1 GB डेटा इतर कंपन्या देत होत्या तेव्हाच अंबानी यांनी नफ्याचा विचार न करता जिओ नेटवर्क फ्री मध्ये बाजारात आणले. सुरवातीला ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी त्यांनी ही एक प्रकारची योजनाचं राबवली. त्यामुळे बाकीच्या कंपन्यांना देखील टक्कर देता आली आणि आपले नेटवर्कची क्रेझ ग्राहकांमध्ये निर्माण केली.
अंबानी यांनी 4g ही काळाची गरज आहे हे वेळीच ओळखले. त्यानंतर तरुणांना टार्गेट करून आपली नेटवर्क सेवा बाजारात आणली. त्यामुळे अल्पावधीतचं जिओ हे पॉप्युलर झाले. मात्र जिओला टक्कर देण्यासाठी आयडिया, एअरटेल, व्होडाफोन या कंपन्यांनी ग्राहकांना भरमसाठ योजना देऊ केल्या पण त्याचवेळी दुसरीकडे त्यांच्या नेटवर्क क्वालिटीमध्ये त्यांनी तडजोडी केली. त्यामुळे ग्राहक अजूनच त्यांच्यापासून दुरावले. व्यवसायात नवीन असून सुद्धा योग्य ध्येय ठेऊन आलेल्या मुकेश अंबानी यांच्या जिओ प्लॅटफॉर्मला अल्पावधीतचं लोकप्रियता मिळाली.