काय आहे भानगड ? आता घरची गृहिणीही होणार मालामाल, 60 वर्षांनी तीही घेणार पेन्शन

0

आर्थिक : अनेक अर्थशास्त्राचे अभ्यासक म्हणतात येणारा काळ हा महागाईचा आहे. आता प्रत्येकाची इच्छा असते की त्याच्या घरातील सर्व सदस्यांनी काहीतरी करत रहावे, म्हणूनच आज बहुतेक पुरुष लग्नासाठी काम करणारा जोडीदार शोधतात. परंतु सध्याच्या परिस्थितीत पत्नी गृहिणी आहे आणि जर तिला स्वतंत्र बनवायचे असेल तर सरकारची एक महत्वाची योजना आहे ज्याद्वारे दरमहा पत्नीच्या खात्यातून उत्पन्न मिळेल त्यासाठी आपण राष्ट्रीय पेन्शन योजनेत (एनपीएस) गुंतवणूक करून आपल्या पत्नीस स्वावलंबी बनवू शकता. या योजनेद्वारे नियमित उत्पन्नाचीही व्यवस्था होईल.

पत्नीच्या नावे असे खाते उघडा

आपल्या पत्नीस स्वतंत्र बनविण्यासाठी आपण तिच्या नावावर एनपीएस खाते उघडू शकता. एनपीएस खाते आपल्या पत्नीचे वय 60 वर्षे पूर्ण झाल्यावर फिक्स रक्कम देईल. याव्यतिरिक्त, त्यांना दरमहा पेन्शन म्हणून नियमित उत्पन्न देखील मिळेल. एनपीएस खात्यासह आपण ठरवू शकता की आपल्या पत्नीला दरमहा किती पेन्शन मिळेल. यासह, आपली पत्नी वयाच्या 60 वर्षानंतर पैशासाठी कोणावरही अवलंबून राहणार नाही.

एनपीएस खाते वयाच्या 60 व्या वर्षी परिपक्व (Mature) होईल

आपण आपल्या सोयीनुसार दरमहा किंवा वार्षिक एनपीएस खात्यात पैसे जमा करू शकता. आपण पत्नीच्या नावावर एक हजार रुपयांमधून एनपीएस खाते उघडू शकता. वयाच्या 60 व्या वर्षी एनपीएस खाते परिपक्व होते. नवीन नियमांनुसार, जर आपणास पत्नीचे वय 65 वर्षे होईपर्यंत एनपीएस खात्यात पैसे टाकणे चालू ठेऊ शकता.

45 हजार रुपये दरमहा मिळवा

सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास जर तुमची पत्नी 30 वर्षांची आहे आणि जर आपण त्यांच्या एनपीएस खात्यात दरमहा 5000 रुपये गुंतवत असाल तर त्यांना वर्षाकाठी 10% परतावा मिळतो. याद्वारे पत्नीच्या वयाच्या 60 व्या वर्षी तिच्या खात्यात एकूण 1.12 कोटी रुपये असतील. यातून पत्नीला सुमारे 45 लाख रुपये मिळतील. याशिवाय त्यांना दरमहा सुमारे 45,000 रुपये पेन्शन मिळेल. त्यांना आयुष्यभर ही पेन्शन मिळेल.

एनपीएस योजनेची ठळक वैशिष्ट्ये

  • किती पेन्शन मिळेल : 45,000
  • वय – 30 वर्षे
  • एकूण गुंतवणूकीचा कालावधी – 30 वर्षे
  • मासिक योगदान – 5000 रु
  • गुंतवणूकीवर अंदाजित परतावा – 10%
  • परिपक्व झाल्यावर एकूण पेन्शन फंड – 1,11,98,471 रुपये काढले जाऊ शकतात.
  • न्युइटी योजना खरेदी करण्यासाठी 44,79,388 रक्कम.
  • 67,19,083 अंदाजित वार्षिकी दर 8%
  • मासिक पेन्शन – 44,793 रुपये

हे पण वाचा

Leave A Reply

Your email address will not be published.