fbpx
1.1 C
London
Thursday, February 9, 2023

भारतातली श्रीमंत महिला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोशनी नादरबाबत तुम्हाला माहितीये का ?

आजकालच्या जगात महिला या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. जगातील महत्वाच्या पदांवर महिला काम करत असलेल्या दिसतात. तसेच श्रीमंतांच्या यादीतही महिलांनी स्थान मिळवले आहे. जेव्हा आपण देशातील सर्वात श्रीमंत महिलांविषयी बोलतो त्यावेळी एचसीएल टेक्नॉलॉजीजच्या अध्यक्षा रोशनी नादर यांचे नाव चर्चेत येते.

रोशनी नादर या एचसीएलचे संस्थापक शिव नादर यांची मुलगी म्हणून ओळखली जाते. 38 वर्षीय रोशनी नादर मल्होत्रा यांची भारतातील तिसर्या क्रमांकाची सॉफ्टवेअर निर्यातक एचसीएल टेक्नॉलॉजीजच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी त्या एचसीएल एंटरप्राइझची कार्यकारी संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी होत्या. आज आपण त्यांच्या जीवनाशी संबंधित काही खास गोष्टी जाणून घेऊयात…

प्रारंभिक जीवन

रोशनी नादर यांचा जन्म 1982 मध्ये दिल्ली येथे झाला. रोशनी नादर मल्होत्रा असे त्यांचे पूर्ण नाव आहे. रोशनी नादर मल्होत्राएचसीएल एंटरप्राइझची कार्यकारी निर्देशक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. एचसीएलचे संस्थापक शिव नादर आणि किरण नादर यांची ती एकुलती एक मुलगी आहे.

शिक्षण आणि करिअर

रोशनी नादर यांनी आपले प्रारंभिक शिक्षण वसंत व्हॅली स्कूल, नवी दिल्ली येथून पूर्ण केले. त्यांनी रेडिओ / टीव्ही / चित्रपट क्षेत्रात नॉर्थवेस्टर्न विद्यापीठातून कम्युनिकेशन्समध्ये पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी केलॉग स्कूल ऑफ मॅनेजमेंटमधून सोशल एंटरप्राइझ मॅनेजमेन्ट आणि स्ट्रॅटेजीवर आधारित बिझिनेस अडमिनिस्ट्रेशन मध्ये मास्टर्स ही पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी अनेक कंपन्यांमध्ये वृत्त निर्माता म्हणून काही काळ काम केले. त्यानंतर २००९ मध्ये त्या एचसीएल कंपनीत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून रुजू झाल्या.

एचसीएलमध्ये रुजू झाल्यानंतर एका वर्षाच्या आत त्यांची पदोन्नती एचसीएलचे कार्यकारी संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून झाली. एचसीएल कॉर्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी होण्यापूर्वी रोशनी नादर हे चेन्नईतील श्री शिवसुब्रमण्य नादर कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग चालवणाऱ्या शिव नादर फाऊंडेशनच्या विश्वस्त म्हणून काम करत होत्या. रोशनी नादर आर्थिकदृष्ट्या वंचित असलेल्या विद्याज्ञान लीडरशिप अकॅडमी या नेतृत्व अकादमीच्या अध्यक्ष आहेत.

वैवाहिक जीवन

रोशनी नादरने 2010 मध्ये शिखर मल्होत्राशी लग्न केले. शिखर हे एचसीएल हेल्थकेअरचे उपाध्यक्ष म्हणून काम करतात. शिखर आणि रोशनी यांना 2013 आणि 2017 मध्ये जन्मलेली अरमान आणि जहान ही दोन मुले आहेत. शिखर विश्वस्त म्हणून शिव नादर फाऊंडेशनमध्ये अनेक भूमिका साकारत आहेत.  तसेच ते शिव नादर स्कूलचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी देखील आहेत. शिखरने आपली पत्नी रोशनी नादर मल्होत्रा यांच्यासमवेत 2018 मध्ये हॅबिट्स ट्रस्टची सह-स्थापना केली. वन्यजीव आणि संवर्धन व्यतिरिक्त त्यांना विशेषत: फुटबॉलविषयी प्रेम आहे.

वडिलांशी आहे जिव्हाळ्याचा संबंध

भारताचे आयटी तज्ञ शिव नादर यांची कन्या रोशनी नादर मल्होत्रा यांचे वडिलांशी चांगले संबंध आहेत. वयाच्या अवघ्या 38 व्या वर्षी त्याच्या वडिलांनी एचसीएल कंपनीची जबाबदारी रोशनीच्या खांद्यावर टाकली आणि त्यांना एचसीएलचे नवीन अध्यक्ष नियुक्त केले आणि स्वतः अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.

सर्वात शक्तिशाली महिलांपैकी एक

मुख्य कार्यकारी अधिकारी रोशनी यांच्या कामगिरीची यादी लांब आहे. फोर्ब्स मासिकाच्या म्हणण्यानुसार रोशनी मल्होत्रा जगातील 100 सर्वात शक्तिशाली महिलांपैकी एक आहे तसेच देशातील सर्वात श्रीमंत महिलांपैकी एक आहे. 36,800 कोटी रुपयांची संपत्ती असलेली रोशनी या भारतातील सर्वात श्रीमंत महिला आहेत. 2019 मध्ये, फोर्ब्सच्या जगातील 100 सर्वात सामर्थ्यवान महिलांच्या यादीत त्या 54 व्या स्थानावर होत्या.

Latest news
Related news

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here