fbpx
18.6 C
London
Saturday, October 1, 2022

SBI चा मोठा निर्णय : सेवानिवृत्त कामगारांना पुन्हा करून घेणार भरती, महिन्याला मिळणार 40 हजार पगार

भारतातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने कराराच्या आधारे एसबीआय सेवानिवृत्त कर्मचार्‍यांची भरती करण्यास सुरवात केली आहे. इतर बँकांमधील सेवानिवृत्त बँक कर्मचार्‍यांचादेखील विचार केला जाणार आहे. स्थानिक कार्यालये (एलएचओ) किंवा देशभरातील एसबीआय बँकेच्या मंडळे यांनी निवृत्त झालेल्या एसबीआय कर्मचार्‍यांना कामावर घेण्यास सुरवात केली आहे.

दिल्लीत काही महिन्यांपूर्वी ही प्रक्रिया सुरू झाली असताना हैदराबाद, अमरावती, पटना, मुंबई मेट्रो आणि महाराष्ट्रातील सेवानिवृत्त एसबीआय कर्मचार्‍यांना कामावर घेतले जात आहे. यात वयाच्या 63 व्या वर्षापर्यंतचे सर्व एसबीआय सेवानिवृत्त कर्मचारी अर्ज करण्यास पात्र आहेत. मात्र तेच कर्मचारी अर्ज करू शकतात ज्याने स्केल 1 ते स्केल 5 दरम्यान सेवा दिली आहे त्यांना कंत्राटी नोकरीसाठी विचारात घेतले जाईल.

दरम्यान, एखाद्या मंडळामध्ये पुरेसे एसबीआय कर्मचारी नसल्यास अन्य पीएसयू बँकांमधील सेवानिवृत्त कर्मचार्‍यांचा देखील विचार केला जाऊ शकतो. या सर्व कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन 30 ते 40 हजार रुपये असेल आणि करार एका वर्षासाठी असेल. एसबीआय सेवानिवृत्त कर्मचार्‍यांची नेमणूक डिजिटल ट्रान्झॅक्शन बँकिंग, एफआयएमएम नेटवर्क, टाइम बँकिंग, बिझिनेस कॉन्स्पस्पेंडेन्ट फॅसिलिटेटर्स आणि चॅनेल मॅनेजर / सुपरवायझर या पदांवर केली जाऊ शकते.

…म्हणून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना घेतलंं जातंय कामावर

सेवानिवृत्त कर्मचार्‍यांना पुन्हा कामावर घेण्याचे कोणतेही औपचारिक कारण एसबीआयने दिले नाही. मात्र सूत्रांच्या मते, मागणी व पुरवठा यातील अंतर भरून काढण्यासाठी सेवानिवृत्त बँक कर्मचार्‍यांना कामावर घेण्याची ही नवीन प्रक्रिया सुरू केली आहे. आता एसबीआयला अतिरिक्त कर्मचार्‍यांची गरज आहे. एसबीआय कमीत कमी एका वर्षात सेवानिवृत्त बँक कर्मचार्‍यांना कामावर घेत असल्याने पुढच्या वर्षी त्यांच्या एकूण कामकाजावर परिणाम दिसून येईल यामुळे भविष्यात एसबीआय कमी कर्मचारी ठेवू शकेल. तसेच कोरोनाच्या संक्रमणामुळे नवीन भारती शक्य नसल्याने SBIने हा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे.

रिक्त पदांच्या संख्येबद्दल विचारले असता एसबीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, भरती एसबीआय सर्कलच्या स्थानिक गरजांमुळे चालविली जात असल्याने एकत्रित आकडा देता येणार नाही. परंतु सूत्रांच्या माहितीनुसार कमीत कमी 500 जागा भरल्या जाऊ शकतात.

Latest news
Related news

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here