शेअर मार्केट ; हर्षद मेहता आणि ५ हजार कोटींचा घोटाळा

0

आपल्या भारताला विविधतेचा एक समृद्ध वारसा लाभला आहे.  एकसंघ भारत विविधतेने नटलेल्या आपला भारत देश सर्वार्थाने एक सुजलाम,सुफलाम देश आहे.  पण दुर्दैवाने आपल्या देशात मोठ्या प्रमाणावर घोटाळे आणि घोटाळेबाजांची एक मोठी मालिका आहे.  यामध्ये १९९६ चा चारा घोटाळा,२००८ चा 2G स्पेक्ट्रम घोटाळा,२०११ चा आदर्श घोटाळा किंवा अगदी अलीकडे सांगायचे झाले तर नुकताच झालेला पंजाब नॅशनल बँकेचा घोटाळा .आज आपण अशाच एका घोटाळ्याची माहिती पाहणार आहोत ज्या मुळे संपूर्ण शेअर मार्केट पुरते हादरून गेले होते. तो घोटाळा होता १९९२ चा शेअर मार्केट घोटाळा.

Harshad Mehta 2

१९९२ हे वर्ष देशाच्या इतिहासातील एक वादळी वर्ष होते असे म्हणता येईल. बाबरी मशीद,राममंदिर,रथयात्रा यावरून संपूर्ण देश अगदी ढवळून निघाला होता. आणि यातच हे वर्ष आणखी घटनेने महत्वाचे ठरले ते म्हणजे शेअर मार्केट घोटाळा आणि या घोटाळेबाजाचे नाव होते हर्षद मेहता.

हर्षद शांतीलाल मेहता हे नाव म्हणजे मुंबई चे प्रतिष्ठित स्टॉक मार्केट आपल्या बोटावर नाचवणारा ज्या शेअर बाजाराने भल्या-भल्या लोकांना अक्षरशः जेरीस आणले भल्याभल्यांना रस्त्यावर आणले त्या शेअर बाजारचा बादशाह म्हणून त्याला ओळखले जाऊ लागले.

बऱ्याचवेळा लोकं पैसे कमवण्यासाठी आपला पैसा शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवतात मेहताने मात्र स्वतः ला पैसे कमविण्यासाठी अख्ख शेअर मार्केट कामाला लावले.

Harshad Mehta 3

शाळेत जेमतेम असा विद्यार्थी असलेला हर्षद फारसा हुशार नव्हता. एकदा त्याला शाळेतून काढले देखील होते. त्यानंतर रायपूरहून काहीच वर्षात मुंबईतून शिक्षण घ्यायचं म्हणून खिश्यात चाळीस रुपये घेऊन तो मुंबईत बी.कॉम ही पदवी घेण्यासाठी आला. तसेही ही चाळीस रुपयांची रक्कम त्याकाळी काही कमी नव्हती. लाला लजपतराय कॉलेजातून त्याने पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर हर्षदने कपडे आणि इलेक्ट्रिकल उपकरणं विकण्याची नोकरी केली. नंतर त्याने न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीत सेल्स पर्सन म्हणून नोकरी स्वीकारली. प्रचंड महत्वकांक्षी असणारा हर्षद मेहता कोणतीही रिस्क घ्यायला तयार असायचा. तो कोणतीही नवीन सिस्टम तात्काळ शिकून घ्यायचा.

आठ वर्ष तो ठिकठिकाणी नोकरी करत होता. याच काळात त्याला शेअर मार्केटमध्ये आवड निर्माण झाली. नंतर काही शेअर दलालांकडे काम केल्यानंतर १९८४ साली हर्षद मेहताने स्वतःची स्टॉक मार्केट ब्रोकरेज कंपनी ‘ग्रो मोर रिसर्च अँड ऍसेट मॅनेजमेंट’ सुरु केली.

२३ एप्रिल १९९२ चा दिवस त्याच्यासाठी काळा दिवस ठरला. त्या दिवशी टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीने देशभरात खळबळ माजवली होती. ती बातमी चार हजार कोटींचा घोटाळा उघड करणारी होती. घोटाळा झाला होता तो शेअर मार्केटमध्ये. ही बातमी ब्रेक केली होती ती पत्रकार सुचेता दलाल यांनी. त्या दिवशी हर्षद मेहता या नावाचा बोलबाला झाला.
सीबीआय आणि सेबी ने मेहता ची कसून करून त्याच्यावर ५० पेक्षा गुन्हे दाखल केले.

१९९९ मध्ये न्यालयालाने मेहताला दोषी ठरवत पाच वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली ही शिक्षा भोगत असताना २००१ मध्ये मेहता चा मृत्यू झाला.

आताही विविध खटल्यांमध्ये मेहताच्या सहकाऱ्यांवर खटले सुरू आहे. नुकतीच मेहताच्या जीवनावर प्रकाश टाकणारी स्कॅम १९९२ ही वेब सिरीज सोनी लिव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली आहे.

 – संकेत देशपांडे 

Leave A Reply

Your email address will not be published.