Blue Chip Mutual Fund: तुम्हाला ब्लू-चिप म्युच्युअल फंडाबद्दल माहिती आहे का?

0

अनेकदा ब्लू-चिप स्टॉक किंवा ब्लू-चिप फंड (Blue Chip Mutual Fund) असे शब्द ऐकले असतील. मला नुकतीच एक मजेदार गोष्ट समजली की ब्लू-चिप हा शब्द पोकर या खेळापासून घेतला आहे. जेथे निळ्या रंगाचे पोकर चिप्स सर्वात उच्च मूल्याचे असतात. त्याचप्रमाणे, आजच्या स्टॉक मार्केटमध्ये, ब्लू-चिप हा शब्द उच्च-दर्जाच्या साठा किंवा मोठ्या कॅपचा संदर्भ घेण्यासाठी वापरला जातो.

आपला पैसा वाढवावा किंवा कुठे गुंतवणूक करावी याबद्दल कोणालाही विचारून बघा, वेगवेगळी उत्तरे मिळतील. माझ्या माहितीप्रमाणे, बहुतेक भारतीयांना त्यांच्या कष्टाचा पैसा इक्विटी किंवा स्टॉक मार्केटमध्ये ठेवण्याची भीती वाटते. याबद्दल काही दशकांपूर्वीची समस्या ‘माहितीचा अभाव’ ही होती पण आज जेव्हा भरभरून माहिती मिळविण्याचे विविध पर्याय उपलब्ध आहेत तरीही निर्णय घेण्याची अक्षमता आहे. वॉरेन बफेटने म्हणाल्याप्रमाणे स्त्रिया गुंतवणूकीत पटाईत असल्या तरी त्या धोका टाळण्याकडे भर देतात. स्त्रिया आपला पैसा गुंतवण्यासाठी फार वेळ विचार किंवा प्रयत्न करत नाही. हा कमकुवतपणा म्हणण्याऐवजी प्रत्यक्षात या स्वभावामुळे आम्हाला अधिक स्थिरता मिळते.

म्युच्युअल फंड का निवडावे?

 • जेव्हा आपले पैसे वाढवण्यासाठी इक्विटीचा वापर करू इच्छित असाल तेव्हा, गुंतवणूक करण्याचे दोन मार्ग असू शकतात – थेट कंपनी स्टॉक किंवा म्युच्युअल फंड.
 • डायरेक्ट स्टॉक अधिक फायदेशीर असू शकतात, परंतु त्यामध्ये जोखीम आणि अस्थिरतेचा भाग जास्त येतो. वैयक्तिक स्टॉकमध्ये योग्य संशोधन करणे, स्वत:चा पोर्टफोलिओ नेहमी मांडणे यासाठी लागणारा वेळ, प्रयत्न आणि एकाग्रता हे जिकिरीचे काम आहे. स्टॉकमधील डे ट्रेडिंग हा एक नुकसानकारक खेळ आहे, ज्यात गुंतवणुकदार पैसे गमावून बसतो.
 • दुसरीकडे, म्युच्युअल फंडमध्ये मोठ्या पोर्टफोलियोची मांडणी करणाऱ्या विशेष व्यापाऱ्यांचा एक मोठा गट काम करत असते. म्युच्युअल फंडद्वारे गुंतवणूक करता म्हणजे काय? तर, आपण नगण्य व्यवस्थापन फीच्या बदल्यात म्युच्युअल फंडच्या मोठ्या पोर्टफोलिओचा एक छोटा तुकडा विकत घेऊन मोठ्या कंपनीच्या गुंतवणुकीत आपला वाटा विकत घेता. भारतात एक रुढ समज आहे की, म्युच्युअल फंडांमुळे महागाई कमी होते आणि आपल्याकडचा पैसा वाढवता येतो.
 • भारतात विविध प्रकारचे म्युच्युअल फंड आहेत – जागतिक, स्थानिक किंवा संयुक्त.

कोणत्या प्रकारच्या म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करावी?

 • इक्विटी म्युच्युअल फंड हा असा फंडचा प्रकार आहे, जो इक्विटी मार्केटमधून आपल्या एकूण  निधीच्या ३०% ते ७०% परतावा मिळवितो.
 • इक्विटीमध्ये देखील कंपनीच्या मार्केट भांडवलीकरणच्या आधारावर स्टॉक्सचे प्रकार जसे की, लहान कॅप (Small Cap), मिड कॅप (Mid Cap) आणि मोठ्या कॅप (Large Cap) म्हणून वर्गीकृत केले जातात.
 • अर्थात, मोठे-कॅप साठा अधिक स्थिर आणि कमी धोकादायक असतात. कमी जोखीम लक्षात घेता, संभाव्य परतावा अन्य दोन श्रेण्यांपेक्षा कमी आहेत. सध्या सेबीला १०० पैकी सर्वात मोठी व्यापारी कंपनी म्हणून घोषित केले आहे.Blue Chip Mutual Fund: आयसीआयसीआय प्रूडेंशियल ब्लूचिप फंड 
 • अशा अनेक म्युच्युअल फंड कंपन्या आहेत जी ब्लूचिप फंड ची सोय देतात. आयसीआयसीआय प्रूडेंशियल ब्लू चिप फंड हा असा फंड आहे ज्याच्या नावावर ट्रॅक रेकॉर्ड आहे. गेल्या मे मध्ये याची दहा वर्ष पूर्ण झाली आणि आता हा फंड एक ओपन-एंडेड म्युच्युअल फंड आहे म्हणजेच आपण कोणत्याही वेळी त्यामध्ये गुंतवणूक करायला सुरुवात करू शकता.
 • व्हॅल्यू रिसर्चनुसार, आयसीआयसीआय प्रूडेंशियल ब्लूचिप फंडने १६.३४% परत मिळविला आहे तुलनेत श्रेणी निर्देशांकचा परतावा ११.४४% इतका होता. म्हणून गेल्या दहा वर्षातील सर्वोच्च म्युचुअल फंड बनला आहे. माझ्यासाठी ही एक उत्कृष्ट स्टॉक निवडीसह संशोधन पूर्वक खात्रीशीर नियोजन असणारी गुंतवणूक आहे.
 • ब्लू-चिप निधी सामान्यतः दीर्घकालीन स्थिर संपत्ती मिळवण्यासाठी असतात. दीर्घ मुदतीसाठी पैसे काढण्याची गरज नसल्यास ही गुंतवणूक  योजनेच्या वाढीव आवृत्तीमध्ये करू शकता. जर आपल्या गुंतवणूकीतून नियमित उत्पन्न मिळण्याची गरज तुम्हाला वाटत असेल तर लाभांश योजना आहेत.
 • तुमचा जोखीम घेण्याची तयारी कितीही कमी किंवा कितीही जास्त असू देत, आयसीआयसीआय ब्लू-चिप फंड तुमच्या पोर्टफोलिओमध्ये दीर्घकालीन परतफेडीचा खात्रीशीर पर्याय आहे.

अपर्णा आगरवाल

Certified Financial Planner

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.