… म्हणून लग्नानंतर नव वधू-वराला जाऊ देत नाहीत शौचालयात, कारण वाचून तुम्हीही व्हाल हैराण

0

प्रत्येक धर्मात आणि वेगवेगळ्या ठिकाणी लग्नासंदर्भात वेगवेगळे नियम आहेत. काही ठिकाणी वर घोड्यावरून येतो. तर काही ठिकाणी नवरीला डोलीमधून आणले जाते. सर्वच जाती आणि धर्म आपापले नियम पळून लग्न करतात. परंतु जगात असा एक देश आहे जिथे लग्नसोहळा अगदी अनोखा असतो. कारण येथे वधू-वरांना शौचालयात जाण्यास मनाई आहे.

लग्नानंतर वधू-वरांनी शौचालयात न जाण्याचा हा अनोखा रिवाज इंडोनेशियामध्ये आहे. टोंड समुदायामध्ये हा रिवाज पाळला जातो. या समुदायाचे लोक हा नियम फार महत्वाचा मानतात, म्हणून ते पूर्ण मनापासून हा रिवाज पाळतात. प्रथेनुसार वधू-वर लग्नानंतर तीन दिवस शौचालयात जाऊ शकत नाहीत. असे करणे वाईट मानले जाते.

स्थानिक समुदायाच्या मते विवाह हा एक पवित्र समारंभ असतो. शौचालयात जाण्याने त्यांची शुद्धता विस्कळीत होते. यामुळे नवीन वधू आणि वर अपवित्र होतात. ही रिवाज पाळण्याचे मुख्य कारण म्हणजे नवीन जोडप्यांना वाईट गोष्टींपासून वाचवणे होय. समुदायाच्या मते बरेच लोक वॉशरूम वापरतात. ते शरीरातील घाण बाहेर टाकतात. यामुळे येथे नकारात्मक शक्ती तयार होते. त्यामुळे लग्नानंतर ताबडतोब शौचालयात गेल्यास वधु -वरांमध्ये ही नकारात्मक शक्ती येऊ नये म्हणून शौचालयात जाण्यास प्रतिबंध केला जातो.

culture

 

टोंड समुदायाच्या मते लग्नानंतर तातडीने शौचालयाचा वापर केल्याने नवविवाहित जोडप्याचे नातेसंबंध धोक्यात येऊ शकतात. तेथे असणारे दुष्परिणाम त्यांच्यात येऊ शकतात ज्यामुळे त्यांचे संबंध खराब होऊ शकतात. कधीकधी नाती तुटण्याची भीती देखील असते. समाजातील लोकांचा असा विश्वास आहे की लग्नानंतर शौचालय वापरणे वधू-वरांना घातक ठरू शकते. यामुळे त्यापैकी एखाद्याचे आयुष्य देखील धोक्यात येऊ शकते.

वेळेत लक्ष न दिल्यास नवीन जोडप्याचे नवीन जग नष्ट होऊ शकते म्हणून या नवीन वधू-वरांच्या अन्नात कपात केली जाते. त्यामुळे त्यांना शौचालयात जाण्याची गरज पडत नाही. समाजातील लोक या प्रथेचे काटेकोरपणे पालन करतात. या रिवाजामुळे वधू-वरांना काही अडचण होणार नाही याची काळजी ते घेतात. तसेच त्यांनी शौचालय वापरू नये यावरही विशेष लक्ष दिले जाते.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.