कोजागिरीच्या दुधाला का असतो विशेष गोडवा ? जाणून घ्या कोजागिरीचे महत्व आणि तथ्य

0

आज 30 ऑक्टोबर 2020 कोजागिरी पौर्णिमा आहे. कोजागिरी पूर्णिमा अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरी केली जाते. धार्मिक मान्यतानुसार कोजागिरी पौर्णिमा (कोजागिरी लक्ष्मी पूजा ) च्या रात्री चंद्र आपल्या सोळा कलांनी समृद्ध होऊन अमृताचा वर्षाव करतो अशी मान्यता आहे. कोजागिरी पौर्णिमेच्या उत्सवात चंद्राच्या प्रकाशात दूध उकळवून पिले जाते. आज आपण या पौर्णिमेचे महत्त्व, पूजा करण्याची पद्धत आणि वेळ जाणून घेऊया…

Kojagiri (1)

#यामागील कथा

विधीवत मान्यतेनुसार ‘एका सावकारास दोन मुली होत्या. दोघेही पौर्णिमेचे व्रत ठेवत असत. एकदा सावकाराच्या मोठ्या मुलीने पौर्णिमेला विधिवत उपवास केला मात्र लहान मुलीने उपवास मोडला. त्यामुळे तिच्या मुलांचा जन्म झाला की, लगेच मृत्यू होत असे. मात्र एकदा सावकाराच्या मोठ्या मुलीच्या सद्गुण स्पर्शाने लहान मुलीचे मूल जिवंत झाले म्हणून असे म्हणतात की, त्या दिवसापासून हा उपवास साजरा करण्यास सुरुवात झाली.

#महत्व

कोजागिरी पौर्णिमेला देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. या देवीकडे आठ रूपे आहेत ज्यात धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, राज लक्ष्मी, वैभव लक्ष्मी, ऐश्वर्या लक्ष्मी, संथान लक्ष्मी, कमला लक्ष्मी आणि विजय लक्ष्मी यांचा समावेश आहे. खर्‍या मनाने लक्ष्मीची पूजा करणाऱ्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते.

Kojagiri (2)

#अशी करा पूजा

कोजागिरी पौर्णिमेला सकाळी उठून स्नान व घरातील मंदिर स्वच्छ करून माता लक्ष्मी आणि श्री हरिची पूजा करा. यासाठी लाल किंवा पिवळ्या रंगाचे कापड खाली घाला. यावर लक्ष्मी आणि विष्णू देवाची मूर्ती स्थापित करा. त्याच्यासमोर तुपाचा दिवा लावा, गंगाजल शिंपडा आणि अक्षतेच टिळक लावा. पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगाच्या मिठाईचा प्रसाद ठेवून फुले देवासमोर ठेवा.

#कोजागिरी पौर्णिमेला दूध पिण्याचे महत्व

आजचा दिवस खूप खास आहे. आज रात्री चंद्राची किरणे अमृत सोडतात अशी मान्यता आहे. म्हणूनच आज दूध चंद्राच्या प्रकाशात ठेवणे फार महत्वाचे आहे. तसेच हे दूध चांदीच्या भांड्यात तापविल्यास उत्तम मानले जाते. जर चांदीचे भांडे नसेल तर आपण ते कोणत्याही भांड्यात तापवू शकता. हे दूध गायीचे असले पाहिजे तसेच ते कमीतकमी चार तास चंद्राच्या किरणांखाली असले पाहिजे अशीही मान्यता आहे.

Kojagiri 5

#सनातन धर्मातील पूजेचे महत्व

सनातन धर्मात या पूजेसाठी पानाला खूप महत्त्व आहे कारण सुपारी पान खूप पवित्र आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. म्हणूनच कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा करुन तिला पण अर्पित केले जाते. नंतर हे पान घरातील सदस्यांना प्रसाद म्हणून वाटले जाते. यामुळे घरात आनंद आणि समृद्धी येते अशी मान्यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.