fbpx
4.7 C
London
Sunday, January 29, 2023

एका सैनिकाचे आत्मवृत्त मराठी निबंध। Sainikachi atmakatha in marathi

Sainikachi atmakatha in marathi: माझ्या प्रिय मित्रांनो या लेखाच्या माध्यमाने आपण एका सैनिकाचे आत्मवृत्त मराठी निबंध रूपाने पाहणार आहोत. सैनिकाचे जीवन खूप परिश्रम आणि मेहनतीने भरलेले असते. या लेखात दिलेले हे sainikache manogat तुम्ही आपल्या शाळेतील अभ्यासात वापरू शकतात. तर चला सुरू करूया…

सैनिकाचे आत्मवृत्त मराठी निबंध Sainikachi atmakatha in marathi

मी एक सैनिक आहे व कठीण परिश्रमानंतर मी ही वर्दी परिधान केली आहे. लहानपणापासून माझे स्वप्न सैनिक बनून, शत्रूपासून देशाची सेवा करणे होते. आणि म्हणूनच मी रात्रंदिवस मेहनत करणे सुरू केले. घराची परिस्थिती हलाखीची असतांनाही मी हार स्वीकारली नाही. माझे ध्येय ठरलेले होते की मला सैनिक बनायचे आहे. व यासाठी मी सर्व प्रकारच्या परिस्थितीवर मात करण्याचे ठरवले होते. जेव्हा मी 10 वी ची परीक्षा उत्तीर्ण झालो. तेव्हा मी सैन्यात भरती होण्यासाठी दररोज सकाळी 4 वाजेला उठून कसरत करू लागलो. माझ्या मित्रांसोबत मैदानावर दौड करू लागलो. शेवटी एक दिवस मी टीव्ही वर सैन्य भरतीची जाहिरात पाहिली, व मी तेथे जाऊन पोहोचलो. पहिल्याच परीक्षेत मला सैन्यात भरती करण्यात आले. आता माझे स्वप्न पूर्ण झाले होते. परंतु माझ्या आई वडिलांच्या डोळ्यात अश्रू होते.  ते माझ्या निर्णयापासून नाराज होते. त्यांना वाटायचे की सैनिक म्हणजे मृत्यू. कधी युद्ध होईल तर कधी माझ्या मुलाचा मृत्यू होईल असे त्यांना वाटायचे. त्यांनी माझी मेहनत आणि कठीण परिश्रमाचे कौतुक तर केले पण त्यांना या गोष्टीची भीती लागलेली होती. परंतु शेवटी त्यांनीही होकार दिला.सैन्यात भरती झाल्यावर मी ट्रेनिंग घेऊ लागलो. मी या प्रशिक्षणादरम्यान खूप कठीण परिश्रम घेतले. माझ्या मेहनती मुळे 4 महिन्यात ट्रेनिंग संपवून माझी पोस्टिंग काश्मीर बॉर्डर वर करण्याल आली. काश्मीर खूप अशांत भाग आहे. येथील आतंकवादी सैन्यासाठी डोकेदुखी बनलेले आहेत. लहानपणी मी या आतंकवाद्यांना योग्य उत्तर देण्याचे स्वप्न पहायचो आज तो दिवस आलेला होता. 16 डिसेंबर 2019 ला आम्हाला आदेश मिळाले की काही आतंकवादी आपल्या सीमेत घुसून आले आहेत. आम्ही 20 सैनिकांची तुकडी या आतंकवाद्यांना प्रतिउत्तर देण्यासाठी निघालो. आतंकवादी एका घरात लपून आमच्यावर गोळीबार करत होते. आमच्या तुकडी प्रमुखांच्या आदेशावर मी पुढे गेलो. एका झाडाच्या मागे लपून मी गोळ्या मारू लागलो. माझ्या या गोळीबारात 4 आतंकवाद्यांचा बळी गेला. नंतर माझ्या सोबतींनी 3 आतंकवाद्यांना मारून मिशन पूर्ण केले. सुभेदार साहेबांनी माझ्या या कार्याबद्दल मला पदक देऊन सन्मानित केले. साहेबांच्या मागणी वर मला 26 जानेवारीला सम्मनित करण्यात आले. माझ्या आई वडिलांना जेव्हा माझ्या या पराक्रमाबद्दल कळाले तेव्हा त्यांना खूप आनंद आणि अभिमान वाटू लागला. नंतर माझी पोस्टिंग म्यानमार बॉर्डर वर करण्यात आली. आता मी देशाच्या सेवेसाठी अधिक मुस्तेद आहे. नेहमी सजग राहून मी देशाच्या सीमेचे रक्षण करीत आहे. एका सैनिकाचे जीवन खूप कठीण असते. युद्धाने कोणत्याही देशाचे भले होत नाही. परंतु सैनिकाला नेहमीं युद्धासाठी तयार राहावे लागते. सैनिक फक्त शत्रूला मारण्याचे काम करीत नाही तर ते बिकट परिस्थितीत आपल्या देशाचे नागरिक आणि मित्र सैनिकांचे प्राण देखील वाचवतात. डोक्यावर नेहमी मृत्यू असतानाही या गोष्टीचे समाधान असते की आपल्या रक्षणाने देशातील नागरिक सुखरूप आहेत. व देश सेवा हीच मला आणि माझ्या सैनिकांसाठी अभिमानाची गोष्ट असते.

मी सैनिक झालो तर मराठी निबंध वाचा येथे 

समाप्त तर मित्रांनो हे होते सैनिकाचे आत्मवृत्त मला आशा आहे की तुम्हाला हे सैनिकाचे sainikache atmavrutta उपयोगी ठरले असेल. तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेन्ट करून नक्की कळवा. धन्यवाद…

Latest news
Related news

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here