fbpx
2.7 C
London
Saturday, January 28, 2023

[कॉम्पुटर] संगणक शाप की वरदान मराठी निबंध | Sanganak Shap ki vardan Marathi Nibandh

संगणक श्राप कि वरदान निबंध मराठी (sanganak shap ki vardan essay in Marathi) 

Sanganak Shap ki vardan : मित्रांनो आज संगणक अर्थात कम्प्युटर सर्वानाच परिचयाचे आहे. संगणकाच्या शोधाणे समाजावर आणि मानवी प्रगतीवर दूरगामी परिणाम केले आहेत. आज अनेक कठीण कार्य संगणकाच्या मदतीने काही क्षणात करणे शक्य झाले आहे. 

परंतु संगणकाचे जसे फायदे आहेत तसेच याचे काही नुकसान देखील आहेत. म्हणून आजच्या या लेखात आम्ही आपली साठी संगणक शाप की वरदान या विषयावर मराठी निबंध घेऊन आलो आहोत तर चला निबंधाला सुरूवात करूया.. संगणक शाप की वरदान मराठी निबंध


1) कॉम्पुटर श्राप कि वरदान मराठी निबंध | Computer shap ki vardan 

(250 शब्द)

संगणकाचा शोध या युगाचा सर्वात मोठा शोध आहे. संगणकाला कॉम्प्युटर देखील म्हटले जाते. संगणकाच्या शोधामुळे मानवी कार्यक्षमतेत वृध्दी झाली आहे. आधीच्या काळात जे कार्य तासनतास खूप साऱ्या लोकांद्वारे केले जायचे ते संगणकाच्या सहाय्याने खूप कमी वेळात होऊन जाते. कॉम्प्युटर च्या या कार्य क्षमतेमुळे आज त्याला मनुष्याचा सर्वात जास्त कामात येणारा मित्र म्हटले जाते. कॉम्प्युटर मध्ये इंटरनेट च्या सहाय्याने आपण घरबसल्या अनेक कामे करू शकतो. इंटरनेट हे एक आंतरराष्ट्रीय नेटवर्क आहे. याच्या सहायाने आपण जगातील कोणत्याही व्यक्तीशी जुळू शकतो.संगणकाद्वारे जगभरात सूचना, माहिती, फाईल्स इ. पाठवणे शक्य झाले आहे. संगणकाने आपल्या जगाला अतिशय जवळ आणले आहे. संगणक मनोरंजन, सोशल नेटवर्किंग, सेवा प्राप्त करणे, माहिती मिळवणे इ. कामासाठी वापरले जाते. आज संगणकामुळेच घरी बसल्या काम करणे शक्य झाले आहे. भारतात संगणक आणि इंटरनेट देशासाठी वरदान सिद्ध झाले आहे. मागील काही वर्षात स्वस्थ इंटरनेट मिळाल्याने संगणकाचा वापर अधिकच वाढला आहे. संगणकाने शहर तसेच गावातील शिक्षा प्रणालीला प्रभावित केले आहे. आज आपण संगणकाच्या सहायाने व्हिडिओ तसेच ब्लॉग पोस्ट करून जगासमोर आपले विचार मांडू शकतो. आज अधिकतर लोक घरबसल्या संगणकाच्या साहाय्याने ऑनलाईन खरेदी करतात. संगणकाचे जसे फायदे आहेत तसेच याचे काही दुष्परिणाम देखील आहेत, हे दुष्परिणाम संपूर्ण जगासाठी एक आव्हान बनले आहेत. आज काही लोक संगणकाचे गेम्स तसेच इंटरनेट च्या आहारी जात आहेत. ज्यामुळे त्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होत आहेत. अनेक इंटरनेट हॅकर्स संगणकाच्या मदतीने माहिती हॅक करून तिचा चुकीचा वापर करीत आहेत. या मुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. ऑनलाईन खरेदी करताना देखील अनेक फसवणूक होत आहेत. म्हणून संगणकाचे फायदे एकीकळे त्याला वरदान सिद्ध करतात तर त्याचे नुकसान त्याला अभिशाप म्हणून जगासमोर उभे करीत आहेत. 

***मोबाइल शाप की वरदान निबंध 2) संगणक श्राप कि वरदान निबंध | Sanganak Shap ki vardan Marathi Nibandh 

(400 Words)

आज संगणक क्रांती मोठ्या प्रमाणात झाली आहे. लहान-मोठे, तरूण-म्हातारे सर्वजण संगणकाच्या वापराने परिचित आहेत. काहीही माहिती हवी असल्यास लगेच संगणकाच्या मदतीने इंटरनेट वर आपण मिळवू शकतो. संगणकाच्या मदतीने मनोरंजन पण खूप चांगले होते. नातेवाईक व मित्र मंडळी सोबत पण आपण व्हिडिओ कॉलिंग तसेच चॅटिंग च्या मदतीने गप्पा करू शकतो. संगणक क्रांती मुळे कामे करणे खूप सोपे झाले आहे. मानवी कार्यक्षमता वाढली आहे. आधीच्या काळात जे कार्य तासनतास खूप साऱ्या लोकाच्या सहायाने केले जायचे ते आता संगणकाच्या साहाय्याने कमी वेळात शक्य आहे. आधी काहीही वस्तू घ्यायची म्हटली की बाजारात जाऊन दुकाने शोधावी लागत होती. पण आज संगणकाच्या मदतीने आपण गूगल वर कोणतीही वस्तू शोधू शकतो व घरबसल्या खरेदी करू शकतो. अनेक व्यवसाय संगणकाच्या सहाय्याने ऑनलाईन काम करून पैसे कमवीत आहेत. संगणकाने भरपूर लोकांना घरबसल्या रोजगार मिळून दिला आहे. बिकट परिस्थिती मध्ये घरूनच काम करता येऊ शकते. संगणकाच्या साहाय्याने बँकेत न जाता घर बसल्या पैसे पाठवणे शक्य झाले आहे. मनात असलेल्या विचारांना आता संगणकामुळे जगासमोर मांडणे सोपे झाले आहे. ब्लॉगर तसेच यूट्यूब च्या माध्यमाने लोक माहिती देत आहेत व या द्वारे चांगले पैसे देखील कमवीत आहेत. कोणतेही पुस्तक विकत न घेता इंटरनेट वर संगणकाच्या मदतीने आपण वाचू शकतो. संगणकाचे बरेच फायदे आहेत पण असे म्हणतात की नाण्याच्या दोन बाजू असतात. म्हणजेच ज्या गोष्टीचे फायदे असतात त्याचे तोटे सुद्धा असतात. संगणकाचे पण तसे तोटे आहेत. जरी संगणकाने लोकांना जवळ आणले आहे तरी मनाने मात्र माणसे दूर झाली आहेत. बऱ्याच लोकांना तासनतास संगणक वापरणे गेम्स खेळणे अश्या वाईट सवयी लागल्या आहेत, या सवयीचा दुष्परिणाम त्याच्या आरोग्यावर होतो. उपयोगापेक्षा जास्त संगणक व इंटरनेटचा वापर केल्याने त्याचे व्यसन लागत आहे. यामुळे तरुणांमध्ये मानसिक तणाव उत्पन्न होत आहे. या शिवाय खूप साऱ्या अश्या वेबसाइट्स आहेत ज्यांच्या मुळे मुलांच्या बाल मनावर वाईट परिणाम होत आहे. चांगले वाईट ची समझ नसल्याने बरेच तरुण त्या वेबसाइट्स वाचतात. व याचा दुष्परिणाम त्यांच्या मेंदूवर होतों. संगणकाच्या मदतीने सायबर क्राईम देखील वाढले आहेत. कोणत्याही सरकारी तसेच खाजगी कंपन्यांच्या डेटा चोरी करणे व त्याचा चुकीचा वापर करणे मोठ्या प्रमाणात होत आहे. सायबर क्राईम रोखण्यासाठी सरकार कार्य करीत आहे. जसे की आपण पाहिले संगणक व इंटरनेट एकीकडे आपल्यासाठी वरदान आहे तर दुसरीकडे याचे दुष्परिणाम देखील खूप आहेत. म्हणून आपल्याला संगणकाचा वापर कामापुरता व योग्य रीतीने करायला हवा. जर आपण संगणकाच्या गरज असतानाच वापर करू तर भविष्यात संगणकाच्या सहाय्याने आपले जीवन सुखमय होऊ शकेल. देशाची प्रगती देखील योग्य संगणक वापराने शक्य आहे.

***विडियो पहा


तर मित्रानो हे होते संगणक श्राप कि वरदान या विषयावर लिहिलेले मराठी निबंध तुम्हाला हे निबंध कसे वाटले, तसेच यात काही चूक असल्यास ते पण कंमेंट्स मध्ये सांगा . धन्यवाद…!

Latest news
Related news

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here