fbpx
6.1 C
London
Monday, February 6, 2023

गुरुचे/शिक्षकांचे महत्व मराठी निबंध | essay on importance of teacher in marathi

गुरु चे महत्व निबंध | शिक्षकांचे महत्व | guru che mahatva | essay on importance of teacher in marathi

essay on importance of teacher in marathi : मित्रांनो आपल्या संस्कृतीत गुरूला ईश्वराचे स्थान दिले आहे. प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या यशामागे एका गुरुचाच हात असतो. गुरूंच्या सन्मानार्थ आजच्या या लेखात आम्ही आपल्यासाठी गुरु चे महत्व निबंध मराठी घेऊन आलो आहोत. हा निबंध वाचून आपल्याही मनात गुरुविषयी आदर, श्रद्धा निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. तर चला सुरू करूया…गुरु चे महत्व निबंध मराठी | guru che mahatva


गुरुचे महत्व मराठी निबंध | essay on importance of teacher in marathi

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर:। 

गुरु: साक्षात् परंब्रह्म तस्मै श्री गुरवे नम:। 

संस्कृत भाषेतील हा श्लोक सर्वांचाच तोंडपाठ आहे. या श्लोकात गुरूंचा महिमा व गुरूंची महती गायली आहे. प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनात गुरूचे महत्व अनन्यसाधारण असते. गुरुचे जीवनातील स्थान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. गुरु शिष्याच्या दुर्गुणांना दूर करून त्याच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश निर्माण करतात. ज्या व्यक्तीला एका चांगल्या गुरूचा सहवास लाभला नाही त्याचे जीवन अंधकारमय असते. गुरु आपणास जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवतात. आजच्या युगात गुरूला शिक्षक म्हणूनही संबोधले जाते. शिक्षक आपल्या शिक्षणाच्या मदतीने व्यक्ती, समाज आणि राष्ट्राची निर्मिती करतो. त्यांच्या शिक्षणामुळेच विद्यार्थ्यात आत्मविश्वास निर्माण होतो. आणि आयुष्यात काहीतरी मोठे ध्येय प्राप्त करण्यासाठी त्याला प्रेरणा मिळते.शिक्षक एका सुंदर आरशाप्रमाणे असतात. ज्यामध्ये व्यक्ती आपल्या व्यक्तित्वाची ओळख करून घेतो. शिक्षण ही अशी मजबूत शक्ती आहे जिच्या मदतीने आपण समाजाला सकारात्मकतेकडे वळवू शकतो. आणि हे शिक्षण प्रदान करण्यामागे शिक्षकाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. बालकाला सर्वात आधी शिक्षण आई-वडिलांकडून दिले जाते. आई हीच त्याला चालणे बोलणे शिकवते. म्हणून आईला बालकाचा पहिला गुरु म्हटले जाते. जेव्हा बालक 5-6 वर्षाचा होतो तेव्हा पहिल्यांदा त्याची शिक्षकांशी भेट होते.शिक्षक विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक असतात. जीवनातील कठीण मार्गावर विद्यार्थी भटकू नये म्हणून शिक्षक नेहमी प्रयत्न करीत असतात. कमी वयातील विद्यार्थ्याचे जीवन ओल्या माती प्रमाणे असते. त्या वयात शिक्षक एका कुंभार प्रमाणे आपल्या हातांनी विद्यार्थ्यांच्या जीवनाला मजबुती प्रदान करतात. येणाऱ्या भविष्यासाठी ते विद्यार्थ्याला तयार करतात. शिक्षकांच्या मेहनतीमुळेच कोणी डॉक्टर, इंजिनियर, पायलट, वकील, सैनिक इत्यादी बनतात. शिक्षक आपल्या विद्यार्थ्याला योग्य व वाईट गोष्टींमधील फरक सांगतात. शिक्षक शिष्टाचार, धैर्य, सहनशीलता इत्यादी गुणांनी जीवन जगायला शिकवतात.शिक्षक आपल्याला शिस्तीचा धडा देतात. याशिवाय वेळेचे योग्य नियोजन कसे करावे याबद्दल देखील ते आपल्याला मार्गदर्शन देतात. विद्यार्थी जीवनात वेळेचे महत्व फार आहे. चांगल्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाने वेळेचा सदुपयोग करता येतो. शिक्षक विद्यार्थ्यांत नेतृत्वाचे गुण विकसित करतात. शिक्षक कधीही साधारण नसतो, एका शिक्षकांच्या हातात प्रलय आणि निर्माण दोन्ही असतात. विद्यार्थ्याचे संपूर्ण भविष्य शिक्षकाच्या हाती असते. परंतु प्रत्येक शाळा कॉलेजमधील शिक्षक योग्य आणि नैतिक मूल्यांना वाढविण्यासाठी प्रयत्न करणारे असतीलच असे नाही. अनेक शाळा कॉलेज मध्ये शिक्षक फक्त पैशांसाठी विद्यार्थ्यांना शिक्षित करीत असतात. अशा पद्धतीने पैशांच्या मागे धावणारे शिक्षक विद्यार्थ्यांच्या करिअरला योग्य दिशा देऊ शकत नाहीत. भ्रष्ट शिक्षकांकडून शिकलेले विद्यार्थी भविष्यात भ्रष्ट नेता, डॉक्टर, वकील इत्यादी बनतात. म्हणून शिक्षकाचे महत्त्व लक्षात ठेवण्यासोबतच आई वडील तसेच प्रत्येक विद्यार्थ्यांची जबाबदारी आहे की त्याने आपल्यासाठी योग्य आणि शिक्षणासाठी समर्पित असलेल्या शिक्षकांची निवड करायला हवी. आज समाजात अनेक शिक्षक प्रामाणिकपणे आपले कार्य करीत आहेत परंतु त्यांना योग्य पगार दिला जात नाही आहे. ज्यामुळे पैशांच्या समस्येने ते निराश झाले आहेत. अशा होतकरू शिक्षकांना शासनाने योग्य आर्थिक मदत पुरवायला हवी. कारण कोणत्याही राष्ट्राच्या निर्माण मध्ये शिक्षक अतिशय महत्त्वाचा घटक आहे. म्हणून त्यांच्यासाठी योग्य सुविधा उपलब्ध करून देणे आपण सर्वांचे कार्य आहे.

–समाप्त–तर मित्रांनो ह्या लेखात आम्ही आपल्याला importance of teacher in marathi | गुरु चे महत्व निबंध मराठी हा निबंध दिला आहे. आपणास हा मराठी निबंध कसा वाटला कमेन्ट करून नक्की कळवा धन्यवाद.READ MORE:

Latest news
Related news

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here