fbpx
1.1 C
London
Thursday, February 9, 2023

[निबंध] जर मी पंतप्रधान झालो तर मराठी निबंध | Me pantpradhan zalo tar Marathi Nibandh

मित्रांनो आजच्या या लेखात आपण जर मी पंतप्रधान झालो तर ? Jar Me pantpradhan zalo tar ? या विषयावर मराठी निबंध मिळवणार आहोत. 

तुम्ही कधी विचार केला आहे की जर तुम्हाला पंतप्रधान बनण्याची संधि मिळाली तर तुम्ही काय करणार ? म्हणूनच आजच्या या लेखात तुमच्या विचारांना चालना मिळावी या हेतूने एक लहानसा निबंध देत आहोत. या निबंधापासून प्रेरणा घेऊन तुम्ही तुमच्या भाषेत Marathi nibandh लिहू शकतात.   

मी पंतप्रधान झालो तर- If i become a prime minister essay in marathi

आपला देश भारत जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे. आपल्या देशातील शासक हे जनते द्वारे निवडले जातात. देशातील जनता आपले प्रतिनिधी निवडून सरकार बनवते. भारतातील सर्वोच्च पद राष्ट्रपतीचे आहे. परंतु प्रत्यक्षात पाहता देशातील शासन व्यवस्थेला सांभाळण्याचे संपूर्ण कार्य पंतप्रधानांकडे असते. म्हणून हे तर सिद्ध आहे की पंतप्रधान बनणे सोपे कार्य नाही. परंतु जर कधी मी भारताचा प्रधानमंत्री झालो तर देशाचा विकास करून देशाला एक महाशक्ती बनवण्यासाठी कार्य करेल. कोणताही देश गरीब शेतकरी व मजुरांना सक्षम केल्याशिवाय विकसित होऊ शकत नाही म्हणून जर मी भारताचा पंतप्रधान झालो तर सर्वात आधी मध्यमवर्गीय कुटुंबांना उच्च शिक्षण व रोजगार उपलब्ध करून देईल. मी माझ्या मंत्रिमंडळात कोणताही मंत्री निवडतांना सावधगिरी बाळगेल. मी माझ्या मंत्रीमंडळात अश्याच मंत्र्यांना स्थान देईल जे निष्पक्ष, न्यायप्रिय व व जनतेची सेवा करणारे असतील. यानंतर मी माझ्या मंत्रिमंडळाच्या प्रत्येक कार्यावर तीक्ष्ण दृष्टी ठेवेल. वेळप्रसंगी कामचुकार मंत्र्यांना बाहेर काढण्यात हि मागेपुढे पाहणार नाही. मी जनतेचा अधिकाधिक विश्वासपात्र पंतप्रधान बनण्याचा प्रयत्न करेल. भ्रष्टाचार देशासाठी एक समस्या आहे. मी पंतप्रधान झाल्यावर भ्रष्टाचारी नेते, मंत्री व अधिकारांवर योग्य कारवाई करेल. लाचखोरी, फसवणूक इत्यादींपासून देशाच्या जनतेचे सुरक्षा करेल. पंतप्रधान झाल्यावर माझे दुसरे सर्वात महत्त्वाचे कार्य देशाच्या सैन्याची शक्ती वाढवणे राहील. मी आपल्या सैन्याला बलवान करण्यासाठी आधुनिक अस्त्र-शस्त्र उपलब्ध करून देईल. जेणेकरून भारताचे शत्रु देश पाकिस्तान व चीन भारताकडे वाकडी दृष्टी करून पाहणार नाही. आज आपल्या देशातील अधिकतर लोक जीवनाच्या मूलभूत आवश्यकता देखील पूर्ण करू शकत नाही. आज देखील आपल्या देशातील अनेक गाव व शहर वीज, पाणी, शिक्षण व चिकित्सा या मुलभूत गोष्टींसाठी तळमळ करीत आहेत. मी पंतप्रधान झाल्यावर देशाला स्वावलंबी, आत्मनिर्भर व धान्य संपन्न बनवण्यासाठी कार्य करेल. या साठी देशातील जनतेला स्वयंरोजगार प्रशिक्षण देईल. शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता त्यांना वैज्ञानिक पद्धतीने शेती करण्यासाठीचे शिक्षण उपलब्ध करून देईल. शेतकऱ्यांना उत्तम खत व बी बियाणेची कमी दरात व्यवस्था करून देईल व देशात असलेली अन्नाची समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न करेल.आपल्या राज्यघटनेत अनेक विरोधाभास असलेले धोरण आहेत, ज्यांना समाप्त करण्याची आवश्यकता आहे. मी पंतप्रधान झाल्यावर राज्यघटनेतील विरोधाभास दूर करून सर्व नागरिकांना समान अधिकार देईल. जातीगत आरक्षण बंद करून ज्यांना खरोखर आरक्षणाची आवश्यकता आहे त्यांना आरक्षित करेल. मी देशात सबल व स्वतःच्या पायावर उभा असलेला समाज तयार करील. आज भारतीय आपले संस्कृती विसरत चालले आहेत. मी पंतप्रधान झाल्यावर शालेय विद्यार्थ्यांना अभ्यासाशिवाय भारतीय संस्कृतीची ओळख करून देण्याचे शिक्षण देईल. लोकांमध्ये देशभक्ती व देश प्रेम विकसित करण्यासाठीचे शिक्षण सुरू करील.

–समाप्त–

Me Pantpradhan Zalo Tar

तर मित्रांनो हा होता मी पंतप्रधान झालो तर या विषयावरील मराठी निबंध. आशा करतो की me pantpradhan zalo tar हा निबंध तुम्हाला आवडला असेल निबंध कसा वाटला मला कमेन्ट करून सांगा. 

Latest news
Related news

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here