fbpx
2.8 C
London
Monday, February 6, 2023

{निबंध} माझा आवडता प्राणी कुत्रा | Maza Avadta Prani Kutra Marathi Nibandh

मित्रानो आपल्या देशात खूप सारे पाळीव प्राणी पाळले जातात, त्यापैकी कुत्रा हा सर्वात जास्त पाळला जाणारा प्राणी आहे. आजच्या या लेखात मी तुम्हाला 2 माझा आवडता प्राणी कुत्रा या विषयावर निबंध मराठीत देत आहे. हे निबंध तुम्ही आपला शाळेचा होमवर्क म्हणून देखील वापरू शकता, तर करा सुरुवात..1) माझा आवडता प्राणी कुत्रा निबंध मराठी | Maza Avadta Prani Kutra

माझा आवडता प्राणी कुत्रा आहे आणि आमच्या घरी सुद्धा आम्ही एक कुत्रा पाळला आहे, त्याचे नाव मोती आहे. मोती खूपच बहादुर आहे त्याचा रंग पांढरा आहे आणि मोठ मोठे कानासोबत वाकडी शेपटी आहे. त्याचे डोळे भुरे आहेत. मोती आमच्या कुटुंबाच्या सदस्या प्रमाणेच आहे. मला तो खूपच आवडतो. मी त्याच्या सोबत सकाळ संध्याकाळ खेळतो. मी त्याला रोज फिरवायला पण नेतो.माझ्या 10 व्या वाढदिवशी माझ्या वडिलांनी मला मोती भेट म्हणून आणून दिला होता. मला आजवर मिळालेल्या भेट वस्तूंपैकी मोती हे सर्वात जास्त आवडते गिफ्ट आहे. त्याला आमच्यासोबत राहायला ४ वर्षे पूर्ण झाली आहेत. मोतीची आणि माझी खूप घट्ट मैत्री आहे. मी त्याला बसायला सांगितले तर तो बसतो, उभे राहायला सांगितले तर उभा राहतो आणि माझ्यासोबत पळायला सांगितले तर पळतो देखील. थोडक्यात सांगायचे झाले तर मोती माझ्या सर्व आज्ञा पाळतो.   कुत्रा कोणताही असो तो खूपच उपयोगी प्राणी असतो त्यांच्या असल्यानेच घर सुरक्षित वाटते. त्याच्या उपस्थितीत कोण्या अनोळखी व्यक्तीची घरात येण्याची हिम्मत देखील होत नाही. आम्हालाच नव्हे तर आमच्या शेजारीना देखील मोती कुत्र्या मुळे सुरक्षित वाटते. त्याचे भुंकणे वाघाच्या डरकाळी सारखे वाटते. तो असला की दुसरे कुत्रे आमच्या घराच्या जवळ पण येत नाहीत. जर कोणी अनोळखी आमच्या घरी किंवा शेजारी आले असेल तर मोती भुंकुन सर्वांना सावध करतो. परंतु त्याला शांत बसायला सांगितले की लगेच ऐकुन शांत देखील होतो.मी मोतीची खूप चांगली काळजी घेतो. त्याला खाऊ घालने, अंघोळ घालण, रोज फिरवायला नेणे ई. गोष्टी मी वेळेवर करतो. माझे वडील महिन्यातून एकदा प्राण्यांच्या दवाखान्यात चेक अप करायला पण घेऊन जातात. आमचा कुत्रा पूर्णपणे शाकाहारी आहे आम्ही त्याला कधीच मास खाऊ घातलेले नाही. त्याचे आवडते जेवण पोळी आणि दूध आहे. मोती आमच्या बोलण्याला खूप चांगले समजतो. आमची आज्ञा पाळतो. तो खूपच वफादार, बहादुर आणि गोंडस आहे. म्हणून मला माझ्या पाळीव कुत्रा मोतीवर अभिमान आहे.आज मोती व त्यासारखे अनेक वेगवेगळ्या प्रजातीचे कुत्रे जगभरात पाळले जातात. कुत्र्यांच्या मदतीनेच पोलिस मोठमोठे केस सोडवतात. या कुत्र्यांच्या सुंघण्याची शक्ती अदभुत असते. हे डाकू व चोरांचा वास घेऊन त्यांना शोधून काढतात. या कुत्र्यांना विमानतळ, पोलिस स्टेशन, देशाच्या सीमा आणि शाळांमध्ये नियुक्त केले जाऊ शकते. या शिवाय बरेच ट्रेकर्स, ट्रेकिंग दरम्यान शिकरासाठी शिकारी कुत्र्यांचा वापर करतात. शिकारी कुत्रे लांडग्याची देखील शिकार करतात. जगभरातील प्रत्येक ठिकाणी कुत्रे आढळतात. कुत्रा खूपच वफादार आणि इमानदार प्राणी असतो. त्याची बुद्धी तल्लख, सूंघण्याची क्षमता तीव्र आणि नजर तीक्ष्ण असते.2) माझा आवडता प्राणी कुत्रा निबंध मराठी (Maza Avadta Prani Kutra) 

तसे पाहता लोक अनेक पाळीव प्राणी पाळतात पण सर्वांमध्ये कुत्रा हा अतिशय समजदार आणि वफादार प्राणी असतो. कुत्रा हाच माणसाचा खरा मित्र असतो. कारण   कुत्रा हा एकमेव प्राणी माणसाप्रमाणे विचार करून त्याच्या भावना समजू शकतो. म्हणूनच कुत्रा जर मलकापासून दूर झाला तर तो दुःख व्यक्त करतो. एका कुत्र्याच्या तोंडामध्ये 42 दात असतात. कुत्र्याची सूंघण्याची क्षमता प्रचंड असते, म्हणूनच पोलिस लोक सुद्धा केस सोडवण्यासाठी कुत्र्यांना वापरतात. कुत्र्याच्या मदतीने चोर पकडणे, विस्फोटक वस्तू बॉम्ब ई. माहिती काढणे सोपे होते. वेगवेगळ्या देशात कुत्र्यांच्या वेगेगळया प्रजाती पाहायला मिळतील. कुत्र्याचे आयुष्य 15-20 वर्षाचे असते. कुत्रा जेवणात मास, फळ, भाज्या, दूध, बिस्कीट ई. सर्व खातो. कुत्रा झोपेत सुद्धा खूप सतर्क असतो, छोट्याश्या आवाजाने सुद्धा त्याला लगेच जाग येते. म्हणूनच ज्या घरात कुत्रा पाळला जातो तेथे चोरांचे येणे कठीण असते.कुत्रा त्याच्या भावना भुंकुन किंवा शेपटी हलवून व्यक्त करतो. कुत्रीच्या मुलांना पिल्ले म्हटले जाते. कुत्रा हा असा प्राणी आहे जो सर्व प्रकारच्या वातावरणात राहू शकतो. बाहेरील वातावरणाच्या हिशोबाने तो स्वतः मध्ये बदलाव करत असतो. मनुष्याचा तुलनेने कुत्र्याचे शरीर जास्त गरम असते पण तरीही त्याला कधीच घाम येत नाही.कुत्रा हा खरोखरच समजदार व खूपच वफादार प्राणी आहे. आम्ही सुद्धा आमच्या घरी टॉम्मी नावाचा एक कुत्रा पाळला आहे. मला कुत्रे खूप आवडतात व कुत्रा माझा आवडता प्राणी आहे.माझा आवडता प्राणी 20 निबंधासह पुढील PDF Download करा
Latest news
Related news

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here