fbpx
4.6 C
London
Sunday, January 29, 2023

[पावसाळ्यातील एक दिवस] निबंध मराठी | Pavsalyatil ek divas Marathi nibandh

Pavsalyatil ek divas : पावसाळा ऋतु हा दरवर्षी जुलै ते सप्टेंबर महिन्यापर्यंत राहतो. दक्षिणेकडून येणारे थंड वारे आपल्यासोबत पाऊस घेऊन येतात. या वाऱ्यांना मान्सून वारे म्हटले जाते. आजच्या या लेखात मी पावसाळ्यातील एक दिवस मराठी निबंध आणि प्रसंग लेखन तुमच्यासोबत शेयर करणार आहे.  

जर तुमचा आवडता ऋतु पावसाळा असेल तर तुम्ही माझा आवडता ऋतु पावसाळा हा निबंध येथे पाहू शकतात. तर चला सुरू करू pavsalyatil ek divas marathi nibandh हा निबंध आपण आपला शालेय होमवर्क म्हणूनही वापरू शकतात. 

पावसाळ्यातील एक दिवस- a rainy day paragraph in marathi

पावसाळ्याला ऋतूंचा राजा म्हटले जाते. उन्हाळ्यात पडणाऱ्या भयंकर उष्णता आणि गर्मी पासून पावसाच्या शितल लहरी आपली सुटका करतात. व संपूर्ण वातावरण सुखद गारव्याने भरून देतात. भारतात पावसाळा जुलै महिन्यात सुरू होऊन सप्टेंबर पर्यंत राहतो. या दरम्यान काही भागात अतिवृष्टी होते तर काही ठिकाणी पाऊसच येत नाही. असो माझ्या आयुष्यातही पावसाळ्यातील एक अविस्मरणीय दिवस आलेला आहे. मी त्या दिवसाच्या काही आठवणी आज लिहू इच्छितो.ते दिवस जुलै महिन्याचे होते शाळा नुकत्याच सुरू झाल्या होत्या. पण अजून पावसाळा आलेला नव्हता. बऱ्याच दिवसांपासून भयंकर उष्णता जाणवत होती. रस्ते, घर, शाळा आणि चारही दिशा आग ओकत होत्या. पंखा देखील गरम उष्णतेने भरलेली हवा फेकत होता. त्या दिवशी संध्याकाळचे 4 वाजेले होते आम्ही वर्गात बसलो होतो. अचानक जोरदार थंडगार वारा वाहू लागला. खिडक्या एकमेकांवर आदळायला लागल्या. चारही दिशांना अंधकार निर्माण झाला. आमच्या सरांनी शिकवणे थांबून, वर्गातील लाईट लाऊन दिली. असे वाटायला लागले की रात्रच झाली आहे. सर्वांनी आपापली वह्या पुस्तके सांभाळली. आणि जोरदार कडकडाटाने पाऊस सुरु झाला.पत्र्याच्या छतावर पडणारे पावसाचे थेंब आवाज करू लागले. थोड्या वेळात खिडक्या मधून पाण्याचे शॉवर आत येऊ लागले. सर्वांनी आपली पुस्तके बॅगेत ठेवली. पाहता पाहता ढग अजून काळी झाली. असे वाटायला लागले की जसे कोणी आकाशाला पेनाची शाही लावली आहे. शाळेची गॅलरी पूर्णपणे ओली झाली, मैदानातही ठीक ठिकाणी पाण्याचे डबके साचले.आता शाळा सुटण्याची वेळ झाली होती, ज्या मुलांची घरे शाळेजवळ होते त्यांना सर जाऊ देत होते. शाळेजवळ घरे असणारी लहान मुले कागदाची होळी बनवून सोडू लागले. शाळेच्या बाहेर खूप पाणी साचून गेले होते. काही खोडकर मुले एकमेकांवर ते पाणी उडवत होतें पण जेव्हा सरांनी त्यांना पहिले तेव्हा ते पळत सुटले. शाळेच्या शिपायाने शाळा सुटण्याची घंटा वाजवली. अजून पावसाचे पाणी बंद झाले नव्हते परंतु आधीपेक्षा कमी होते. मी शाळेतून पटापट चालत घराकडे निघालो. पावसामुळे रस्त्यावर ट्रॅफिक जमा झाले होते. पावसाच्या पाण्यामुळे मी भिजून गेलो. घरी आल्यावर आईने मला कपडे बदलून डोके टॉवेलने पुसायला सांगितले. यांनतर माझ्या आईने मला गरमागरम चाय बनवून दिली. मी घराच्या खिडकी जवळ बसून पावसाचा आनंद घेत चहा प्यायला लागलो. अश्या पद्धतीने पावसाळ्यातील हा माझा एक अविस्मरणीय दिवस होता.

समाप्त तर मित्रांनो हा होता पावसाळ्यातील एक अविस्मरणीय दिवस (Pavsalyatil ek divas) तुम्हाला हे प्रसंग लेखन कसे वाटले मला कमेन्ट करून नक्की सांगा. धन्यवाद…

Latest news
Related news

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here