[पृथ्वीचे मनोगत] पृथ्वी बोलू लागली तर निबंध- Pruthviche Manogat Marathi Nibandh

0

Pruthviche Manogat : पृथ्वी ही सर्व सृष्टीला जन्म देणारी माताच आहे म्हणूनच पृथ्वीला आपली संस्कृतीत धरणी माता म्हटले आहे. परंतु आज मनुष्याने स्वताच्या स्वार्थासाठी हा पृथ्वीला प्रदूषित करणे सुरू केले आहे. पण तुम्ही कधी विचार केला आहे की जर पृथ्वी बोलू लागली तर..? जर नाही तर आज पृथ्वी संपूर्ण मानव जातीला काहीतरी संदेश देणार आहे. आजच्या या लेखात आपण पृथ्वीचे मनोगत या विषयावर मराठी निबंध पाहणार आहोत pruthvichi aatmakatha, aatmavrutt


पृथ्वी बोलू लागली तर निबंध- Pruthviche Manogat

मी पृथ्वी आहे माझ्यात सर्व काही सामावलेले आहे. मनुष्य, झाडे-झुडपे, पशु-पक्षी, घरे-दुकाने, नद्या-समुद्र इत्यादी सर्व गोष्टींचा भार मी उचललेला आहे. मला माझ्या निर्मिती बद्दल अधिक आठवत नाही. परंतु काही शास्त्रज्ञाचे मानणे आहे की माझे निर्माण आज पासून जवळपास 5 अब्ज वर्षांपूर्वी झाले होते. अंतरिक्षात वेगवेगळ्या गॅसेस च्या मिश्रणाने जोरदार विस्फोट झाला. या विस्फोटामुळे एक आगीचा मोठा गोळा तयार झाला या गोळ्याला आज आपण सूर्य म्हणतो. विस्फोटामुळे चारही बाजूंना धुळीचे कण निर्माण झाले. गुरुत्वाकर्षणाच्या सहाय्याने हे छोटे छोटे धुळीचे कण एकमेकांना जुळत गेले. व या कणांपासून लहान मोठे दगड गोटे तयार झाले हे दगड गोटे एकमेकांना जुळून आपली सूर्यमाला तयार झाली. सुरुवातीच्या काळात माझे तापमान इतर ग्रह आणि सुर्याप्रमानेच तीव्र होते परंतु हळू हळू मी थंड झाले. या नंतर माझ्यावर आकाशातून वेगवेगळ्या उल्का पडू लागल्या. या उल्कां आदळल्याने माझ्यावर वेगवेगळे बेट तयार झाले. या उल्कांसोबताच माझ्यावर जीवनाची उत्पत्ती करणारे काही खनिज पदार्थ आणि अमिनो आम्ले आले. या मुळे हळू हळू लहान अमीबा पासून प्रगत होत आजचा मनुष्य निर्माण झाला.माझ्या या उत्पत्तीची कथा विज्ञान तसेच वेगवेगळ्या धर्मांमध्ये वेगवेगळी सांगितली आहे. परंतु या गोष्टीचा जास्त काही फरक पडत नाही. आज माझा आकार गोलाकार आहे. मी जातपात धर्म मानत नाही, कोणत्याही व्यक्तीशी उच नीच भेदभाव करत नाही. मनुष्य मला नुकसान पोहचवून स्वतःचेच नुकसान करवून घेतोय. माझ्यावर अनेक हानिकारक पदार्थ तयार केले जात आहे. मोठ्या प्रमाणात नष्ट न होणारा कचरा, पॉलिथिन इत्यादी माझ्यावर टाकले जात आहे. मनुष्य त्याच्या थोड्या फायद्यासाठी माझ्या आत रासायनिक कीटकनाशके टाकून मला नापीक करीत आहे. तुमच्या या कीटकनाशकांमुळे मला खुप नुकसान पोहोचत आहे. आज मनुष्याने माझ्यावर जल प्रदूषण, वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण आणि मृदा प्रदूषण मोठ्या प्रमाणात केले आहे.जरी मनुष्याने स्वतःच्या स्वार्थासाठी मला हानी पोहचवणे सुरू केले असले तरी मला या गोष्टीचा आनंद आहे की परमेश्वराने दृष्टांच्या नाश करण्यासाठी माझ्यावर अनेक अवतार घेतले आहेत. भगवान विष्णु, मुहम्मद पैगंबर, येशू ख्रिस्त या सारख्या देवांनी मला आपल्या चरण स्पर्शाने अधिक पवित्र केले आहे. देवी आदिशक्ती ने माझ्या भूमीवर अवतरित होऊन अनेक राक्षसांचा अंत केलेला आहे. शेवटी मी एवढेच सांगू इच्छिते की जर तुम्ही मला नुकसान पोहचविणारे तर त्याचा सरळ प्रभाव तुमच्या जीवनावर पडेल. मला निर्मात्याने आतून खूप सुंदर बनवले आहे. माझ्यामध्ये अनेक सुंदर बाग बगीचे आहेत. मनुष्य आणि पशु पक्षी यांचे जीवन माझ्या मुळेच सुरक्षित आहे. म्हणून माझा नको तर स्वतःचा विचार करून तुम्ही प्रदूषण थांबवा. आणि मला सर्व जीवनासाठी एक सुरक्षित स्थान बनवा.

पृथ्वी ग्रहाची माहिती वाचा येथे 

समाप्तया निबंधाला तुम्ही पुढील शीर्षक देखील देऊ शकतात. 

  • पृथ्वीचे मनोगत 
  • पृथ्वीचे आत्मवृत्त 
  • पृथ्वीची आत्मकथा 
  • पृथ्वी बोलू लागली तर निबंधतर मित्रांनो हा होता पृथ्वीवर लिहिलेला मराठी निबंध तुम्हाला हा निबंध कसा वाटला आम्हाला कमेन्ट करून नक्की कळवा. धन्यवाद…  • Read More 

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.