महिला सक्षमीकरण काळाची गरज निबंध | women empowerment in marathi

0

महिला सशक्तिकरण / महिला सक्षमीकरण काळाची गरज निबंध – women empowerment in marathi


महिला सक्षमीकरण काळाची गरज निबंध

महिला सशक्तिकरण निबंध मराठी : वेगाने बदलणाऱ्या आजच्या आधुनिक युगात महिला सशक्तिकरण किंवा महिला सक्षमीकरण हा महत्त्वाचा मुद्दा आहे. सशक्तिकरण किंवा सक्षमीकरण हे दोन्ही शब्द सारखेच आहेत एखादा व्यक्ती सक्षम असणे याचा अर्थ आहे तो स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकतो आणि कोणाच्याही सहाय्याशिवाय जीवन जगू शकतो. 

आजच्या या लेखात महिला सक्षमीकरण काळाची गरज निबंध (women empowerment in marathi) या विषयावर मराठी निबंध देण्यात आला आहे. हा महिला सक्षमीकरण मराठी निबंध आपणास शाळा कॉलेज मध्ये उपयोगी ठरेल.महिला सशक्तिकरण/सक्षमीकरण काळाची गरज निबंध – Women empowerment in marathi

(350 words)

आजच्या काळात महिला सशक्तीकरण हा चर्चेचा विषय बनला आहे. खासकरून मागासवर्गीय व प्रगतशील देशांमध्ये महिला सशक्तिकरणावर भर दिला जात आहे. कारण आज प्रत्येकाला कळून चुकले आहे की देशातील स्त्रियांच्या प्रगती शिवाय देशाची प्रगती शक्य नाही. आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये “यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता” अर्थात जेथे नारीची (स्त्रीची) पूजा केली जाते तेथे देवाचे स्थान असते अशा पद्धतीने स्त्रियांना मान देण्यात आला आहे.परंतु आजच्या समाजाची विटंबना पहा, स्त्री मध्ये एवढी शक्ती असतानाही देशातील अनेक भागांमध्ये तिला अशिक्षित, असक्षम आणि हिन भावनेने पाहिले जाते. एका राष्ट्राच्या विकासात महिलांचे महत्त्व आणि अधिकार संपूर्ण समाजाला कळावे यासाठी जगभरात आंतरराष्ट्रीय महिला दिन आणि मातृ दिवस यासारखे स्त्रियांचे दिवस साजरा करून त्यांना सक्षम करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. आपल्या देशात समाजातील स्त्रियांचे अधिकार आणि मूल्य मारून टाकणाऱ्या कुप्रथा जसे हुंडा, अशिक्षा, लैंगिक अत्याचार, असमानता, स्त्रीभ्रूणहत्या आणि घरेलू हिंसा इत्यादींना बंदी घालण्यात आली आहे. जर कोणी असे करतांना आढळत असेल तर त्याला कठोर दंड आणि शिक्षा देण्याची देखील तरतूद करण्यात आली आहे. स्त्रीला सूर्जन शक्ती मानले जाते. म्हणजेच स्त्री मानवजातीचे अस्तित्व आहे. तिच्यामुळेच सृष्टीचे निर्माण झाले आहे. म्हणूनच स्त्री ला संपूर्ण आर्थिक, राजनीतिक, विचार, विश्वास, धर्म आणि उपासना इत्यादींचे स्वातंत्र्य अधिकार देणे आवश्यक आहे. रोजगार, शिक्षण आणि आर्थिक व्यवहारात स्त्रीला पुरुषांप्रमाणेच अधिकार दिले गेले पाहिजे. इत्यादी गोष्टींची पूर्तता केल्यास एक स्त्री संपूर्णपणे सक्षम आणि सशक्त होईल. आपले निर्णय स्वतः घेण्यास ती पूर्णपणे तयार झालेली असेल. आज भारत शासनाद्वारे महिलांच्या सशक्तीकरणासाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत. महिला व बाल विकास कल्याण मंत्रालय भारत सरकार द्वारे महिलां सशक्तीकरणाकडे विशेष लक्ष दिले जात आहे. बेटी बचाव बेटी पढाव योजना, महिला हेल्पलाइन योजना, उज्वला योजना, सपोर्ट टू त्रेनिंग अंड एम्पलोयमेंन्ट प्रोग्रम फोर वुमन, महिला शक्ती केंद्र आणि पंचायती मध्ये महिलांसाठी आरक्षण इत्यादी काही प्रमुख महिला सशक्तिकरण योजना भारत शासनाद्वारे राबविण्यात येत आहे.आज भारताची जलद होणारी आर्थिक प्रगती पाहता लक्षात येते की येत्या काही वर्षांमध्ये भारत महिला सक्षमीकरणाचे ध्येय साध्य करेल. परंतु लवकरात लवकर संपूर्ण देशातील महिलांना सशक्त करण्याकरिता योग्य निर्णय आणि उपक्रम राबवणे आवश्यक आहे. शासनाने व देशातील जनतेने महिला सक्षमीकरणाची आवश्यकता समजून घ्यायला हवी व याविषयी जास्तीत जास्त लोकांना ते जागृती निर्माण करायला हवी. जर या सर्व गोष्टी व्यवस्थित पार पडल्या तर येत्या काही वर्षातच भारतातील महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कार्य करताना दिसतील.

–समाप्त–तर मित्रहो आशा आहे की महिला सक्षमीकरण काळाची गरज निबंध – women empowerment in marathi आपणास उपयोगी ठरला असेल. या निबंधाला आपले मित्र मंडळी सोबत नक्की शेअर करा. धन्यवाद…अधिक वाचा 

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.