मांजर मराठी निबंध व माहिती | Essay on cat in Marathi

0

cat in marathi : मांजर हा प्राणी आपल्या आजूबाजूला सहज आढळतो. मांजर cat ही जवळपास 9500 वर्षांपासून मनुष्यासोबत आहे. मांजराला सामाजिक प्राणी म्हणूनही ओळखले जाते. भारतात अनेक घरांमध्ये मांजर पाळली जाते. 

आजच्या या लेखात आपण मांजर मराठी निबंध | Essay on cat in Marathi आणि मांजरची माहीती प्राप्त करणार आहोत. तर चला सुरू करूया..  



cat in marathi


10 lines on cat in marathi

  1. मांजर ही एक सुंदर पाळीव प्राणी आहे.
  2. जवळपास प्रत्येक गावात आणि घरात मांजर वावरतांना पाहायला मिळते.
  3. मांजराचे डोळे आणि कान खूप तीक्ष्ण असतात. 
  4. इतर प्राण्यांप्रमाणेच मांजरी ला देखील चार पाय असतात.
  5. मांजरीला सर्व आहारी म्हटले जाते. तिला उंदीर, मासे, दूध आणि मटण खायला आवडते.
  6. मांजर आळशी प्राणी म्हणून देखील ओळखली जाते. तिला उष्ण वातावरणात राहायला आवडते. 
  7. मांजरीला एक लांब शेपटी असते.
  8. मांजर पांढर्या, भुऱ्या आणि काळ्या रंगात आढळते. 
  9. मांजरीच्या संपूर्ण शरीरावर लहान लहान मऊ केस असतात. 
  10. मांजर चपळ असते. ती वेगाने पळू शकते आणि जलद झाडावर चढू शकते. 



Essay on cat in marathi 200 words 

मांजर एक लहान पण खूप गोंडस पाळीव प्राणी आहे. ती संपूर्ण जगात आढळते. तिला चार लहान लहान पाय आणि एक शेपटी असते. मांजरीच्या शरीरावरील केस नरम, रेशमी आणि मुलायम असतात. ती भुरा, काळा, पांढरा व सोनेरी रंगात आढळते. मांजरीचा म्याव म्याव आवाज खूप मधुर असतो. मांजरचे पंजे आणि दात खूप तीक्ष्ण असतात. यांच्या मदतीने ती आपल्या शिकारला मारून खाते. मांजर चालत असताना अजिबात आवाज होत नाही. तिचे डोळे भूरा, हिरवा व पिवळ्या रंगाचे असते. या डोळ्यांच्या मदतीने तिला रात्रीच्या अंधारात पाहणे शक्य होते. 



मांजर एक मांसाहारी सस्तन प्राणी आहे. तिला दूध मासे व उंदीर खायला खूप आवडते. तिच्या भीतीने उंदीर घरात येत नाही. म्हणून लोक घरातील उंदीर घालवण्यासाठी मांजर पाळतात. वाघ, सिंह, चित्ता, बिबट्या इत्यादी प्राणी मांजरीच्या प्रजातीतील आहे. परंतु मांजर यांच्यापेक्षा आकाराने लहान आहे. तिला वाघाची मावशी म्हटले जाते. मांजरीच्या पळण्याचा वेग भरपूर असतो. तिच्यात उंच उड्या मारण्याची अद्भुत क्षमता असते. 



मांजरी बद्दल वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळे अंधविश्वास आहे. भारतासह इतर शेजारी देशांमध्ये मांजराचे रडणे अशुभ मानले जाते. काही लोकं मांजर आडवी गेली की अपशकुन होते असे मानतात. जी गोष्ट अत्यंत हास्यास्पद आहे. कारण मांजर, कुत्रा, गाय इत्यादी सर्वच प्राणी रात्री ओरडतात. याशिवाय जपान देशात मांजरीला शुभ मानले जाते. त्या लोकांचे मानणे आहे की भूकंप, सुनामी या सारख्या नैसर्गिक आपत्ती मांजरीला आधीच कळून जातात.



Essay on cat in marathi 400 words

मांजर ही सुंदर आणि मोहक प्राणी आहे. ती एक पाळीव प्राणी आहे आणि अनेक लोक तिला आपल्या घरात पाळतात. मांजरीचे नखे खूप तीक्ष्ण असतात, या नखांच्या मदतीने ती आपल्या शिकराला ठार करते. मांजर दिसण्यात वाघाप्रमानेच असते. तिला वाघाची मावशी म्हणजे वाघाचेच लहान रूप मानले जाते. लहान मुलांना तर मांजर अतिशय प्रिय असते. 



मांजर खूप बुद्धिमान प्राणी आहे. ती माणसाचे हावभाव ओळखते. मांजरीचे डोळे रात्रीच्या अंधारात चमकतात, या डोळ्याच्या मदतीने ती अंधारातही सर्वकाही पाहू शकते. मांजर च्या तोंडात 26 दात असतात. वयस्क मांजरीच्या तोंडात 30 पर्यंत दात असतात. मांजर चा कानाचा पडदा फार संवेदनशील असतो. या कानांच्या मदतीने ती अतिशय लहान आवाजही ऐकू शकते. मांजरी च्या मागच्या बाजूला एक जाड शेपटी असते. या शेपटी मुळे झाडावर चढताना किंवा उड्या मारताना तिला आपला तोल सावरता येतो. 



मांजर खूपच सुंदर आणि आकर्षक असते. ती आपल्या मजेदार कृतींनी सर्वांना मोहून घेते. पण बऱ्याचदा ती आक्रमक देखील होऊन जाते. जर तिला जास्त चिडचिड झाली तर ती आपल्या नखांनी आपल्याला इजा देखील करू शकते. मांजर भुरा, काळा, पांढरा आणि इतर रंगांचे एकत्रीकरण च्या स्वरूपात आढळते. 



मांजर सर्व आहारी असते. ती शाकाहारी व मांसाहारी दोन्ही तऱ्हेचे पदार्थ खाते. शाकाहारी पदार्थांमध्ये दूध, फळे, भाजीपाला ई. आणि मांसाहारी पदार्थांमध्ये उंदीर, मासे, मटण, लहान पक्षी ई. तिचे आवडते अन्न आहेत. मांजरीचा स्वभाव आळशी असतो. तिला झोपायला खूप आवडते, ती दिवसभरात जवळपास 15 तासांपर्यंत झोपते. पण तरीही तिचे शरीर खूप लवचिक असते. 



मांजर सहज झाडे तसेच कुंपण पार करू शकते. काही क्षणातच ती झाडावर चढून जाते. ती खूप उंच आणि लांब उडी मारू शकते. लवचिक शरीर आणि मजबूत पाय असल्याने ती खूप जलद गतीने पळते. मांजर सर्वांनी हवीहवीशी वाटणारी प्राणी आहे. अनेक लोक तिला आपल्या घरात पाळतात. रस्त्यावर फिरणाऱ्या मोकाट मांजरींना देखील खूप प्रेम दिले जाते आणि त्यांची काळजी घेतली जाते. 



एक पाळीव प्राणी म्हणून मांजर अतिशय उपयुक्त आहे. ती आपले अन्न धान्य उंदरांपासून वाचवते. तिच्या भीतीने उंदीर घरात येत नाही. संशोधनातून सिद्ध झाले आहे की जे लोक मांजर पाळतात त्यांना हृदयासंबंधी रोग टाळता येतो. मांजरीच्या मुलाला ‘मांजरीचे पिल्लू’ म्हणून ओळखले जाते. मांजरीचे पिल्लू हे मांजरीचे लहान व गोंडस रूप असते. मांजर जगभरात आढळते, मांजरी नसलेला प्रदेश सापडणे कठीण आहे. मांजरीच्या म्याऊ म्याऊ आवाज खूप मधुर असतो. परमेश्वराने मांजरीला खूप सौंदर्य दिले आहे मांजरीच्या चालण्याला ‘मनमोहक चाल’ म्हणून ओळखले जाते. खरे आहे मांजर मनुष्या साठी खूप उपयोगी प्राणी आहे.



मांजरी सोबत खेळण्यात खरोखर खूप मजा येते. आपण आपल्या आजूबाजूला असणाऱ्या मोकाट तसेच पाळीव मांजरांची काळजी घ्यायला हवी. त्यांना योग्य संरक्षण द्यायला हवे मांजर आपल्या पर्यावरणातील एक अविभाज्य भाग आहे आणि स्वार्थी समाजापासून तिचे रक्षण करणे आपण सर्वांचे कर्तव्य आहे. 



Facts & information about cat in marathi

  • जगभरात मांजरिंची संख्या 50 कोटी पेक्षा जास्त आहे.
  • संशोधनानुसार अमेरिकेत दरवर्षी 40 हजार लोकांना मांजरी चावून घेतात.
  • कुत्र्याच्या तुलनेत मांजरीचे कान जास्त तीक्ष्ण असतात.
  • मांजर 30 ते 40 किलोमीटर प्रति तास या वेगाने पळू शकते.
  • प्राचीन काळात ईजिप्तमधील लोक मांजरींची पूजा करत असत.
  • मांजर 20 मीटर उंचीवरून उडी मारू शकते.
  • एक मांजर आपल्या उंचीच्या पाच पट उंच उडी मारू शकते आहे.
  • मांजरी च्या चेहऱ्यावर असलेल्या मिशीचे केस 12 असतात.
  • मांजर प्रेमींना ailurophilia म्हटले जाते. 
  • मांजरीच्या नाकावर मनुष्याच्या फिंगरप्रिंट प्रमाणे वेगवेगळे ठसे असतात. 
  • जपानमध्ये मांजरींना शुभ मानले जाते परंतु भारतात मांजर आडवी गेली की अपशकून मानतात.
  • मांजरीला उष्ण वातावरण आवडते.



माझा आवडता प्राणी मांजर निबंध वाचा येथे



आम्ही आशा करतो की आमच्या द्वारे लिहिण्यात आलेला Essay on cat in Marathi तुम्हाला नक्कीच आवडला असेल. मांजरीच्या या माहितीला आपल्या मित्र व कुटुंबियांसोबत शेअर करा. धन्यवाद.. 

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.