माझा आवडता खेळाडू विराट कोहली मराठी निबंध
आपल्या देशातील सर्वात लोकप्रिय खेळ हा क्रिकेट आहे, व भारतीय क्रिकेट संघाने आजवर क्रिकेट चे अनेक विश्वचषक जिंकले आहेत. उत्कृष्ट क्रिकेट खेळणारे अनेक खेळाडू भारतीय क्रिकेट संघात आहे. आजचा हा निबंध माझा आवडता खेळाडू या विषयावर आधारित आहे.
maza avadta kheladu virat kohli हा आहे, आजच्या या लेखात आपण माझा आवडता खेळाडू निबंध मराठी मध्ये मिळवणार आहोत. हा निबंध भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार विराट कोहली यांच्यावर आधारित आहे. तर चला सुरू करूया.
माझा आवडता खेळाडू सचिन तेंडुलर वाचा येथे
माझा आवडता खेळाडू | My favourite player essay in marathi
आपल्या देशात अनेक खेळ खेळले जातात. कब्बडी, क्रिकेट, हॉकी, हॉलीबॉल, फुटबॉल, बॅडमिंटन इत्यादी अनेक खेळ लोकांमध्ये लोकप्रिय आहेत. या खेळांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळण्यासाठी अनेक कुशल खेळाडू निवडले जातात. या सर्व खेळापैकी माझा आवडता खेळ क्रिकेट आहे. व सध्याचे भारतीय क्रिकेट संघाचे कॅप्टन विराट कोहली माझे आवडता खेळाडू आहेत. मला विराट कोहलीचा खेळ खूप आवडतो. विराट कोहली भारतीय क्रिकेट टीम चे महान खेळाडू आहेत. आपल्या उत्कृष्ट खेळाच्या कौशल्याने ते सर्वांचे मन मोहून घेतात.
विराट कोहली यांचा जन्म 5 नोव्हेंबर 1988 ला दिल्लीमध्ये एका पंजाबी कुटुंबात झाला होता. त्यांचे वडील प्रेम कोहली हे एक वकील व त्यांची आई सरोज कोहली या गृहिणी आहेत. त्यांना एक मोठा भाऊ व बहीण आहेत. विराट कोहली यांच्यात लहानपणा पासूनच क्रिकेट विषयी आवड होती. लहान असताना त्यांच्या वडिलांनी आणून दिलेल्या खेळण्यामध्ये त्यांना बॅट ही सर्वात प्रिय होती.
2006 साली अंडर नाईन्टीन भारतीय क्रिकेट संघात त्यांना शामिल करण्यात आले. 2008 साली त्यांनी एकोणीस वर्षापेक्षा कमी वय असणाऱ्या क्रिकेट सामन्यात भारताला विश्वचषक जिंकून दिला. 2011 पासून त्यांनी टेस्ट क्रिकेट मॅच खेळणे सुरू केले. आज विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाच्या तीनही फॉरमॅट चे कॅप्टन आहेत.
2017 साली विराट कोहली यांनी हिंदी चित्रपट अभिनेत्री अनुष्का शर्मा शी विवाह केला. 2014 ते 2016 या दरम्यान विराट दोनदा मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार जिंकले आहेत. याशिवाय त्यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यश मिळवल्याबद्दल अर्जुन पुरस्कार आणि भारत सरकार द्वारे पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. विराट कोहली उजव्या हाताने बॅटिंग व बॉलिंग करतात. या शिवाय ते खेळताना हातात काळा धागा व कडे घालून ठेवतात. विराट कोहली त्यांच्या फिटनेस मुळे सुद्धा लोकांमध्ये लोकप्रिय आहे. ते दररोज व्यायाम करतात व आपल्या व्यायामाची फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर टाकीत असतात. इत्यादी अनेक कारणांमुळे आवडता खेळाडू विराट कोहली आहे.
–समाप्त–
तर मित्रांनो तुम्हाला माझा आवडता खेळाडू हा निबंध कसा वाटला आम्हाला कमेन्ट मध्ये नक्की सांगा व कोणत्याही विषयावर मराठी निबंध तसेच भाषणे मिळवण्यासाठी भेट द्या आमची वेबसाइट bhashanmarathi.com ला.