fbpx
4.6 C
London
Sunday, January 29, 2023

माझा आवडता देशभक्त मराठी निबंध | Maza Avadta Deshbhakt marathi essay

Maza Avadta Deshbhakt: देशासाठी आपल्या प्राणांची पर्वा न करता बलिदान देणाऱ्या वीरांना देशभक्त म्हटले जाते. भारतात अनेक देशभक्तांनी देशासाठी बलिदान दिले आहे. अशाच देशभक्तांपैकी एक होते नेताजी सुभाष चंद्र बोस. 

आजच्या या लेखात आपण माझे आवडते देशभक्त नेताजी सुभाष चंद्र बोस मराठी निबंध प्राप्त करणार आहोत. तर चला सुरू करूया…माझा आवडता देशभक्त निबंध मराठी
majhe avadte deshbha kt 


माझा आवडता देशभक्त | Maza Avadta Deshbhakt nibandh marathi 

भारत देश ही वीरांची भूमी आहे. भारताच्या स्वातंत्र्यासाठी अनेक महानायकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले आहे. आपले संपूर्ण आयुष्य देशसेवेसाठी वाहणाऱ्या या देशभक्तांना आपल्या देशात नेहमी आठवण केले जाते. तसे पाहता देशाच्या स्वातंत्र्यात अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. परंतु ज्या देशभक्तांने मला सर्वाधिक प्रभावित केले त्यांचे नाव आहे नेताजी सुभाषचंद्र बोस.नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी भारतीय स्वतंत्र लढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी आझाद हिंद सेनेची स्थापना केली. ‘तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा’ अशा देशभक्ती घोषवाक्याने त्यांनी हिंदू मुस्लिम प्रत्येक धर्माच्या भारतीयांमध्ये राष्ट्रभक्तीची भावना निर्माण केली, जी भारताच्या स्वातंत्र्यात महत्त्वाचा आधार बनली.सुभाष चंद्र बोस यांचा जन्म 23 जानेवारी 1897 ला ओडिसा मधील कटक मध्ये झाला होता. त्यांचे वडील जानकीनाथ बोस हे एक वकील होते. सुभाष चंद्र बोस यांचे प्राथमिक शिक्षण कटक मधूनच झाले. पुढील उच्च शिक्षणासाठी ते कलकत्ता गेले.   नंतरच्या काळात शिक्षणासाठी ते इंग्लंड गेले. इंग्लंड मधून पदवीधर झाल्यावर त्यांनी शासकीय नोकरीची परीक्षा दिली. या परीक्षेत ते चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले. परंतु देशाविषयी असलेले अतूट प्रेम आणि देशाला स्वतंत्र मिळवून देण्याची इच्छा त्यांना शांत बसू देत नव्हती. त्यांनी ती नोकरी सोडली व ते भारतात आले.भारतात आल्यावर त्यांनी गांधीजींच्या असहयोग आंदोलनात भाग घेतला. या आंदोलनादरम्यान ते अनेकदा तुरुंगात गेले. 1936 साली त्यांना भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले. सुभाष चंद्र बोस यांचे विचार गांधीवादी विचारांच्या विरुद्ध होते. त्यांचे मानणे होते की देशाला स्वतंत्र मिळवून देण्यासाठी अहिंसेच्या मार्गाने नव्हे तर हिंसेच्या मार्गाने प्रयत्न करायला हवेत. गांधीजींच्या नाराजीमुळे त्यांना काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष पद सोडावे लागले.सन 1942 साली ते जपान गेले. येथे त्यांनी इंग्रजांविरुद्ध लढ्यासाठी आझाद हिंद सेनेचे गठण केले. त्यांच्या सैन्याने न घाबरता इंग्रजांचा सामना केला. अतिशय कमी खर्च आणि कमी सैन्य असतांनाही नेताजींनी जे केले ते खरोखर प्रशंसनीय आहे. त्यांची इच्छा देशाला एक महान राष्ट्र बनवण्याची होती. त्यांच्या दृष्टीने भारत भूमी वीरांची भूमी होती. त्यांनी अंदमान निकोबार बेटांवर भारताचा ध्वज फडकावून भारताच्या स्वातंत्र्याची घोषणा केली होती.बंगाल चे वाघ म्हणून ओळखले जाणारे सुभाष चंद्र बोस तरुणांसाठी प्रेरणेचे स्त्रोत होते. त्यांच्या भाषणाच्या एक एक शब्दाने लोकांमध्ये देशभक्तीची भावना निर्माण होत असे. नेताजी मध्ये आपल्या देशाविषयी प्रेम खूप कमी वयापासून निर्माण झाले होते. जपान च्या टोकियो मध्ये आझाद हिंद सेना स्थापन केली. याशिवाय त्यांनी इंडियन नॅशनल आर्मी चे देखील नेतृत्व केले. या सैन्याचे ध्येय इंग्रजांविरुद्ध लढून भारताच्या स्वाधीन होणे होते. आझाद हिंद ने हा निर्णय घेतला की ते लढत लढत दिल्ली जातील व तेथे आपल्या देशाच्या स्वातंत्र्याची घोषणा करतील नाहीतर इंग्रजांशी लढत वीरगती ला प्राप्त होतील.परंतु जेव्हा 18 ऑगस्ट 1945 ला नेताजी सुभाषचंद्र बोस बँकॉक हून टोकियो ला जात होते तेव्हा मार्गात विमानाला आग लागल्याने त्यांचे विमान दुर्घटनाग्रस्त झाले. असे मानले जाते की या दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाला. परंतु त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे शरीर सापडले नाही म्हणूनच त्यांच्या मृत्यूच्या कारणावर आज देखील वाद सुरु आहेत. परंतु देशासाठीचे आपले कर्तव्य पूर्णपणे पार पाडणाऱ्या या देशभक्ताला भारतीयांच्या हृदयात कायम मोलाचे स्थान आहे व नेहमी राहील.

–समाप्त–तर मित्रहो हा होता माझे आवडते देशभक्त- Maza Avadta Deshbhakt मराठी निबंध. हा निबंध कसा वाटला कमेन्ट करून नक्की सांगा धन्यवाद.. READ MORE:

Latest news
Related news

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here